तुम्ही म्हणत असाल कि काय म्हणतोय हा ,,,,,,
" मी दिल्ली जिंकली."
पण खरच सांगतो यामागची गोष्ट फार मोठी आणि रोचक आहे. आपण सर्व शिक्षणातून बाहेर पडलो कि नोकरी अन छोकरी, या साठी चा पुढील पाढा सुरु होतो. अनेकांना नोकरी लागली कि लगेच छोकरी पण मिळते.
पण चित्रकला क्षेत्रात फार हाल होतात नोकरी नाही मिळाली तर. चित्रकलेचे पाणीच न्यारे हो, नुस्त चित्रावर जगायचं म्हंटल कि फार कठीण असत.
माझ नुकतच शिक्षण संपल होत आता घरचे सगळे लग्नासाठी मागे लागली होती. मला नोकरी नव्हती अन चित्रकार म्हणून जगायचं भूत डोक्यावर होत. नालासोपारा ला मी चित्रकार होण्याची स्वप्ने रंगवत आणि एकापाठोपाठ चित्र प्रदर्शने करत ते सकारात हि होतो. पण हे करताना घरचे मुली बघायला बोलवत मग घरी जाणे आणि मुलगी बघून येणे हे सुरु होत. काही ठिकाणी मुलगी आवडली तर ते लोक मुंबई ला येण्यास नाही म्हणायचे.
मुलीकडील मंडळी वेगवेगळे प्रश्न विचारायची .
मुलगा काय करतो ?
शिक्षण काय?
असे ना अनेक प्रश्न असायची.
पण बहुतेक वेळा त्यांना कळायचेच नाही कि नेमक मुलगा काय करतो ?
मग घरचेच सांगायचे की चित्र काढतो.
हो का ?
मग पोटापाण्याच काय ?
आपण कितीही सांगितला कि चित्रातून पैसे मिळतात , चित्र विदेशी लोक विकत घेतात,, मात्र त्यांना ते अतिशयोक्ती वाटायचं.
गावरान भाषेत सांगायचं तर त्यांना अस वाटायचं,,,,, जणू मी काही पण फेकतोय .
त्यावर त्याचं म्हणन असायचे
आमच्या घरी २० ते ३० रुपयात भारी चित्र आणतो अन तेही लमिनेशन केलेल,
मग तुमच चित्र तुम्ही हजारो रुपयाचे सांगता कसा विस्वास ठेवायचा?
तसेही ते विस्वास ठेवतच नसत.
मुळातच चित्रकलेकडे १००० तून एखादा वळतो,अन त्यानेही जर चित्रकार व्हायचा ठरवला तर अजूनच कठीण .
आपल्या समाजात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक या लोकांची नवरदेव मुलगा म्हणून चलती आहे किंवा चांगला व्यवसाय असलेला नाहीतर सधन शेतकरी तरी असावा लागतो,
आणि ,,,,,,,मी तर चित्रकार होतो.
या लोकांना माझ्या भावाला तोंड द्याव लागत असे तो सांगायचा,,,,, पण माझ्या या चित्रकलेतील गोष्टी वर विस्वास ठेवायला कुणी तयार नसायचे. तेव्हा भावाने सांगितले तू कुठे तरी तात्पुरता जॉब बघ. पण मला ते नको होत. पण त्याच्या समाधानासाठी मी खामगाव च्या कॉलेज ला गेलो असता त्यांना माझ काम आवडला पण ते अडीच हजार रुपये देणार म्हंटले, मी नकार देऊन निघून आलो, चिखली च्या कॉलेज मधील प्राचार्य तर दोन हजार देतो बोललेले .
चित्रकलेचा प्राध्यापक आणि पगार किती ?
दोन हजार , अडीच हजार आणि खूप झाल तर मुंबई पुण्याच्या ठिकाणी पाच ते आठ हजार ,,,,आणि काय तर म्हणे आर्ट कॉलेज वर पप्राध्यापक आहे.
तो अध्यापक कायम असेल तरच खर,,,,,,,, नाही तर काही खर नाही.
असो
याच बाबीमुळे ,,,,,,मी माझ्या भावाला धडक सागितले मी कि समोरच्यांना सांगून टाकायचे कि नोकरी नाही म्हणून.
पण कठीण असता ना.
मी नालासोपाराला राहत असताना,,,
माझ गावच घर साधसुध दगड मातीच अन काही कुडाच अस होत .
घरच्या समोर सप्पर होत,पाऊस आला तर ठिकठिकाणी पाणी टपकायचे त्यामुळे घरातील सर्व भांड्यांना त्यावेळी काम मिळायचे.
घर चांगले नाही,
त्यात वरून नोकरी नाही,
शेती नाही,
कशी मिळणार मला मुलगी,
थोड अवघडच होत आणि त्यात मी चित्रकलेतील मुलगी मिळेल अशी आशा लावून होतो.
या कारणांनी वर्ष कधी निघून जायचे कळायचं ही नाही. मुंबई हून येण्याजाण्याचा खर्च मात्र होत होताच. मग मी गावी जायचं ठरवलं.
नोकरी नाहीच मग किमान घर तरी चांगल असावे नाही का ? म्हणूनच गावी येण्याचा निर्णय घेतला आणि घराचे काम सुरु केल. एक वर्षभरात घराचे काम झाले तर घराविषयी कुणीच विचारे ना.
मग म्हणे शेती पाहिजे होती ,,,या कारणाहून नकार कळवत.
आणि एक गमतीचा विषय सांगतो ,,,जे लोक शेती पाहिजे सांगायचे ते तोंड वर करून म्हणयचे आमची मुलगी शेतात काम करणार नाही बर.
मग कश्याला हवी शेती.
दिवसा मागून दिवस जात होते ,,,आणि मुलीमागून मुली पाहणे चालूच होते. आज बुलडाणा तर उद्या देऊळगाव राजा, बुलडाणा जिल्ह्यातील तर बघितल्याच पण नंतर खान्देश मधील जामनेर, वाकडी तसेच मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद सारख्या शहरावर ही स्वारी झाली, एक तर मुंबई तीलही मुलगी बघायचा योग आला होता. पण मी फोन वर त्यांना अगोदरच सांगितले कि मी मुंबईत कायम राहीलच असं नाही आणि नंतर त्यांचा फोनच नाही आला.खूप स्वाऱ्या झाल्या पण प्रत्येक स्वारी अयशस्वी व्हायची. अश्या खूप स्वाऱ्या झाल्या चिखलीत सुध्दा मी ४ मुली बघितल्या होत्या. त्यातील एक तर जवळ जवळ जमलच होत, पण ते नियतीला मान्य नसावे.
तसे जे ही घडले ते चांगल्या साठीच घडल असावे, पुढे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण येणार असावा. अस समजून मी पुढच्या दिवसाची वाट बघायचो.
माझी लग्नासाठी एक अट होती कि किमान मुलगी १२ वी च्या पुढे शिकलेली हवी,म्हणजे पदवीधर असेल तर फारच छान. पण आमच्यापर्यंत तश्या मुली खूप कमी पोचायच्या, आणि आलेच तर त्यांना नोकरी पाहिजे असायची. काही नोकरी करणाऱ्या मुलींचे स्थळे आमच्याकडे आली पण मला नोकरी करणारी मुलगी नको होती.
बर्याच मुली बघून ही यश मिळत नाही , मग मात्र आमची स्वारी वधू-वर मेळाव्याकडे वळली, आम्ही माझा biodata दिला त्यात खाली स्पष्ट शब्दात उल्लेख होताच ,,,,,मी नोकरी करत नाही. पाहिलं वर्ष गेल, आम्ही त्यातील चित्रकलेतील शिक्षण घेतलेल्या मुलींच्या घरी संपर्क साधले , पण ते ही चित्रकाराला मुलगी द्यायला तयार नव्हते. अस का ?
मी या पुस्तकात नाव नोंदणी करण्या अगोदर चित्रकलेतील मुली बघितल्या, पण रेशीमगाठी काही जुळून येत नव्हत्या. मग त्या पुस्तकाचे दुसर वर्ष आला आणि परत एकदा त्यात biodata दिला.
पण नाही…. काही उपयोग झाला नाही.
