http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

देशमुखां च,,, वैभव (०९/०४/२०१५ ),,,१७


मी औरंगाबाद ला यशवंत कला महाविद्यालयात शिकत असताना सुरवातीला संजय नगर मध्ये राहायचो, नंतर बाबुराव काळे आणि मी गजानन नगर मध्ये शहाणे मामा च्या घरी राहायला गेलो . शहाणे मामा ची रूम मध्ये मला कधीच भाडेकरू म्हणून वाटले नाही. मामा घरी असो व नसो आम्ही खूप मिळून मिसळून राहिलो. बाबू आणि मी रूम वरच जेवण बनवायचो.
मंगलताई चे आणि बाबू च लग्न झाल होत आणि प्रथम वर्षाचे ३ महिने जवळपास बाकी होते. मात्र मंगलताई आणि बाबूने मला जाऊ दिल नाही,,,त्यांनी परीक्षा झाल्यावरच जायचं असं ठाम सांगून टाकल,,,,आणि मग दुसऱ्या वर्षी मी रूम केली. आमचे बंध खरोखर किती जुळले होते.
मी गजानन नगर सोडून कॉलेज च्या जवळ च गजानन कॉलनी मध्ये वाघ च्या खोलीत आलो. मी,ज्ञानेश्वर शिंगणे,आणि सुरेश वाघ आम्ही तिघे सुरवातीला राहायचो मग सुरेश रूम सोडून गेल्यानंतर चंद्रशेखर साखरे आला अन "आपली अंघोळ " हा डायलॉग खूप गाजला आमच्या त्या मजल्यावर.आमचा तो मजला खूप भारी होता आमच्या रूम च्या बाजूच्या रूम एक ब्राम्हण कुटुंब होत ते बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई च आणि एका रूम मध्ये एक पेंटर राहायचा तो ही योगायोगाने आमच्याच गावाकडचा होता.
तो पेंटर म्हणजेच वैभव देशमुख.
बुलडाणा जिल्ह्यातील चांडोल हे त्याच गाव. तो तसा गावाकडे जास्त जात नसे, तो निंबाळकर पेंटर कडे काम करायचा. बर्याच वेळा सांगायचं कि पाहिजे तेव्हडा मोबदला मिळत नाही.त्याच्या मनाची घालमेल कळायची पण आम्ही काही करू शकत नसे,,,,,त्याची एक जमेची बाजू म्हणजे कविता आणि शिंगणे पक्का रसिक माणूस,,,आम्ही वैभव च्या कविता ऐकायचो. मी विचार करायचो याच्या इतक्या कविता पाठ कश्या. एक दोन नव्हे तर खूप खूप कविता तोंडपाठ असत त्याच्या. तो आम्हाला मराठी भावगीत हि ऐकवायचा,,,,मला त्याच्या तोंडून एक गीत खूप एकवास वाटे,,,,,दिल्या घेतल्या वाचनाची शपत तुला आहे. असे अनेक.
त्याच्या कविता ह्या तयावी दुखद असत,,,दुःखाचा भाग जास्त असायचा.
कधीकधी दत्ता , नागनाथ यायचे,, वांग्याची भाजी नागनाथ खूप भारी करायचा,,,आम्ही जेवण बनवायचो मस्त जेवायचो.त्या रात्री गप्पा रंगायच्या मस्त त्याला जोड वैभवच्या कविता अन गाण्याची असायची.
नागनाथ ने त्यावेळी लोकमत वरील ओळ फार गाजवली ,,,,,''काबुल पे भारी बमबारी,हमले अभी भी जारी''
औरंगाबाद च शिक्षण संपल्यावर जे ते जिकडे तिकडे पांगले,,,मी पुण्याला जी डी आर्ट साठी गेलो. अधून मधून औरंगाबाद ला चक्कर झाली कि वैभव ची भेट व्हायची. नंतर त्याने स्वत: दुकान टाकल होत. त्याच्या कडील कविताचा साठ बघून आम्ही त्याला म्हणायचो ही कि तू कवितासंग्रह का नाही काढत. तो फक्त हसायचा अन नाही राव आताच नको म्हणयचा.नंतर आमची भेट कमी होत गेली,फोन व्हायचा कधीतरी.
असाच एकदा फोन आला होता त्याचा मला मुखपृष्ठ साठी ,,,,मी त्याला सांगितल होत मला ते नाही कस जमत. पण माझ्या पेंटिंग पैकी वापरता आले तर बघ. पण काही कारणाने माझ्याकडून उशीर झाला, मी ज्यावेळी मेल पाठविला होता त्यावेळी त्याच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार झाले होते,,,,मी मात्र एका काविमित्राच्या पुस्तकाच्या मुखपृष्टाला मुकलो होतो.
वैभव देशमुख हा सध्या पुण्यात असतो, आणि तो सध्या एक चांगला गुणवान कवी म्हणून नावारूपाला आला आहे. त्याचा "तृष्णाकाठ" नावाचा काव्यसंग्रह बाणगंगा पब्लिकेशन ने प्रकाशित केला आहे. त्याला भरपूर ठिकाणी काव्य वाचनास निमंत्रित केल जात.आणि त्याला साहित्यातील अनेक नामाकीत पुरस्कार ही मिळाले आहेत.
वैभव तुझे शब्द देश-मुखात पोह्चो ही श्री चरणी.
