मी कला क्षेत्रात आलो च मुळात नोकरी मिळेल ही आशा बाळगून . मी समजायचो ए.टी.डी. झालो की आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळेल, म्हणून मी foundation केलेले असताना G.D.Art ला न जाता ए.टी.डी. ला प्रवेश घेतला. पण मला कुठे माहिती होत की नोकरी साठी पैसा नसेल तर काही खरं नाही. संस्थांना सुद्धा शाळेत कलाशिक्षक भरताना कला नसली तरी चालती पण पैसा पाहजे, मग ते कॉलेज असो वा शाळा.
Govt.तर पदे भरत नाही, भरले तरी अंशकालीन भरतात आणि नंतर त्या अंशकालीन साठी ही लढाव लागत.
मला ए.टी.डी.आणि डीप.ए.एड चा नोकरी साठी फायदा नाही झाला.
सध्या इंग्रजी शाळांचे शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व वाढलं आहे , तर तेथे ही फार कमी मोबदला देतात आणि त्या कालाशिक्षकाला वेगळेच काम लागतात. पण किमान मानधन बरं असायचे.
या पेक्षा वाईट अवस्था ही कॉलेज वरील सह. अधिव्याख्याताची असते. संस्थे मध्ये असणारा सह. अधिव्याख्याता याचे तर फार हाल असतात, मानधन नावाखाली ३००० ते ५००० आणि मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर मोठ्या मुश्किल ने ८०००-१०००० मिळतात. खरच सांगा कसा जगेल तो अधिव्याख्याता आणि तो कलाकार असेल तर त्याला लागणारा कलर ,कॅनवास आणि कलेच साहित्य याचे काय ? समजा एव्हड्या मानधनावर काम केल हि तरी पैसा घेतल्याशिवाय कुठली हि संस्था भरत नाही आणि भरेलच याची काहीच खात्री नसते. मित्राचा किस्सा ऐकून तर थक्क झाल मला त्याने १० वर्ष नावाजलेल्या संस्थेत जॉब केला ज्या वेळी कायम करण्याची वेळ आली त्या जागेवर दुसरा भरला,याने जाब विचारला असता कळले याचे पैसे ज्या माणसाच्या हाती दिले त्याने ते पुढे दिलेच नाही. बिचारा
असे समाजात खूप आहेत ज्यांच्या सोबत अश्या गोष्टी घडल्यात, पण कागदपत्रांच्या भरवश्या वर नोकरी नाही मिळत आता ,,,किमान कला क्षेत्रात तरी
असे समाजात खूप आहेत ज्यांच्या सोबत अश्या गोष्टी घडल्यात, पण कागदपत्रांच्या भरवश्या वर नोकरी नाही मिळत आता ,,,किमान कला क्षेत्रात तरी
मी रयत मध्ये २ वेळा मुलाखत दिली . मुलाखतीत नाव ,गाव ,पत्ता, तुम्ही रयत चे विद्यार्थी आहात काय ? असे प्रश्न विचारले होते. ठीक आहे या आपण, आम्ही कळवू आपल्याला. बस झाली मुलाखत,,,,,,, पहिल्या वेळी किमान फलक लेखन तरी करायला लावल होत.
मला माझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगावसा वाटतो ,२००८-०९ चा काळ होता तो,,, मी वसई येथील वसई विकसिनी दृक कला महाविद्यालय च्या मुलाखती ला गेलो होतो. मुलाखत झाली माझ काम ही मुलाखत घेणाऱ्या सर्व सभासदांना आवडले होत .नंतर मला सांगितले ३ तारखे पासून रुजू व्हा. मी सर्व तयारी केली नालासोपारा वेस्ट ला २५०० रु रेंट चे घर भाड्याने घेतले होत. मी खूप खुश होतो , ५००० रु मानधन मिळणार होत मुंबईत तस ते पुरेशे नव्हत तरीही माझी स्वारी मात्र खुश होती . त्या मागे कारण ही तसच होत मी मुंबईत राहून चित्र वर फोकस करू शकणार होतो. ३ तारीख उगवली मी सर्व तयारी करीत असताना मला त्या कॉलेज चे प्राचार्य गवळी सर चा फोन आला आणि ते म्हणाले आम्हाला dip.a.ed सेकंड क्लास पाहिजे म्हणे आणि तसा Govt.चा रूल आहे म्हणे.