धामधुमीचा काळ होता. सगळीकडे लगीनघाई होती. मुली बघण्याचे कार्यक्रम तर चालूच होती , मी माझी बाजू हि खूप चांगल्या पद्धतीने मांडायचो, पण यश मात्र येत नव्हते. अनेकांना तर मी माझे बँक चे पुस्तक हि दाखवायचो ,पण तरीही विस्वास बसत नव्हता हो त्यांचा,आम्ही सर्व खर सांगायचो,
मी असे कितीतरी उदाहरणे बघितले कि लग्न होइपर्यत नोकरी दाखवणारे अन नंतर ते सोडून देणारे ,,,,
पण आपण एव्हड प्रामाणिक वागूनही आपणासोबतच असे का घडावे ?
हळूहळू मी निगेटिव्ह होत चाललो होतो , माझी चिडचिड वाढत चालली होती काही झाल कि मी लगेच चिडचिड करायचो , कधी आई वर तर कधी भावावर ,तर कधी मुलगी सुंदर सांगून नेणाऱ्या मध्यस्थी असलेल्या माणसावर ही.
मुलगी दाखवणाऱ्या माणसाची सौंदर्या विषयी ची कल्पना आजपर्यंत ही मला कळली नाही.
त्या वेळी मला सुंदर मुली फक्त रस्त्यानेच दिसायच्या.असो काही आर्ट मधील मित्र म्हणायचे काय राव सुनील तू तिकडचीच पटवायची होती ना. पण ते सगळ्यांना नाही जमत.
एका पाठोपाठ मित्राची लग्न जुळत होती सुरवातीला मी अनेक मित्राचा लग्नात गेलो खुश ही असायचो पण नंतर मी चिडचिडा होत गेल्याने मी नेहमी नाराज नाराज राहायचो, मला कुणाच्या हि लग्नाला जायची इच्छा नसायची. मी घरच्यांनी किती ही सांगितले तरी कुणाच्या लग्नात त्या वेळी जात नव्हतो. मी खूप कठीण परीस्थित आणि कोमजलेल्या मनस्थितीत जगात होतो . तश्यातच माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न धरल, जाने तर आवश्यक होतेच बाकी ही सर्व मित्र येणार होते ,,,कसाबसा मी गेलो.
लग्न पैठण ला होत,,,,,,,सोमनाथ आणि प्रतिक्षा च
संजय टिक्कल , संजय खोचरे , नवनाथ क्षीरसागर , ऋषी जगनाडे निखिल गिरी आणि नितीन आलेले होते,,,,आम्ही सर्व मित्र तेथे पोचलो होतो, मी मात्र मनाने हरवलेला होत, बाकी चे सोमाच्या घोड्यासमोर नाचत होती, कसा बस दिवस काढला मी तेव्हा. सोमा च लग्न चं थाटामाटात झाल. खूप दिवसानंतर आम्ही मित्र भेटलो होतो.
हे सर्व चालू असताना मात्र मी चित्रावर कधीही दुर्लक्ष नाही केल. चित्र करून प्रदर्शने करत राहणे हा उपक्रम सातत्याने चालूच होता.
लग्न न जुळण्यात बऱ्याच गोष्टी आड येत होत्या , त्या म्हणजे माझ शिक्षणामुळे वाढलेले वय,परिस्थिती,माझ्या कडे पक्की नसलेली नोकरी,शेती, अश्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्यात परत आपला स्वाभिमानी बाणा.वय वाढल्यामुळे म्हणूनच मी शिक्षणाची अट टाकली होती आणि तश्याच मुली शक्यतोवर पाहायला जायचो . मी जवळपास २७ मुली बघितल्या त्यातील ४-५ मला आवडल्याही त्यातील काहीच-आमच जुळणारच होते पण काही ना काही कारणाने जुळत नव्हते अस करता करता २०१२ साल आल ,,,,,लगीन घाई ने जोर पकडलेला ,,,,मे महिना चा शेवट होता तो ,जे ते लग्नकार्यात मुली बघण्यात मग्न होती. आणि भावाकडे एक निरोप आला, मुलगी देखणी अन शिकलेली आहे म्हणे. तुम्ही एक वेळ बघून घ्या. माझ दिल्ली ला पुढील आठवड्यात ग्रुप प्रदर्शन होत. पण मी विचार केला, चल सुनील आलेली संधी कश्याला सोडायची बघून तर घे जे व्हायचे ते होईल. मी,भाऊ अन तो व्यक्ती आम्ही तेथे गेलो ,छान घर अन लोक बघून हि प्रसन्न वाटले. कांदा पोहे चा कार्यक्रम झाला ते चालू असताना नेहमीसारखी मी माझी बाजू मांडली.नंतर मुलीला बोलाविले , जशी ती आतून आली पाहिल्या क्षणी ती मला आवडली. प्रश्नोत्तर चा कार्यक्रम हि पार पडला आणि आम्ही निरोप घेतला , मी सहज मागे डोकावून पाहिलं असता ,मुलीची आई आणि वाहिनी खूप लांब जाई पर्यंत आम्हाला बघत होते.