नागनाथ, दत्ता, शिंगणे,,,,,, कला शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.सुरेश वाघ नाशिक ला आहे बहुतेक,,,,आणि,,,, साखरे मात्र आम्हा सर्वाना सोडून निघून गेला.
सुनिल बांबल

सेवा संकल्प (०८/०४/२०१५)लेख १६


बाबा आमटे ,डॉ प्रकाश आमटे आणि कुटुंब यांच्या प्रेरणेतून चिखली शहरात काही तरुण एकत्र आली. त्यांनी समाजातील मनोरुग्ण ,भटके ,गरजू स्त्री पुरुष सेवा सुरु केली,,,या लोकांना रोज जेवण देणे तसेच रविवारी त्यांना अंघोळ घालणे , त्यांची नख काढणे , दाढी करणे. आपल्याकडील कपडे देणे. असा उपक्रम राबवत आहेत.
चिखली शहरात या सेवा संकल्प च्या तरुणांनी एक मुलाखतीचा कार्यक्रम घेतला होता. सागर जाधव नावाचा माझा मित्र त्याच्याकडून मला कळले कि डॉ. धामणे दांपत्य चिखली ला येत आहे. मी आणि सचिन बाजे दोघ त्या मुलाखतीला गेलो. पाहिजे तसी गर्दी नव्हती,,,,कारण तो कार्यक्रम सामाजिक स्वरुपाचा होता आणि तो ही विनामूल्य.असो आपल्याकडे जे विनामूल्य असत त्याला खरच काही किंमत नसते.
मुलाखत सुरु झाली ,,,एक एक किस्सा ते सांगत होते. जशी जशी मुलाखत पुढे जात होती तसे तसे मन भरून येत होते. त्यांची सुरवात कशी झाली त्यांना समाजाने तर सोडा पण सख्या भावकी नेच कस वाळीत टाकल. ते सांगत असताना खूप जन हळहळत होते,,,,मग तो पांडुरंगाचा किस्सा असो वा आक्काचा.त्या हृदयस्पर्शी मुलाखतीने मला ती रात्र झोपच नाही आली…राहून राहून ते किस्से डोळ्यासमोर येत होते. समाजात पाशवी प्रवृतीचे ते स्वरूप एकूण जो त्रास झाला तो कधी पेपर मधील बातम्या वाचून नाही झाली.
या मुलाखती मुळेच मनाने मी त्या कुटुंबासी जोडला गेलो आणि सेवा संकल्प परिवाराशी ही.
सात आठ दिवसापुर्वी मी गेलो होतो संध्याकाळी सेवा संकल्प च्या टीम सोबत,,आम्ही बस डेपो, धान्य मार्केट , शिवाजी रोड, डी पी रोड , खैरु शाह दर्गा,,,, अश्या विविध ठिकाणी जाऊन तेथील गरजूंना खिचडी दिली. किती लोकं आशीर्वाद देत होते.मला आईच्या आजारामुळे परत जाता नाही आल.
नंदू पालवे , नारायण भाऊ , आणि ताई व सर्व सेवा संकल्प टीम यांच कौतुक काय कराव,,,,मी तर नतमस्तक आहे यांच्या कार्यासमोर.
सुनिल बांबल.

माझं चिखली शहर (०७/०४/२०१५)लेख १५


चिखली शहर हे तसे खूप जुने शहर आहे ,,,जुन्या गावात शंभर वर्षाहून ही जुनी घर,वाडे आहेत, खूप जुनी नगर पालिका आहे, बोंद्रे घराण्याचा वारसा या शहरास अन नगरपालिकेस लाभला आहे,मागील काही वर्षात या शहराचा सौंदर्याच्या दृष्टीने चांगला विकास झाला. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप,जयस्थंभ चौकातील अशोक वाटिका त्यातील डॉ. आंबेडकर ,फुले यांची स्मारक त्याचं काम प्रगतीपथा वर आहे, शहरात जून शिवाजी उद्यान नव्या रूपाने परत एकदा उभे झाले. तिकीट लावल्याने काही काळ त्यातील वस्तू ची काळजी नक्कीच घेत येईल. मोठ मोठे हॉस्पिटल ची भर पडली. मानवाच्या जीवनातील अंतिम ठिकाण ही फार सुंदर झाल आहे,,,,भगवान भोलेनाथ तेथे शांत मुद्रेत विराजमान झाले,,,आपल्या भक्तास घेऊन जायला स्वत: जातीने हजर असतात ते.
MD डॉ नी आपली पाळमूळ घट्ट बसवली.
खूप वर्षापूर्वी आलेली MIDC खर्या अर्थाने आता चिखलीत नांदू लागली. पण तरी तिला पाहिजे तास स्थळ मिळाल नाही,,,तीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला,,,,, खामगाव-जालना रेल्वेमार्ग झाला पाहिजे. म्हणजे तीचा बराच ताण वाचेल, तीला कच्चा माल सहज आणि कमी खर्चात मिळेल.आणि दोन पैसे जास्त गाठीशी बांधता येतील. यासाठी चिखलीतील राजकारणी नि एकत्र येउन तो रेल्वेमार्ग चालू करून घ्यावा …नुसतेच श्रेय घेऊ नये. ब्रिटीश काळापासून आता पर्यंत सुरु न झालेला मार्ग किमान आपल्या मुलासाठी तरी उपयोगात पडेल काय ? हा मार्ग झाला तर प्रवास स्वस्त होईल,बेरोजगारांना काम मिळेल. आणि ज्याच्या कारकिर्दीत होईल तो राजकारणी इतिहासात अमर होईल. चिखली च खूप मोठ मार्केट होईल.