मला रूल ही माहित होता ,,,,जॉब साठी dip.a.ed फक्त पास असणे आवश्यक असते ,,,,मला भांडून जॉब करणे नव्हत. आणि हा जॉब कंत्राटी होता हे विशेष.
मग मी नाराज झालो थोडा काही दिवस करमले नाही,,पण मग मी जे घर भाड्याने घेतले होते तेथे सातत्याने काम करत राहिलो १७ महिने मी त्या ठिकाणी काढले आणि त्या कालावधीत ३ प्रदर्शन केली ,,एक समूह प्रदर्शन नेहरू सेंटर मध्ये केल या प्रदर्शनातून ५५००० हजार रुपयात ३ चित्र विकली गेलीत.ती चित्र फ्लोरिडा येथील अनिवासी भारतीय श्री रवी टाक यांनी घेतलीत,,नंतर २ रे माझा व्ययक्तिक प्रदर्शन प्रदर्शक ला तेथून हि १ चित्र विकले अन ३ रे प्रदर्शन लीला हॉटेल च्या गलरीत केल तेथून दक्षिण आफ्रिकला चित्र गेल. …. या कालावधीत केलेले एक काम Reader's Digest ने प्रकाशित करून मला मानधन हि दिल.
"धन्यवाद" गवळी सर,,, तुम्ही मला डावलल नसत तर मी चित्रावर कदाचित एव्हड फोकस नसतो करू शकलो.
पण म्हणतात ना
"जो भी होता ही अच्छे के लिये होता है।"
"धन्यवाद" गवळी सर,,, तुम्ही मला डावलल नसत तर मी चित्रावर कदाचित एव्हड फोकस नसतो करू शकलो.
पण म्हणतात ना
"जो भी होता ही अच्छे के लिये होता है।"
माझ्या माय-बापाचे शब्द एकले कि कसं तरी होत,,, ते राहून कधीतरी म्हणतातच कि
"काय एवड शिकला आमचा सुनील अन त्याला नोकरी नाही .''
आणि हो महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र परिवारातील कुणी घरी आल्या वर आई विचारते ,
तू पण हेच शिकलास का ?
आणि उत्तर हो आल्यास मग त्याला आई म्हणते
''काय रे भाऊ कशाला केल तू हे शिक्षण.''
आई चा या शिक्षणा हून विस्वास उडाला मात्र माझ्या चित्रावर अजून तिचा ठाम विस्वास आहे.
फक्त तिला वाटते दर महिन्याला एखाद्तरी चित्र विकत रहाव.जगण्यापुरता पैसा मिळत राहावा.
"काय एवड शिकला आमचा सुनील अन त्याला नोकरी नाही .''
आणि हो महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र परिवारातील कुणी घरी आल्या वर आई विचारते ,
तू पण हेच शिकलास का ?
आणि उत्तर हो आल्यास मग त्याला आई म्हणते
''काय रे भाऊ कशाला केल तू हे शिक्षण.''
आई चा या शिक्षणा हून विस्वास उडाला मात्र माझ्या चित्रावर अजून तिचा ठाम विस्वास आहे.
फक्त तिला वाटते दर महिन्याला एखाद्तरी चित्र विकत रहाव.जगण्यापुरता पैसा मिळत राहावा.
यशवंत कला महाविद्यालयात मी फौंडेशन आणि आर्ट टीचर डिप्लोमा केला होता. पुढे तोरावणे सर च्या सल्ल्याने अभिनव ला गेलो G.D.Art पूर्ण केलं,,,नंतर Sir J J School गाठलं,,, कालांतराने २०१४ च्या शेवटी मी यशवंत वर ४००० रु मानधन वर २ महिने काम केल सह. अधिव्याख्याता म्हणून. पण तेथेही मानधन पुरेसे नसल्या मुळे टिकू शकलो नाही ..4 हजार रुपयात कसे जगता आलं असते औरंगाबाद शहरात .या दोन महिन्यात मी खूप काही शिकलो. ज्या कॉलेज ला ए.टी.डी. केल त्या माझ्या कॉलेज ला शिकवायला मिळाले हेच फक्त काय ते समाधान. यशवंत मध्ये तोरवणे सर यांनी शिकवायची संधी दिली त्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे.
शाळेवर कलाशिक्षक नाही झालो मात्र खासगी ट्युशन घेऊन कला शिक्षक होता आले.
खासगी क्लास सुरू करून स्वतंत्र जीवन जगता येत.
आणि ए टी डी झाले की शिक्षक होतं....
सुनिल बांबल
No comments:
Post a Comment