मी मात्र नेहमीप्रमाणे जे होईल ते नशिबावर सोडून दिल्ली ला निघून गेलो.
आकार ग्रुप अजमेर,राजस्थान याच्या सह माझी काही चित्र ललित कला अकादमी, दिल्ली मध्ये लागली होती. रोज गल्लेरीत वेगवेगळी लोक येत चित्र बघत किंमत विचारात आणि पुढे जात होती.त्यातच महाराष्ट्रात घडामोडीं नी चांगलाच जोर पकडला होता,दिल्लीतील प्रदर्शनाची बातमी लोकमत च्या माध्यमातून थेट बुलडाण्यातील त्या घरी पोचली होती. जणू काही लोकमत ने माझी पावती च त्यांना दिल्ली.
दिल्लीत प्रदर्शनाचे एका मागोमाग दिवस जात होते , एक व्यक्ती चित्र पाहत होता,पाहत पाहत तो बाहेर जाण्याच्या दिशेने वळला. मला कळले होत त्याला माझ चित्र समजल नाही. मी लगेच उठलो न त्याला थांबवल त्यांना मी माझ्या चित्रात नेमक काय आहे आणि चित्र कस पहा हे सांगितले, ते चित्र पाहायला लागले. चित्र पाहता पाहता त्या विषयी विचारात होते. त्यांना काम आवडल होत त्यांनी किंमत आणि काही गोष्टी नोट करून ठेवल्या जाताना आमचा catlog हि सोबत नेला. मला बर वाटल.
प्रदर्शनाचा शेवटचा दिवस उगवला, आणि सकाळीच बोस्टन हून फोन आला कि तुमची काही चित्र घेण्याचे फायनल झाल म्हणून ,,,मी मात्र जाम खुश झालो होतो कारण अगोदर च्या रात्री भावाचा फोन होता कि बुलडाणा हून हि होकार असल्यासारखे आहे. खुशीतच मी गल्लेरीत गेलो,तर दुपारी मला massage आला होता ,,,त्यात लिहिले होते ,,,,,सुनील मला Couple Village (blue ) हे चित्र घ्यायचं आहे , पण माझ बजेट थोड कमी आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही गल्लेरीत या , आपण बघू .
शेवटचे ४० मिनिट उरली होती ,आम्ही आता चित्राची आवराआवर सुरु केली होती , आणि तो व्यक्ती आला त्यांनी ३०,०००/- किंमत असलेले २७,०००/- एक चित्र विकत घेतल , catlog वर माझी स्वाक्षरी घेतली अन मी त्यांची .तो German व्यक्ती म्हणजेच Olaf Winkelman.,त्यांची चित्र आम्ही व्यवस्थित आम्ही त्यांच्या कार पर्यंत पोचवली. मग आवराआवर चालू असताना प्रदीप दादाचा फोन आला लवकरात लवकर दिल्ली हून परत ये कुंकू टिळक आणि साखरपुड्या चा कार्यक्रम आहे म्हणे, मी लगेच जनरल चे तिकीट काढून भुसावळ आणि नंतर चिखली ला आलो.
दुसऱ्या दिवशी बुलडाणा ला साखरपुडा होता , मी माझ्या भावी बायको साठी चित्राच्या पैशातून ४.१० ग्रॅम ची सोन्याची अंगठी केली आम्ही सर्वच्या साक्षीने एकमेकांना अंगठी घातली,,,,त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने वाटला आपण दिल्ली जिंकली. मला खूप कष्टाने बायको मिळाली आहे त्यामुळेच मी रुपयाही हुंडा न घेता लग्न केले .
सुनिल बांबल.