असो ,,,,आशय करायला काय हरकत आहे.
आपण वाट बघूया,,,,खामगाव-जालना रेल्वेमार्गाची.
चिखली शहराच्या मध्यवर्ती राजा टावर आहे त्याच्या वर एक छान मोठा हॉल आहे या ठिकाणी नगरपालिकेने सुसज्ज कलादालन अथवा ग्रंथालय उभ करायला हव. चिखली तील रस्ते चागले व्हावेत ,,रस्त्यावर खूप मोठ मोठी खड्डे आहेत. शहरातून जाणारा राज्य महामार्ग तर कधी चांगला होईल ते देव जाणो.चिखली शहराला होणारा पाणी पुरवठा हि एक मोठी समस्या आहे, पाणी असूनही पाण्याचे योग्य नियोजन नाही, ८-१२ दिवस पाणी साठवून प्यावे लागत. उन्हाळ्यात तर महिन्यातून एक वेळ पाणी येत म्हंटले तरी चालेल मागील उन्हाळ्यात २२ दिवस पाणी नाही नळाला,,,,पालिका अगोदर ८०० वर्षाची पाणीपट्टी घ्यायची ती मागील वर्षी पासून १२०० झाली, मात्र पाण्याच्या नियोजनात सुधारणा नाही.
घरकुल योजनेतून घराचा कायापालट झाला.
शैक्षणिक बाबतीत चांगल आहे चिखली , अनुराधा परिवार , शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिवाजी शिक्षण संस्था याच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय झाली आहे. उरले सुरले चित्रकला शिक्षण हि चिखलीत उपलब्ध आहे.
बँकिंग क्षेत्राने ही फार मोती प्रगती केली आहे,,,राष्ट्रीय कृत बँक, को- ऑप बँक , पतसंस्था अस फार मोठ जाळ निर्माण झाल आहे. चिखली अर्बन ने तर शताब्दी हि साजरी केली.
चिखली शहरात वेगवेगळे धार्मिक मंदिर-मठ ,,, मशीद-दर्गा आहेत , रेणुकामाता मंदिर , अंधारा महादेव मंदिर, पंचमुखी महादेव, हनुमान मंदिरे तर खूप आहेत, मशीद हि आहेत , खैरु शह दर्गा आहे,जेथे खूप दूरवरून लोक येतात.बुद्ध विहार आहेत. उदाशीन महाराज आणि मौनी महाराज हे खूप जुने आहेत ,,,आता त्यात खटकेश्वर महाराज आणि स्वामी समर्थ केंद्र याची भर पडली आहे. सामाजिक कार्याकडे हि चिखली च्या नागरिकांनी झेप घेतली आहे.निरंकारी मंडळ, सेवासंकल्प,फोटोग्राफी असोशिअन, रामचंद्र मिशन, , आणि बर्याच सामाजिक आनी राजकीय संघटना पुढे येत आहेत.
गोर गरीब, कष्टकरी ,व्यापारी-व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार सर्व गुण्यागोविंदाने या शहरात राहत आहेत. रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त सर्व लोक एकत्र येतात आणि यात्रामोह्त्सव साजरा करतात. रेणुका माता मंदिराचा नुतनीकरना तून कायापालट झाला. नुकतीच यात्रा झाली हनुमान जयंती च्या दिवशी,,,फेसबुक वर फोटोग्राफी असोशिअनची पोस्ट बघितली ,,,,स्वच्छता करताना ची ,,,,,अन ,,,चिखली विषयी लिहावस वाटलं.या चिखलीत बराच काही असेल लिह्ण्यासारख ,,,पण मला माहित नाही.
सुनिल बांबल ,चिखली.
चित्रकार

मुळ (२९/०३/२०१५) लेख १३


आमचं मुळ गाव कोणत असा प्रश्न एकदा आई ला विचारला होता. आई म्हंटली कि आपल मुळ गाव ,,,मेहकर भागातील गहुगाव आहे.पण त्याही अगोदर बार्शी टाकळी जवळ बाभूळगाव या गावचे आहोत अस म्हणतात,,,,,,,, आता ते गाव अस्तित्वात आहे अथवा नाही काही पत्ता नाही.
नागरतास म्हणून मालेगाव तालुक्यात छोटस गाव आहे,,,या गावात आमच आराध्य दैवत,,,,,, तुळजा भवानी.
माझ्या आजोबाची बहिण शेळगाव आटोळ ला राहायची म्हणे,,,,,त्यामुळेच आम्ही बांबल कुटुंब शेळगाव आटोळ या गावी वसलो,,,पुढे माझ्या आजी-आजोबांना त्यांच्या आत्याकडे चिखली ला यावे लागले. माझी आजी वारली त्या वेळी माझ्या बाबा ४ थी पास होऊन ५ वी ला जाणार होते पण त्याची आई वारली अन शाळा सुटली ती कायम ची.
३ वर्षाचे माझे काका(श्रीराम चंदनशिव) व आत्या ६ महिन्यांच्या.
माझ्या बाबाचा जन्म चिखली म्हध्ये १९३८ ला झाला,,,,, ४ थी पास होऊन माझ्या बाबांनी शाळा सोडून सुतारी कामाला सुरवात केली. त्या काळात शाळा खूप कडक आणि शिस्तबद्ध असायची,,, ते अजून ३ वर्ग शिकले असते तर एखादी नोकरी मिळाली असती त्या काळात,,,,, अन आमचे जे पैश्या अभावी हाल झाले ते नसते आमचे,,,, असो,,,, पण होनी ला कोण टाळू शकत ना .
आजोबा च फिरते किरणा दुकान होत अस आई सांगते ,,,, आजोबा हेल्यावर ('रेडा') किराणा विकायचे ,,गावोगावी जाऊन. माझे आजोबा तसे माळकरी-वारकरी होते. एकदा का वारी जवळ आली की मग संपल,,,ते पंढरपूर ला वारीत जायचे,,, बाबा आणि भावंडांचे फार हाल झालेले, धान्य पुरेशे नसायचे. भाताचा किस्सा सांगितलेला तो आठवला तर कसतरी होत. आई सांगते की , तांदूळ कमी असायचे, मग हे तांदुळात पाणी जास्त टाकायचे, अगोदर थोड थोड उकळलेले ते पाणी पिउन घ्यायचे व नंतर शिजलेला भात खाऊन झोपी जायचे .म्हणूनच माझे काका आज हि खूप चिकाटीने वागतात बहुतेक.
माझे काका श्रीराम बांबल(चंदनशिव) आई वारली त्या वेळी ३ वर्षाचे पुढे बाबांनी तर शाळा सोडली पण काकांनी चांगल्या प्रकारे शाळा शिकून शिक्षकाची नोकरी मिळविली,बरेच वर्ष नोकरी च्या गावी असत ,,,,काका पुढे मुख्याध्यापक झाले.खूप चांगल झाल त्याचं,,,,, त्यांची मेहनत,चिकाटीने त्याचं आयुष्य बदलले. माझा भाऊ ( काकाचा मुलगा ) आमच्याकडे शिकायचा,,,भाऊ खूप हुशार होता,,,आई सांगते बकऱ्याच्या खोलीत घासलेट च्या दिव्यावर अभ्यास करायचा म्हणे. त्या हुशारीवर तो आज नवोदय विद्यालय समितीच्या शाळेचा सध्या प्राचार्य आहे. मला खरच अभिमान आहे माझ्या भावाचा.तो सध्या आसाम ला असतो.
आम्हाला शिक्षण देऊन सुशिक्षित बनविणारी म्हणजे माझी आई. आई ने खूप हाल अपेष्टा तून आम्हाला शिकविले.माझी बहिण आठवीपर्यंत शिकली भाऊ BA झालेला. आणि मी G D Art झालो.
आमच्या सर्वांच्या जीवनात आई ने खूप मोलाची भूमिका बजावली आहे,,,,बायको,आई,बहिण,लेक,सासू, आणि आजी अश्या अनेक भूमिका बजावल्या आईने. त्या मी सविस्तर मांडेल पुढील लेखात.
सुनिल बांबल.

आर डी चौधरी सर आणि शिस्त (२६/०३/२०१५) लेख-१२


         जी डी आर्ट चा डिप्लोमा करून आलेल्या मुलांना डीप ए एड ला खूप शिस्तीत वागायची वेळ येते आणि त्यातल्या त्यात जर ती अति शिस्त असेल तर मग काय बोलायचे....सरांची शिस्त फार कडक होती.मुलांनी वर्गात वेळे वर यायला हा त्यांचा अट्टाहास असायचा.
मुंबई तील लोकांना वेळेचे म्हह्त्व खूप असते, मुंबईतील माणूस हा सेकंदावर चालणारा,,,काही सेकंद जर लेट झाला तर ट्रेन निघून जाणार आणि त्याला घरी पोचायला हि वेळ होणार, असच काही आमच्या वर्गातील सर्वांच होत,,,,कुणी ही उशिरा आल तर त्याला काही वेळबाहेर उभे राहून वाट पहावी लागत असे,,,जर सरांनी हिरवी झेंडी दाखवलीच तरच त्याची एन्ट्री वर्गात होत असे.
कधी वेळे हून कधी रंगीत शर्ट हून वर्गाबाहेर ,,,,,kk साठी तर हा अनुभव बऱ्याच वेळा यायचा.
वर्गात कचरा करायचा नाही,कचरा केला तर डेक्स मध्ये टाकयचा म्हणे ,,नेहमी निलेश ला सांगायचे,,,, आल लक्ष्यात. नाशिक अन पुणे च्या मुलावर तर त्याचा खूपच राग असायचा ,,,का ते मात्र शेवटपर्यंत कळले नाही.मग तो तेजाळे असो वा गोकुळ,,,,पुण्याहून येउन हि नाशिक चा अन चित्रकलेच्या क्षेत्रातील प्राध्यापकाचा मुलगा असल्याचा नयन नगरकर ने हि चांगलाच अनुभव घेतला.क्रिकेट खेळताना गोकुळ चा पाय मुरगळला होता, पायाला प्लास्टर केल होते पण त्यांना त्याच काहीच वाटल नाही कारण म्हणे तो त्या दिवशी वर्गातच नव्हता,,,,,,मग तो वर्गात नव्हता म्हणून त्याची जबाबदारी नाही घेतली त्यांनी. माझ्या विषयी मात्र वेगळेच घडायचे.
निघायला उशीर झाला म्हणून मी कॉलेज ला गेलो नव्हतो,,,मात्र मी वासुदेव कामात सरांचे जहांगीर ला प्रदर्शन होत.त्या प्रदर्शनाला हजर होतो आमच्या वर्गातील बरीच मुल हि होती. आम्ही सर्व ते प्रदर्शन एन्जोय करत होतो. त्या प्रदर्शनाला अभिनेते नाना पाटेकर आलेले होते,,,,मी नाना चा चाहता आहे, त्यामुळे मी मित्रांना म्हणालो ,,,यार मला नाना ला भेटायचे. आणि लगेच नाना पाटेकर कडे जाऊन,,, ,मीच बळजबरीने,,,,,नाना चा हातात हात घेत,,,मी नाना ना म्हणालो , "happy new year सर " ते हि मला same to you म्हणाले, या आनंदाच्या भरात उड्या मारत बाजूला झालो,,,पण हे चौधरी सरांनी बघितले होत. आणि त्याच क्षणी माझ्या आनंदावर सर्व पाणी फिरलं होत. मी गुपचूप मित्रांमध्ये मिसळलो.
या गोष्टीचे पडसाद दुसऱ्या दिवशी माझ्यावर चालून आल होत. अगोदर च्या दिवसी वर्गात नसाल तर त्याच्या कारणासह अर्ज द्यावा लागत असे,अर्ज देऊन ही सर सांगतील तेव्हाच वर्गात बसायचे ,,,मला बराच वेळ ऑफिस बाहेर उभ केल, मग बोलवलं आणि मला म्हंटले जा कॉलेज ला कशाला आला,तुझा जहांगीर अड्डा आहे न जा तिकडेच, आणि हो पालकांना घेऊन यायचं ,,,आणि नंतर वर्गात बसायचं.मी सरांना म्हंटलो, सर माझे पालक रिकामे नाही तुम्हाला भेटायला यायला ,,,आणि त्यांना चित्रकलेतील काही कळत ही नाही, आणि तरीही त्यांना तुम्हाला भेटायला यायचे तर १५०० रु लागतील न त्यांचे २ दिवसाची मजुरीही डुबेल म्हणजे २००० रु खर्च करणे त्यांना सांगितल्या पेक्ष्या मला काढून टाका वर्गातून.
हे एकूण त्यांना माझा खूप राग आला होता,पण नंतर काय वाटले त्याना देव जाणो ,,,,मला वर्गात बसायला सांगितलं.
मला मोबाईल वरून तरी बोलायचे, सर आज येणार नाही कळला आणि मी मोबाईल चार्जिंग ला लावत नाही तोच सर वर्गात आले अन मोबाईल चार्जिंग ला लावलेला काढून घेतला आणि पूर्ण दिवस दिलाच नाही.
कुणी मित्र येऊ द्यायचा नाही, दुसऱ्या विभागात ही जायचे नाही, कुठे गेला तर अर्ज द्यायचा ,,,,असच एकदा शुभांगी राजपूत मुंबई ला आली होती.म्हणून मला भेटला आली,,, मी सरांना मला जायचं म्हणून अर्ज द्यायला गेलो तर नाही म्हंटलेले,,,कुणी आल तर कुठेही जाल का ? या गोष्टी चा मला मात्र राग आला अन त्या रागाच्या भरातच मी तो अर्ज ऑफिस म्हध्ये फाडून टाकला. याहून हि वाद झालाच
चौधरी सर मी अन वाद जणू समीकरणच बनले होते.
JJ मध्ये कलादीप नावाचा उपक्रम असतो ,,,या उपक्रमात प्रत्येक विभागातील विद्यार्थी सहभागी होत असत. दर आठवड्याला एका विद्यार्थ्याचे प्रदर्शन असे वर्ष भर प्रदर्शन भरविले जायचे,,,,ते प्रदर्शन JJ च्या इमारतीच्या तळमजल्यावर लावले जायचं. मी ही सहभागी झालो होतो त्यात,,मी जलरंग आणि कोलाज मधील निसर्गचित्र आणि कोलाज मधील व्यक्तिचित्र लावली होती. आठवडा संपल्यानंतर मी शनिवार असल्याने एक चित्र वर्गात ठेवला,,,,त्या चित्र हून चौधरी सरांनी वाद घातला म्हणे हे चित्र वर्गात ठेवायचे नाही,,,,मी सरांना म्हंटल मी या वर्गाचा विद्यार्थी आहे तर याच वर्गात ठेवणार ना पण,,,,,.आज चा शनिवार आहे सोमवारी मी नेतो परत ,,,पण ते ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी मी चित्र BFA fy च्या वर्गात ठेऊन आलो.नंतर मला ऑफिस मध्ये बोलाविले मात्र मी ही ठाम होतो त्यांना म्हंटले तुम्ही माझी बाजू ऎका ,,,पण ते म्हंटले मी तुला तुझी बाजू ऎकायला नाही तर माझ ऎकायला बोलवील,,,मी ही नाही ऐकलं त्याचं आणि निघून आलो.
मग तर काही ही कारणाहून मला त्रास देन सुरु झाल होत.
सर आम्हाला अध्यापन हा विषय शिकवायचे ,,सुरवात छान असायची पण शिकवता शिकवता ते त्यांच्या गोष्टी सांगायला सुरवात करायचे मी औरंगाबाद ला हे केल, नागपूर ला अस केल माझा खूप दरारा होता वैगेरे वैगेरे ,,,,,आणि ते खर हि होत त्यांची खूप दहशत jj त ही होती.आम्ही वर्गाबाहेर असल आणि चौधरी सर आले कळला तर लगेच वर्गात पळायचे. सर मधेच अध्यापनाचे शिकवायचे आणि हे जवळ पास ५ ते ६ वाजेपर्यत चालायचं आणि नंतर त्यावर tutorial लिहून सांगत,,,अन ते हि त्या साठी ग्रंथालयाची मदत घ्यायची कोणत्या पुस्तकाचा संदर्भ घेतला तेही लिहायचं.
मुळातच ५ ते १० चा ढ विद्यार्थी मी मला थेअरी म्हंटला कि अंगावर काटा यायचा. आनि एवड्या उशिरा कोठून संदर्भ आणायचे,,,, मी दुसऱ्या दिवशी आलो कि लगेच शिल्पा , निलेश नाहीतर कुणाच्या हि tutorial पाहून लिहून टाकायचो.
आणि सर ते परत लिहायला सांगायचे नाही तर बाहेर घालवायचे आम्हाला,,,असे अनेक प्रसंग वेगवेगळे अनुभव सर्वासोबत घडत होते.
मग पाठ घेण्याची वेळ जवळ आली त्यात नेमक ज्या दिवशी शाळा दिल्या त्या दिवशी मी हजर नव्हतो,,,,असे योगायोग माझ्याशी घडायचे.मग काय सरांना परत खुन्नस काढायची संधी मिळाली, आता मात्र माघार घेऊन गोडीगुलाबीने पाठासाठी शाळा-कॉलेज मिळवणे गरजेचे होते,,आम्ही सर जवळ गेलो तर त्यांनी आम्हाला हुडकून लावले. मग मी जो पर्यत ते बोलवत नाही तो पर्यंत परत गेलो नाही,,,मग त्यांनाच दया आली, वसई ची वर्तक शाळा दिली मला तरी कॉलेज निश्चित होत नव्हत.
शेवटी sir j j school of art च्या ATD वर्गावर शिकवायला मिळालं ,,,,,ते दोन दिवस का हो पण मी JJ त शिकविल. मी खुश होतो. मला कुठला ही खर्च लागत नव्हता कॉलेज च्या पाठासाठी,,,मी ATD प्रथम वर्ष च्या मुलांना डेमो देत असताना वर्गात चक्कर मारली होती त्यांनी आणि पाठीवर थाप मारून कौतूक हि केल होत.
त्यांचे हेतू चांगले होते पण त्यात जी अतिशिस्त होती ती एक वादळ घेऊन आली त्याची काही नियम त्यांच्या लक्ष्यात आली नाही. त्यामुळे मोठे वादळ आल आणि त्या वादळात सर्वच होरपळली.
माझी जशी स्टोरी आहे तशीच थोडीफार वेगळी पण त्रासदायक प्रत्येकाची आहेते काहीना जवळ धरायचे काहीना दूर,,हि त्यांची "फोडा आणि राज्य करा" या म्हणी नुसार खेळी असायची ते आम्हाला पुढे कळला. नयन नगर कर ने तर कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला , वैशाली ने तर कॉलेज सोडून हि दिल होत.
ज्याचा त्याला त्रास माहित,,,,म्हणतात न ज्याची जळते त्यालाच कळते.
अतिशिस्तीचे फार वाईट परिणाम झाले त्यातून जो त्रास सर्वाना झाला तो शेवटी एक वादळ घेऊन येण्यास कारणी भूत ठरला.
त्यांच्या शिस्तीत नाही टिकू शकलो आम्ही,.,त्यानंतर एका भावनिक घटनेने सर्वांनाच हलवून टाकल.

वादळापूर्वी ची शांतता (२४/०३/२०१५) लेख-११


       मी यशवंत कला महाविद्यालयातून पुणे गाठल,,,,,अभिनव च्या ४ वर्षात माझ्या कलात्मक आयुष्यात पार बदल होत गेले. यशवंत मध्ये ATD पुरत मर्यादित असलेल्या आयुष्याला ध्येयाच वेड लागल होत…. मला तर अस वाटत कि मी JJ ला गेलो ते माझ्या चित्राला खऱ्या अर्थाने बळकटी मिळावी यासाठी.
माझी घरची परिस्थिती जेमतेम होती. मुंबईत राहायची सोय झाली म्हणजे झाल मग बाकीच सगळ चालून जात. मग पोटापाण्याच माणूस कस ही भागवता येत.. मी आमच्या चिखली च्या आमदार सौ.रेखाताई खेडेकर यांना विनंती केली आणि माझी आमदार निवास ला राहण्याची सोय झाली.नाना ने ही खूप मदत केली. मुंबईत राहण्याचा प्रश्न तर सुटला होता.
डिप.ए.एड च्या मुलाखतीचा दिवस जवळ आला होता, त्यानंतर लिस्ट लागणार होत्या. आम्हाला अगोदर काही नी सागितलं होते. jj ला तर चालले पण जपून तेथे आर डी चौधरी नावाची तोफ आहे जरा जपून वागा. मुलाखती ला एकामागून एक मुल आत जात आणि बाहेर येत. आल्यानंतर जो तो आपले आतील अनुभव सांगत होते. माझा नंबर जसा जसा जवळ येत होता तसा तसे काळजाचे ठोके वाढत होते.
माझी मुलाखतीची वेळ आली.खर तर कॉलेज मध्ये प्रवेशासाठी मुलाखत ती मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.मी दरवाज्यातून परवानगी घेऊन आत गेलो. मला नाव ,गाव विचारले, होस्टेल मिळणार नाही तुम्हाला,,,,राहण्याची व्यवस्था तर आहेना ?
अर्ध्यात सोडून जायचा नाही तर,,,,,,, , असे एकामागोमाग प्रश्नावर प्रश्न सुरु झालेत ,,,,
जणू काही तोफेचे गोळ्यांचा भडीमारच होत होता.
मी म्हंटला हो राहण्याची व्यवस्था झाली माझी, आमदार निवास ला.
लगेच ते म्हंटले,,,, अभ्यास होईल का ?
ते म्हणाले तुझा नंबर लागून जाईल.
लिस्ट मध्ये नाव बघून प्रवेश निश्चित कर,आणि शेवटी हसून म्हणाले तुला ४२१ कस काय पडले रे ?,,,, कोनी दिले तुला ?आणि सगळेच हसायला लागले ,,,,मला काही समाजलच नाही.
त्याच विचारात बुडून मी बाहेर आलो ते अस का म्हंटले असेल,,,,नंतर कळला कि ते मला हसून ४२० म्हणत होते पण त्यात १ मार्काची भर कशी काय पडली हे त्यांना म्हणयचे होत.…
मुलाखत झाली आणि मी गावाकडे निघून गेलो,,,आणि मित्राकडून फोन वर प्रवेशची अंतिम तारीख विचारून बरोबर शेवटच्या दिवसी पाचलो.
गेल्यागेला झापलं राव मला,,,,म्हणे उशीर का ?
मी म्हंटलो उशीर थोडी झाला आजचा शेवटचा दिवस आहे ना , ,,,
लिस्ट बघितली का ?,,,मी म्हंटल नाही,,,,,मला कश्याला बघायची लिस्ट ,,,मुलाखातीलाच तर सांगितलं न तुम्ही की तुझ नाव लिस्ट ला पहिलेच असेल मग मी कशाला लिस्ट बघू ,,,,,, तरीही ते म्हणाले जा लिस्ट बघून ये आणि मी बघून आलो ,,,,पण मला तेव्हा नाही कळला का बघून ये म्हंटलेले. मी लिस्ट बघून आल्यावर मला ऑफिस ला पाठवून प्रवेश निश्चित करायला सांगितला. मी प्रवेश केला.
नंतर त्याच्याकडूनच कळला मी obc मध्ये असताना त्यांनी चुकून माझ नाव sc मधून टाकल्या गेला होत.त्यामुळेच प्रवेश घेतल्यावर हि माझी कागदपत्र चेक केले त्यांनी त्याच्या रजिस्टर मध्ये ही obc च होत ,,,,,,त्यांनी माझ नाव ओपन मध्ये टाकला असत तरी मला प्रवेश मिळालाच असता. पण चुकी कुणाची हि असेल मात्र १ sc कोट्यातील मुलाचा प्रवेश मात्र येथे हुकला.
त्या मुळेच ते मला म्हणत असावे तू लिस्ट बघितली का ?
मला मात्र ते समजला नाही,,,,मला त्यांनी सांगितले त्या वेळी कॉलेज सुरु होऊन बरेच दिवस उलटले होते. ते त्याच्या वेळीच लक्ष्यात आल असत तर आमच्या त्या २५ मधील १ obc कमी झाला असता अन १ sc नवीन वाढला असता……असो हे झाल जर तर.
J J ला महाराष्टातील वेगवेळ्या भागातील विद्यार्थी आले होते ,,,,,त्यामध्ये नाशिक कला निकेतन, अभिनव , कलाविश्वा सांगली ,वसई ,JJ आणि मोठ्या प्रमाणात जे होते रहेजा स्कूल ऑफ आर्ट चे,,,,,आम्ही २५ म्हणजे मी ,नयन , निलेश,गोकुळ,तेजाळे,प्रसाद KK ,साधना ,चंदू ,मिताली,शिल्पा, सोनाली,वैशाली, आनंद, रेश्मा,कुलदीप तांडेल, वैशाली,जतिन,तानाजी,श्रद्धा,अनुजा, तेजा विशाल माली,आणि सर्वात शेवटी उज्ज्वल.
उज्ज्वल मुले सर्व उज्ज्वल झाले.
JJ च्या वर्गात बसण्याचा पहिलाच दिवस होता तो माझा,,,,,, मला नेहमीप्रमाणे उशिरा यायची सवय. … सवयी प्रमाणे उशिरा वर्गात आलो… पहिल्या दिवशी लवकर आत घेतले नाही . नंतर थोड्या वेळाने आत आल्या वर सर्व मुल मुली बोर्ड वर लावलेला अभ्यासक्रम लिहित होते पहिल्या पाना पासून ,,,,आणि मी जाऊन शेवटचे पान सुरु केल होत.
सर्व जन रफ वहीतच लिहत होते मग सुरवातीच पान काय नि शेवटच पान काय.,,,सारखेच ना.
मला बऱ्याच वेळा उशीर होत असे …आल्यानंतर,,,,, आत येऊ का सर ? असे दोन तीन वेळेस म्हंटले पण सर ने लक्ष देत नसत आणि तसच बाहेर उभ करत असत,,,नंतर आत घेत.
असे आमचे अति शिस्तप्रिय आर डी चौधरी सर
सर ची अतिशिस्त खूप त्रासदायक होती …त्यातून JJ त काय काय घडत गेले.
अजून खूप बाकी आहे …….

. J J… . (२२/०३/२०१५) लेख-१०


         या दोन j j मध्ये खूप काही दडलेले आहे. बरीच महान लोक या दोन j नि घडविली . कला क्षेत्रात हे नाव माहित नसेल असे क्वचित कुणी सापडेल. खर तर अनेकांना या दोन j मध्ये शिकायला आवडते. जस कलाकाराला जहांगीर मध्ये प्रदर्शन भरवावे अस वाटत, तसच कलेच्या विद्यार्थ्या ला J J मध्ये शिकव अस वाटत. असच मलाही वाटायचं, मी अभिनव ला असताना bombay art , art socitye च्या एन्ट्री घेऊन मुंबई ला जायचो. मुंबई ला गेलो कि या कॉलेज ला हमखास भेट दिली जायची. त्यामुळे त्या कॉलेज आणि तेथील वातावरणाची जणू मनाला ओढ लागली होती.
अभिनव कॉलेज ला मी डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षाला होतो,,,portrait आणि painting दोन्ही ही पेपर मी माझ्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने सोडवले होते, मी जे डिप्लोमा ला असताना painting करायचो ते कुठल्याही आमच्या सरांना खास पटत नसे तरीही मी मला जे आवडते ते करत होतो. परीक्षेत हि मी तेच केल. तसेच portrait ला हि मी water colour माध्यम निवडले होते , परीक्षेत ७५% डार्क चित्र होत माझ, ढवळे सर मला त्यावेळी म्हंटले चित्र खूप डार्क झाल,,,न आवडल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.पण मला राहुल गोळे म्हंटले सुनिल तुझ चित्र बढीया झाल पूर्ण हॉल मधून.मला थोड बर वाटलं.परीक्षा झाल्यानंतर मी गावी निघून गेलो. त्यावेळी माझ्या कडे फोन नव्हता. सोमा चा नाहीतर संजुभाऊ चा मोबाइल नं वापरायचो आम्ही. मी गावी गेल्यावर संपर्कच तुटला.कुणाकडेच नं नसल्याने पंचाईत झाली होती. माझे तीन छोटी चित्र विकली होती, मांडके सरांना फोन आला होता त्यांनी सोमा, नमिता बऱ्याच जणांना विचारले पण काही उपयोग झाला नाही. मी एक दिवस कॉईन बॉक्स हून नमिताला फोन केला त्यावेळी तिने ते सांगितले होत, मग मी तिला जवळच्या मित्राचा नं दिला होता.
त्या वर्षी सलग तीन दिवस रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता. २००६ साल होत ते , त्या पावसाने आमच्या घराची दगड-मातीची भिंत पावसाच्या पाण्याने ओली होऊन जमीनदोस्त झाली होती. मी ,भाऊ ,आई,,,,ते दगड माती बाजूला करत असतानाच मित्र फोन घेऊन घरी आला होता. तो म्हणाला पुण्याहून फोन आहे,नमिता चा फोन होता , ती सांगत होती सुनील तुला ४२१ माक्स आहे, हे एकूण मी जाम खुश झालो होतो ,,,,मी तिया परत परत दोन वेळा विचारले नमिता खरच ४२१ आहे ना ,,,ती म्हणाली अरे ४२१ आहे आणि तू महाराष्ट्रातून ५ वा मेरीट आहे. मी ते एकूण एव्हडा खुश झालो मी आई ला म्हंटल आई जर मला ४२१मार्क्स असतील तर मी आता पर्यंत शाळेत हि कधी एव्हडे मार्क्स नाही मिळविलेत. ते ७०.१७% मार्क्स म्हणजे JJ ची एन्ट्री पक्की करणारी होती.
मी लगेच २ ऱ्या दिवसी पुणे गाठल, आमच्या वर्गातील बहुतेक जन अभिनवला dip.a.ed करणार होते, अभिनव ला ५००० रु फी होती. मी ठरवला करायचे dip.a.ed तर JJ ला नाहीतर करायचच नाही. दुसऱ्या दिवशी lc , मार्क लिस्ट घेऊन jj ला अर्ज केला. ,,,,,,,,मुलाखत झाली ,,,,,लिस्ट लागली ,,,, त्या लिस्ट मध्ये माझ पहिलाच नाव होत.
माझा प्रवेश पक्का झाला होता,आणि मी त्या दिवशी Sir J J School of Art चा विद्यार्थी झालो होतो. मी स्वत: ला नशीबवान समजतो , मी यशवंत आणि अभिनव सारख्या कॉलेज ला शिकून jj ला गेलो होतो…तिथ पर्यत जाण्याची शिडी या कॉलेज ने मला करून दिली होती.
JJ मध्ये JJ भोगले ते पुढील लेखात.
अजून खूप बाकी आहे ,,,, पुढील लेख ,,,,,,,,,,,,, वादळापूर्वी ची शांतता
jj चे वातावरण, चौधरी सर , atd विभाग आणि jj , हे समजल्यावर वादळ येणार आहे, आणि त्या वादळात सगळेच कसे होरपळून निघाले,,,ते आपल्या ला माहित आहेच ,,,,पण इतरानाही माहित होऊ दे .
पण माझ मात्र JJ ला जायचं स्वप्न पूर्ण झाल होत.
सुनिल बांबल