http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

१८०३ मराठा-इंग्रज दुसरे युद्ध (१२/०३/२०१५)लेख क्रं- ०६


      औरंगाबाद हून बुलडाणा ला जाताना मराठवाड्यातील माहोरा ते सिल्लोड मार्गावर आसई गावाचे गेट बनविले आहे ,,,, जाताजाता सहज त्याकडे लक्ष गेले. त्यावर युद्धभूमी आसई असे लिहिलेले दिसले. तेथे विचारपूस केली असता एक तरुण म्हणाला , चला मी दाखवतो तुम्हाला युद्धभूमी.
आम्ही लगेच गावात गेलो ,,सुरवातीला एक मंदिर लागले , ते बाहेरूनच न्याहाळत आम्ही पुढे सरकलो.
ज्या वेळी युद्ध झाले त्या वेळी म्हणे गावाच्या नदीला रक्ताचा पूर गेला मराठ्यांनी खूप संघर्ष केला पण इंग्रजांपुढे मराठ्यांचा पराभव झाला,पण इंग्रजांच हि नुकसान झाल,इंग्रजांचा मुख्य अधिकारी मक्सवेल ला शेवटी ज्या ठिकाणी हे युद्ध घडले येथेच युद्धात मारला गेला. आणि त्याची तेथे कबर बनविली आहे, हे तो तरुण सांगत होता आणि आम्ही अखेर त्या ठिकाणी पोचलो तेथे बघितले असता मला भल मोठ वडाचे झाड दिसले ज्याच्या पारंब्या ह्या खोडा सारख्याच मोठ्या होत्या आणि त्या पारंब्यानी जमीनीसोबत दोस्ती केली होती. मी तेथील दृश्य बघून थोडा नाराजच झालो. ती कबर आता मोडकळीस अवस्थेत आहे . तेव्हड्यात तो सांगू लागला या कबर वर पूर्वी सप्तधातूची प्लेट होती,त्यावर अधिकारी मक्सवेल चे चित्र अन नाव आणि मजकूर होता,,,,,काही वर्षा पूर्वी चोरट्यांनी ती प्लेट तोडून चोरून नेली,ते चोर पकडले बहुतेक आणि ती औरंगाबाद ला कुठल्यातरी पोलीस ठाण्यात जमा आहे म्हणे. आता ती प्लेट असेल कि नसेल माहित नाही आणि ते चोर पकडले गेले असेल तर असेल ही कदाचित.
हे सांगत असताना तो मक्सवेल ला राजा मक्सवेल असच संबोधत होता. तो म्हणाला सर येथे दर वर्षी त्या राजाची वंशज येतात आमच्या गावात. त्यांनी पैसे दिले होते त्या कबर आणि परिसरासाठी ,त्या कबर पर्यंत जाण्यासाठी सिमेंट चा रस्ता केला आहे,तो रस्ता तसा काही खास राहिला नाही आता,,,पण जाण्यासाठी रस्ता न दोन्ही बाजूनी विजे चे खांब आहे,,,कबर च्या भोवती पाच फुट उंचीची भिंत आहे तिला आतून बाहेरून टाइल्स लावल्या आहेत,,आजू बाजूचा परिसरालाही भीती उभारल्या आहेत,
हे बघत असता मी त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचा परिचय करून दिला. त्याच गजानन दाभाडे नाव तो B.Com II चा विद्यार्थी होता, अन कार वर चालक म्हणून हि काम करतो म्हंटला ,त्याच्या आई सोबत हि ओळख करून दिली त्याने. घरी थोडी शेती आहे म्हंटला ते हि बघतो. आणि आपल्यासारख कुणी गावात आला कि त्याला हे दाखवत फिरतो, इंग्रज लोक आले तर ते खूप पैसे हि देऊन जातात त्यांच्या सोबत फिरलं की. आणि तो सांगू लागला कि येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कड ला या युद्धात पडलेली एकमेव तोफ आहे. मी त्याला विचारले अंतर किती असेल तरीही,,तो बोलला जास्त नाही,,,,,आणि आम्ही गाड रस्त्याने निघाली. activa होतीच सोबत तीनेही चांगलीच साथ दिली.
हळूहळू आम्ही त्या गावाजवळ पोचलो तेथे एक महाराजांची समाधी होती . तेथील लोक सांगतात त्या महाराजांना पक्ष्यांची भाषा समजायची त्यांच्या सोबत पक्षी बोलत असत . त्या च्यासमोर एक मोठा कोरीव दगड होता . प्राथमिक अंदाज लावता त्याच्या बनावटी नुसार तो मला जुन्या काळातील दगडी तेलघाणा वाटत होता.ते बघून आम्ही शेवटी तोफ जवळ पोचलो,,,ती तोफ तेथील मंदिरासमोर शेकडो वर्षी पासून गुपचूप पडून आहे.
अंदाजे ७-८ फुट लांबीची तोफ असावी ती , आणि पंच अथवा सप्त धातू ची मराठे इतिहासाची साक्ष असलेली. ते बघून मला खूप आनंद झाला. मी तोफ चा फोटो काढला. एक चक्कर त्या गावात हि मारली, भेट दिलेल्या दोन्ही गावातून केळणा नावाची नदी वाहते,,,व नंतर ती माझ्या आई च्या माहेरात मेलात जाऊन जुई ला मिळते. या केळणा-जुई च्या संगमावर एक महादेवाचे मंदिर आहे. आम्ही ती तोफ पाहून परतीचा मार्ग धरला.
मी त्याला गावात सोडू कि कस म्हणून विचारल,,,तो माझ्यासोबत माहोरा आला कारण त्याला तिकडेच काम होत पण तरीही त्याच काम सोडून त्याने मला इतिहासत नेल. धन्यवाद गजानन.
त्याचे आभार कसे मानावे कळत नव्हते ,,,म्हणून मी त्याला चहा घेऊ घेऊया अस म्हंटल असता त्याने झकास चहा मिळतो त्या ठिकाणी नेल. आम्ही चहा घेतला. मी चहाचे बिल दिल . आमची निरोप घ्यायची वेळ झाली…. मी हळूच ५० रुपये त्याच्या खिश्यात कोंबत असतानाच तो म्हणाला नाही सर मला पैसे नकोत उलट तुम्हाला मी माझ्या शेतातल काहीतरी द्यायला हव होत ,,,,,शेतात मक्का आहे पण अजून कंनस आली नाहीत . .
तुम्ही परत या शेतात हरभरा असताना,,,आम्ही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले न परत भेटू कधीतरी म्हणून एकमेकांचा निरोप घेतला. या २ तासाच्या प्रवास भेटीत एक नवीन मित्र जोडला गेला. त्याची परत कधी भेट होईल माहित नाही ,,,,,आम्ही निरोप घेतला तो त्याच्या रस्त्याला न मी माझ्या ,,, मला बुलडाणा ला पोचायला खूप उशीर झाला. पण एक इतिहास असलेल्या दुर्लक्षित ठिकाणाची आपल्याला ओळख झाली याच समाधान मिळालं.
सुनिल बांबल

No comments: