http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

देशमुखां च,,, वैभव (०९/०४/२०१५ ),,,१७


मी औरंगाबाद ला यशवंत कला महाविद्यालयात शिकत असताना सुरवातीला संजय नगर मध्ये राहायचो, नंतर बाबुराव काळे आणि मी गजानन नगर मध्ये शहाणे मामा च्या घरी राहायला गेलो . शहाणे मामा ची रूम मध्ये मला कधीच भाडेकरू म्हणून वाटले नाही. मामा घरी असो व नसो आम्ही खूप मिळून मिसळून राहिलो. बाबू आणि मी रूम वरच जेवण बनवायचो.
मंगलताई चे आणि बाबू च लग्न झाल होत आणि प्रथम वर्षाचे ३ महिने जवळपास बाकी होते. मात्र मंगलताई आणि बाबूने मला जाऊ दिल नाही,,,त्यांनी परीक्षा झाल्यावरच जायचं असं ठाम सांगून टाकल,,,,आणि मग दुसऱ्या वर्षी मी रूम केली. आमचे बंध खरोखर किती जुळले होते.
मी गजानन नगर सोडून कॉलेज च्या जवळ च गजानन कॉलनी मध्ये वाघ च्या खोलीत आलो. मी,ज्ञानेश्वर शिंगणे,आणि सुरेश वाघ आम्ही तिघे सुरवातीला राहायचो मग सुरेश रूम सोडून गेल्यानंतर चंद्रशेखर साखरे आला अन "आपली अंघोळ " हा डायलॉग खूप गाजला आमच्या त्या मजल्यावर.आमचा तो मजला खूप भारी होता आमच्या रूम च्या बाजूच्या रूम एक ब्राम्हण कुटुंब होत ते बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई च आणि एका रूम मध्ये एक पेंटर राहायचा तो ही योगायोगाने आमच्याच गावाकडचा होता.
तो पेंटर म्हणजेच वैभव देशमुख.
बुलडाणा जिल्ह्यातील चांडोल हे त्याच गाव. तो तसा गावाकडे जास्त जात नसे, तो निंबाळकर पेंटर कडे काम करायचा. बर्याच वेळा सांगायचं कि पाहिजे तेव्हडा मोबदला मिळत नाही.त्याच्या मनाची घालमेल कळायची पण आम्ही काही करू शकत नसे,,,,,त्याची एक जमेची बाजू म्हणजे कविता आणि शिंगणे पक्का रसिक माणूस,,,आम्ही वैभव च्या कविता ऐकायचो. मी विचार करायचो याच्या इतक्या कविता पाठ कश्या. एक दोन नव्हे तर खूप खूप कविता तोंडपाठ असत त्याच्या. तो आम्हाला मराठी भावगीत हि ऐकवायचा,,,,मला त्याच्या तोंडून एक गीत खूप एकवास वाटे,,,,,दिल्या घेतल्या वाचनाची शपत तुला आहे. असे अनेक.
त्याच्या कविता ह्या तयावी दुखद असत,,,दुःखाचा भाग जास्त असायचा.
कधीकधी दत्ता , नागनाथ यायचे,, वांग्याची भाजी नागनाथ खूप भारी करायचा,,,आम्ही जेवण बनवायचो मस्त जेवायचो.त्या रात्री गप्पा रंगायच्या मस्त त्याला जोड वैभवच्या कविता अन गाण्याची असायची.
नागनाथ ने त्यावेळी लोकमत वरील ओळ फार गाजवली ,,,,,''काबुल पे भारी बमबारी,हमले अभी भी जारी''
औरंगाबाद च शिक्षण संपल्यावर जे ते जिकडे तिकडे पांगले,,,मी पुण्याला जी डी आर्ट साठी गेलो. अधून मधून औरंगाबाद ला चक्कर झाली कि वैभव ची भेट व्हायची. नंतर त्याने स्वत: दुकान टाकल होत. त्याच्या कडील कविताचा साठ बघून आम्ही त्याला म्हणायचो ही कि तू कवितासंग्रह का नाही काढत. तो फक्त हसायचा अन नाही राव आताच नको म्हणयचा.नंतर आमची भेट कमी होत गेली,फोन व्हायचा कधीतरी.
असाच एकदा फोन आला होता त्याचा मला मुखपृष्ठ साठी ,,,,मी त्याला सांगितल होत मला ते नाही कस जमत. पण माझ्या पेंटिंग पैकी वापरता आले तर बघ. पण काही कारणाने माझ्याकडून उशीर झाला, मी ज्यावेळी मेल पाठविला होता त्यावेळी त्याच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार झाले होते,,,,मी मात्र एका काविमित्राच्या पुस्तकाच्या मुखपृष्टाला मुकलो होतो.
वैभव देशमुख हा सध्या पुण्यात असतो, आणि तो सध्या एक चांगला गुणवान कवी म्हणून नावारूपाला आला आहे. त्याचा "तृष्णाकाठ" नावाचा काव्यसंग्रह बाणगंगा पब्लिकेशन ने प्रकाशित केला आहे. त्याला भरपूर ठिकाणी काव्य वाचनास निमंत्रित केल जात.आणि त्याला साहित्यातील अनेक नामाकीत पुरस्कार ही मिळाले आहेत.
वैभव तुझे शब्द देश-मुखात पोह्चो ही श्री चरणी.
नागनाथ, दत्ता, शिंगणे,,,,,, कला शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.सुरेश वाघ नाशिक ला आहे बहुतेक,,,,आणि,,,, साखरे मात्र आम्हा सर्वाना सोडून निघून गेला.
सुनिल बांबल

No comments: