http://sunilbambal.blogspot.in/

Wednesday, August 5, 2015

वड / banyan tree/ वटवृक्ष (०९/०३/२०१५) लेख क्रं- ०४


               का कुणास ठाऊक पण मला वडाच्या झाडाचा खूप लळा लागला होता. माझ्या घराच्या बाजूने दोन तीन घर सोडल्या नंतर भल मोठं वडाचे झाड नव्हे जणू वटवृक्ष आहे, त्या झाडाची सावली ,त्याची पान याचा पुरेपूर फायदा आजू बाजूचे सर्वच घ्यायचे. त्या पानावर कुरडया बनवायचे. आमची लहान मुलाची धमाल ती वटसावित्री पौर्णिमाच्या दिवस ला,,,त्या वेळी आजूबाजूच्या स्त्रिया पूजेला यायच्या ,आंबे आणि वेगवेगळा प्रसाद तेथे ठेवायच्या ,,,तो प्रसाद मात्र आमचाच असायचा. 
हे माझ्या लहान पनातील झाड अजून हि तसेच उभ आहे. आजू बाजूने पक्की एखाद दुसरी घर झालीत नवीन सिमेंट ची ते बांधताना त्या लोकांना त्याच्या काही फांद्यांना मात्र त्याच्या पासून दूर करावे लागल.जस माणूस लहान च मोठ होत जाताना जसे बदल घडत जातात तसे बदल त्यात हि घडले. माणूस म्हातारपणाकडे झुकल्यावर जस तो दिसायला लागतो तसी आज त्या झाडाची गत झाली आहे, आजू बाजुने घर असल्याने काही प्रमाणात फांद्या तोडल्याने त्याचे सौंदर्याचे तीन तेरा वाजले ,,,अगोदर चा पूर्वीसारखा रुबाबदार पणा न सौंदर्य त्यात दिसत नाही. त्याचा काहीही दोष नसताना शेजारी त्याचा अधून मधून उद्धार करतात.
मला मात्र या झाडाच नेहमीच कुतूहल वाटलं. याला येणारी कोवळी कोवळी पान असो वा नंतर येणारी लाल लाल फळ असो. मी जाम खुश असायचो कारण त्यावर ती फळ खायला वेगवेगळे पक्षी यायचे,कावळे,पोपटआणि अनेक छोटे छोटे पक्षी असायचे खारुताई चे तर नेहमीचे ठिकाण ,
आणि हो कोकिळा तर हमखास असायची, आणि आम्हाला आवाज दयायची,,
कुहु कुहु कुहु,,,,,
माकड आली कि काही खर नसायचं बर त्याचे आगमन झाले कि आम्ही फरार.
या वडाच्या झाडाने पुढे आर्ट मध्ये आल्यावर हि साथ सोडली नाही औरंगाबाद ला शिकायला काय गेलो तेथे तोरवणे सरांनी केलेली सुंदर सुंदर वडाच्या झाडाची चित्र बघायला मिळाली. नंतर पुढे मला हि राहवलं गेल नाही. मी ही
त्यावर collage & water colour मध्ये चित्र केलीत. मग मी कालांतराने माझ्या चित्राचे विषय बदलत गेले, मी थोडा creative चित्रांकडे वळलो. हि चित्रे करत असताना सारख वाटायचं कि आपण वडाच्या झाड हा विषय घेऊन painting करावीत आणि ती हि सृजनात्मक.
मी पुण्याला शिकत असताना चिखली-पुणे महामार्गावर खूप मोठ मोठी वडाची झाड होती आणि त्या सर्व झाडांवर लाल पांढऱ्या रंगाचे पट्टे होते ,ते पट्टे जणू सांगत होते कि हे सरकारी झाड आहे आणि हे कुणी हि तोडू नये ,,,आणि रोड रुंधीकरन मध्ये ते महाकाय वृक्ष तोडली गेली. त्या वेळी हे मी पाहत होतो पण अस वाटल नव्हत कि हा आपल्या चित्राचा कधी विषय हि होईल म्हणून. आणि मी सुरवात केली ती Banyan Tree series ला. आणि त्या मध्ये मी बरीच चित्र केली त्यातील काही चित्र अमेरिकेतील बोस्टन येथे आहे. या तीन चित्रातील २ चित्रचा लिलाव या शहरातील एका प्रसिद्ध मुझीयम मध्ये लिलाव झाला. आणि चांगल्या किमतीला ते चित्र विकली गेलीत. या मालिकेतील एक चित्र दक्षिण आफ्रिकेतील एका उद्योगपती ने हि घेतले आहे.आणि नुकतेच एक चित्र जपान ला ही गेल.
म्हणतात या झाडाच आयुष्य चारशे वर्षाच असत मग या चारशे वर्षात याच्या आजूबाजूने घडणाऱ्या किती गोष्टी बघत असल न बरे हे,
किती सत्ताधीश आणि किती संस्कृती हि बघितल्या असेल नाही का ?
पण मला वाटते कि हे वृक्ष दर वर्षी वाट पाहत असेल वटसावित्री पौर्णिमेची अन कदाचित माझ्या नवीन चित्राची.
याच मला कायम दर्शन व्हावे म्हणून मी याच नवीन रोप माझ्या घराच्या बाल्कनीत लावलं आहे.
सुनिल बांबल

No comments: