http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

On the Spot (२०/०३/२०१५)लेख-०९


          कला क्षेत्रात On the Spot या शब्दास खूप महत्व आहे. निसर्ग चित्र करणारी चित्रकार मंडळी असो वा नवशिखे विद्यार्थी या प्रत्येकाला या शब्दाचे महत्व माहित असते. आता सध्या याचे चांगलाच पिक आल आहे.        
मी १९९९ ला foundation ला प्रवेश घेतला अन माझा या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला, मी ए टी डी च्या शेवटी-शेवटी निसर्ग चित्र करायला लागलो, आम्हाला submission ला ओउट डोअर स्टडी ला काही landscape लागत असत. त्या वेळी मी ,,,मिलिंद मुळीक यांच्या काही निसर्ग चित्राचे कॉपी केल होत.त्या वेळी वाटायचं आपण ही निसर्ग चित्र स्पोट वर जाऊन करायला पाहिजे. आणि येथून खर तर निसर्ग चित्राला सुरवात झाली. मग मी काही निसर्ग चित्रे औरंगाबाद मध्ये केली ,, तोरवणे सरांनी मला अभिनव ला जाण्याचा सल्ला दिला. ते त्या वेळी म्हंटले बांबल तू पुण्यात G.D.Art कर आणि माझ्या घरून परवानगी मिळत नव्हती , तोरवणे सरांनी भावाला समजून सांगितले आणि माझा अभिनव चा मार्ग मोकळा झाला. पण अभिनव ला प्रवेश मिळेल कि नाही याची खात्री नव्हती. मी पुण्याला गेलो तेथे माझा मावस भाऊ गजानन काळे शुक्रवार पेठेत राहायचा ,मी त्याच्याकडेच सुरवातीला गेलो. बाकी पुण्यात कुणाची ओळख नव्हतीच. तेथे गेल्यावर राहुल गोळे, सचिन मुळे,शीतल बर्गे आणि गाडेकर सर भेटले ते माझ बारीक काम बघून commercial कर म्हणत होते. पण मला Drawing & Painting करायचं होत.
मी दुसऱ्या दिवशी कॉलेज ला गेलो ग्रंथालयात तेथे दिलीप कदम सर ना भेटलो. त्यांनी माझे कागदपत्र बघितले आणि सांगितले कि तुला प्रवेश मिळून जाईल मांडके सरांना भेट ते तुम्हाला असतील वर्गशिक्षक,,मी अर्ज भरला त्यानंतर काही दिवसाने लिस्ट लागली पण त्यात माझ नाव नव्हत . मी दोन्ही लिस्ट बघितल्या,,,,,,,दोन्ही लिस्ट मधी १९ नाव सारखी होती. बर्याच मुलांनी दोन्ही कडे अर्ज भरला होता आणि आणि करायचं एक च होत. मग मी waiting list बघितली त्यात माझ नाव ६ होत ,,,मी खुश झालो कारण माझा अभिनव ला प्रवेश होणार होता.

आणि मी काहीच दिवसात अभिनव चा विद्यार्थी झालो.
मी पुण्यात आलो,बरेच मुल water colour मध्ये निसर्गचित्र करायची सोमनाथ ने तर आमचा पाण्यातील वर्ग ही रंगवला होता. पण मला निसर्ग चित्राची आवड निर्माण झाली ती संजय खोचरे आणि संजय टिक्कल मुले. यांची चित्र बघितली कि अस वाटायचं आपण ही काम कराव. तसा मी आळसी होतो वर्गाव्यतिरिक्त काम करत नव्हतो. पण मी सुरवात केली. आमचे सिनिअर on the spot स्पर्धे ला जायचे.दोन वर्ष झाली होती पुण्यात,,,,, advance चे वर्ष सुरु झाल आणि मी हि on the spot स्पर्धे ला जायला लागलो.
आता सध्या on the spot स्पर्धेचे पिक फार जोमात आहे . अनेक ठिकाणी या स्पर्धा सुरु झाल्यात आणि बक्षिसाच्या रक्कम ही वाढल्या आहेत.मला सर्वात जास्त या स्पर्धा आवडायच्या कारण येथे one day असायची. एका दिवसात चित्र काढून जम करायचं आणि त्याच दिवसी बक्षीस वितरण. काय मज्जा यायची. आपल्या कॉलेज च्या कुणाला ही बक्षीस मिळाल कि खूप आनंद व्हायचा. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली मुले यायचे , मुंबई ,सांगली ,कोल्हापूर, पुणे नाशिक या ठिकाणचे प्रामुख्याने असायचे प्रत्येकच काम वेगळ , निसर्ग चित्र करण्याच कसब वेगळ , गजानन ठाकूरवार, गणेश हिरे,सचिन कोंडाळकर,चासकर,स्नेहल पागे,संदेश खुले,निलेश भारती, सचिन केदारी अशी बरीच निसर्गावर प्रेम करणारी मंडळी आमच्यावेळी स्पर्धेसाठी हजार असायची आणि या सर्वातून एक बक्षीस मला ही मिळवायचं असायचं.

oil, water,acrylic च जोरात युद्ध सुरु असायचं. मात्र माझ्याकडे माझ अस्त्र असायचं ते म्हणजे कागद फाडायच.

बर्याच वेळा माझ्याकडे पैसे नसायचे ,,,,,पण जेव्हा माझा कोलाज मध्ये आत्मविश्वास वाढला तेव्हा मी हि ऑन दि स्पॉट स्पर्धेला जाताना ,,आमच्या मेस च्या मामी कडून पैसे न्यायचो आणि आल्यावर मामी चे मामी ला परत द्यायचो. मला नेहमी नाही पण काही वेळा मामी हे पैसे लकी ठरायचे. 
मी बहुतेक on the spot स्पर्धे ला जायचो ,,,,spot वर पोचलो कि सुरवातीला spot निवडून water colour मध्ये key -skech करायचो ,,,,,,एकदा का चित्रातील प्रकाश आणि छाया मिळाली की बाकीच्या वेळात कागद फाडून त्यातून सुंदर चित्रकृती बनवायचो आणि एक तरी बक्षीस मिळवायचो, 
मी on the spot ला आलो म्हणजे एक बक्षीस गेल म्हणून समजायचे, काही वेळा मिळत हि नव्हत. पण बहुतेक वेळा बक्षीस यायचाच. मी त्यावेळी नाशिक कला निकेतन चे तीन वेळा बक्षीस मिळविले. एक वेळा स्पेशल , एक वेळ २ रे बक्षीस ,आणि शेवटी उत्तेजनार्थ. ही स्पर्धा खूप महत्वपूर्ण असायची कारण येथे १ले ,२रे , ३रे असे तीन आणि उत्तेजनार्थ तीन असे एव्हडेच बक्षिसे असायची. मी कलापुष्प,साई चित्रकला,मिरज,सांगली,वसई,इचलकरंजी येथे on the spot, चे prize मिळविले.
खरच मला या स्पर्धा आणि ते दिवस खूप आठवतात , या स्पर्धेतून मला खूप मित्र मिळालीत. त्या सर्व मित्रांना माझा सलाम.
सुनिल बांबल

माझी शिवाजी शाळा (१९/०३/२०१५) लेख-०८

           मी तसा जेमतेम विद्यार्थी , मला शालेय स्तरावर ५० ते ६० च्या मध्ये गुण मिळणारा,पाचवी पासूनच आमचा वर्ग दुर्लक्षित असल्यासारखा होता. त्या वेळी शिक्षक घरी शिकवणी वर्ग घेत याला आमचे अंबेडहारे सर ही अपवाद नव्ह्ते. मी शिकवणी लावलेली नव्हती. घरची परिस्थिती हि नव्हती तशी,,,,, कि मी शिकवणी लावु शकेल. वर्गात त्याचं विशेष लक्ष नव्हत …जर असता तर आमचा वर्ग सर्वात ढ नसता. पायाच कमजोर राहिला त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे आम्ही दहावीला पूर्ण वर्गातून फक्त ७ मुल अन दोन मुली पास झालो होतो.
आमचा वर्ग हुशार नव्हता पण आमच्या वर्गात एक हिरा होता,,,तो म्हणजे सुभाष लहाने, अतिशय हुशार अन प्रामाणिक मुलगा , आज त्याने PHD पूर्ण केली आहे. विजया पाटील म्हणून मुलगी होती तिनेही LLB केल आहे,काही हुशार नसलेली आम्ही मुल कुणी ऑटो चालवतो, विठ्ठल जगदाळे सारखा राजकारणात गेलाय ,,, शिंगणे ac चे काम करतो. आणि मी चित्र काढतो.
प्रत्येक जन काही ना काही उद्योग करतोय.
आम्हा ९ वी अन १० वी ला चांगले शिक्षक हि मिळाले त्यामध्ये बारोटे सर,डोमळे सर हे नाव मी विसरू नाही शकत .
बारोटे सरांनी मला गणिताच्या महत्वाच्या टिप्स देऊन मला सहकार्य केले अन आज हि करत आहेत. मी त्यांच्या मुलीची लग्नाची पत्रिकेसाठी पेंटिंग केल होत तसेच ते सध्या प्राचार्य झालेत. त्यांच्याकडे कला प्रेम खूप मोठयाप्रमाणात आहे.गणिताचे शिक्षक असुन हि त्यांनी अनेक चित्रकाराची पुस्तक वाचली .
आलमेलकरांची तर खूप सारी माहिती आहे त्यांना.
असे कलारसिक शिक्षक माझ्या चित्रकला प्रदर्शनाला मानखुर्द हून अंधेरी ला आले होते. आणि ते हि चक्क नरेंद्र देशमुख यांना घेऊन.
नरेंद्र देशमुख म्हणजे मोठे अधिकारी.
मी दहावीला असताना आमचे मराठी चे शिक्षक डोमळे सर,,खूप चं छान मराठी शिकवायचे त्यांनी शिकवलेले पाठ आज हि मला चांगलेच आठवतात. त्यांनी शिकवलेले आम्हाला स्मशानातल सोन आणि लाल चिखल हे पाठ मी आयष्यात कधीच विसरणार नाही . ते ज्या वेळी शिकवायचे त्या वेळी त्या पात्राशी पूर्णपणे समरस होत असे,,,, या दोन तीन पाठांमुळे त्यांचा मी पक्का चाहता झालो होतो. मी खर तर दहावी च्या परीक्षेत या तीन पाठांवर आलेले तीन मोठे प्रश्न सोडवून च पास झालो.
सरांचे शब्द जणू आज हि कानावर पडतात……. लाल लाल टमाटेsss लाल लाल टमाटेssssस्वस्त लावलेssssss स्वस्त लावले ssssss आठने किलोssss आठने किलोsssss
सर च शिकवण डोळ्यासमोर चित्र उभ करायचं, आणि त्या पाठचा नायक आपण आहोत अस आपणास भासायच ,,मला आजही दर्शनमात्रे हे प्रवास वर्णन आठवत. thanks सर
असे अनेक आठवणीतील शिक्षक आहेत,
प्रकाश बोंबटकर होते ते बोलताबोलता कुठल्याही विषयाची वही तपासून द्यायचे,
चित्रकलेचे पाटील सर होते , वही नाही आणली कि खूप मारायचे ,
शेळके सर यांनी तर आम्हाला रंग पंचमी वर्गात खेळीली म्हणून खूप मारल होत.
सावळे सर,,,जीवशास्त्र शिकवायचे ,
,जिरवणकर मडम ,,,शर्टाची गुंडी लावली नसेल तर पोरीने तोडली काय अश्या म्हणायच्या ,,, शिंदे सर मराठी छान शिकवायचे ,,,त्यांनी शिकविलेले विजयस्तभ आणि राजाभोज हे चांगलाच पाठ झाल होत,
नंदू गायकवाड सर यांनी अर्थशास्त्र शिकविल,,,,,
किती किती शिक्षक अन त्यांची वैशिष्ट सांगितली तर कमी पडेल, भटकर सर भूगोल शिकवायचे डाव्या हाताची ठेऊन,,,,,,
मला निमजे सर आवडायचे ते इंग्लिश खूप चांगल शिकवायचे पण माझ्या नशिबी आलाच नाही त्याच शिकवण,
PTI सुसर सर त्याचं ओल्या फोकीच मारन असो,,,,,,पठाण सर च गाणं
NCC चे निकम सर ,,,भौतिकशास्त्र शिकवताना, ,,,म्हणयचे
" Any Dificulty ,,,, आणि आम्ही हि हुशार मुलांसारखा जणू सर्व समजल अस जोरात म्हणायचो No Dificulty सर."
असो माझ्या शिवाजी शाळेच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे चांगल्या न वाईट.
सुनील बांबल

मी दिल्ली जिंकली (१८/०३/२०१५)


       

तुम्ही म्हणत असाल कि काय म्हणतोय हा ,,,,,,

" मी दिल्ली जिंकली." 
पण खरच सांगतो यामागची गोष्ट फार मोठी आणि रोचक आहे. आपण सर्व शिक्षणातून बाहेर पडलो कि नोकरी अन छोकरी, या साठी चा पुढील पाढा सुरु होतो. अनेकांना नोकरी लागली कि लगेच छोकरी पण मिळते. 
पण चित्रकला क्षेत्रात फार हाल होतात नोकरी नाही मिळाली तर. चित्रकलेचे पाणीच न्यारे हो, नुस्त चित्रावर जगायचं म्हंटल कि फार कठीण असत.
माझ नुकतच शिक्षण संपल होत आता घरचे सगळे लग्नासाठी मागे लागली होती. मला नोकरी नव्हती अन चित्रकार म्हणून जगायचं भूत डोक्यावर होत. नालासोपारा ला मी चित्रकार होण्याची स्वप्ने रंगवत आणि एकापाठोपाठ चित्र प्रदर्शने करत ते सकारात हि होतो. पण हे करताना घरचे मुली बघायला बोलवत मग घरी जाणे आणि मुलगी बघून येणे हे सुरु होत. काही ठिकाणी मुलगी आवडली तर ते लोक मुंबई ला येण्यास नाही म्हणायचे.
मुलीकडील मंडळी वेगवेगळे प्रश्न विचारायची .
मुलगा काय करतो ?
शिक्षण काय?
असे ना अनेक प्रश्न असायची.
पण बहुतेक वेळा त्यांना कळायचेच नाही कि नेमक मुलगा काय करतो ?

मग घरचेच सांगायचे की चित्र काढतो.
 
हो का ?
मग पोटापाण्याच काय ?
आपण कितीही सांगितला कि चित्रातून पैसे मिळतात , चित्र विदेशी लोक विकत घेतात,, मात्र त्यांना ते अतिशयोक्ती वाटायचं.
गावरान भाषेत सांगायचं तर त्यांना अस वाटायचं,,,,, जणू मी काही पण फेकतोय .
त्यावर त्याचं म्हणन असायचे
आमच्या घरी २० ते ३० रुपयात भारी चित्र आणतो अन तेही लमिनेशन केलेल,
मग तुमच चित्र तुम्ही हजारो रुपयाचे सांगता कसा विस्वास ठेवायचा?
तसेही ते विस्वास ठेवतच नसत.
मुळातच चित्रकलेकडे १००० तून एखादा वळतो,अन त्यानेही जर चित्रकार व्हायचा ठरवला तर अजूनच कठीण .
आपल्या समाजात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक या लोकांची नवरदेव मुलगा म्हणून चलती आहे  किंवा चांगला व्यवसाय असलेला नाहीतर सधन शेतकरी तरी असावा लागतो,
आणि ,,,,,,,मी तर चित्रकार होतो.
या लोकांना माझ्या भावाला तोंड द्याव लागत असे तो सांगायचा,,,,, पण माझ्या या चित्रकलेतील गोष्टी वर विस्वास ठेवायला कुणी तयार नसायचे. तेव्हा भावाने सांगितले तू कुठे तरी तात्पुरता जॉब बघ. पण मला ते नको होत. पण त्याच्या समाधानासाठी मी खामगाव च्या कॉलेज ला गेलो असता त्यांना माझ काम आवडला पण ते अडीच हजार रुपये देणार म्हंटले, मी नकार देऊन निघून आलो, चिखली च्या कॉलेज मधील प्राचार्य तर दोन हजार देतो बोललेले .
चित्रकलेचा प्राध्यापक आणि पगार किती ?
दोन हजार , अडीच हजार आणि खूप झाल तर मुंबई पुण्याच्या ठिकाणी पाच ते आठ हजार ,,,,आणि काय तर म्हणे आर्ट कॉलेज वर पप्राध्यापक आहे.
तो अध्यापक कायम असेल तरच खर,,,,,,,, नाही तर काही खर नाही.
असो
याच बाबीमुळे ,,,,,,मी माझ्या भावाला धडक सागितले मी कि समोरच्यांना सांगून टाकायचे कि नोकरी नाही म्हणून.
पण कठीण असता ना.
मी नालासोपाराला राहत असताना,,,
माझ गावच घर साधसुध दगड मातीच अन काही कुडाच अस होत .
घरच्या समोर सप्पर होत,पाऊस आला तर ठिकठिकाणी पाणी टपकायचे त्यामुळे घरातील सर्व भांड्यांना त्यावेळी काम मिळायचे.
घर चांगले नाही,
त्यात वरून नोकरी नाही,
शेती नाही,
कशी मिळणार मला मुलगी,
थोड अवघडच होत आणि त्यात मी चित्रकलेतील मुलगी मिळेल अशी आशा लावून होतो.
या कारणांनी वर्ष कधी निघून जायचे कळायचं ही नाही. मुंबई हून येण्याजाण्याचा खर्च मात्र होत होताच. मग मी गावी जायचं ठरवलं.
नोकरी नाहीच मग किमान घर तरी चांगल असावे नाही का ? म्हणूनच गावी येण्याचा निर्णय घेतला आणि घराचे काम सुरु केल. एक वर्षभरात घराचे काम झाले तर घराविषयी कुणीच विचारे ना.
मग म्हणे शेती पाहिजे होती ,,,या कारणाहून नकार कळवत.
आणि एक गमतीचा विषय सांगतो ,,,जे लोक शेती पाहिजे सांगायचे ते तोंड वर करून म्हणयचे आमची मुलगी शेतात काम करणार नाही बर.
मग कश्याला हवी शेती. 
दिवसा मागून दिवस जात होते ,,,आणि मुलीमागून मुली पाहणे चालूच होते. आज बुलडाणा तर उद्या देऊळगाव राजा, बुलडाणा जिल्ह्यातील तर बघितल्याच पण नंतर खान्देश मधील जामनेर, वाकडी तसेच मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद सारख्या शहरावर ही स्वारी झाली, एक तर मुंबई तीलही मुलगी बघायचा योग आला होता. पण मी फोन वर त्यांना अगोदरच सांगितले कि मी मुंबईत कायम राहीलच असं नाही आणि नंतर त्यांचा फोनच नाही आला.खूप स्वाऱ्या झाल्या  पण प्रत्येक स्वारी अयशस्वी व्हायची. अश्या खूप स्वाऱ्या झाल्या चिखलीत सुध्दा मी ४ मुली बघितल्या होत्या. त्यातील एक तर जवळ जवळ जमलच होत, पण ते नियतीला मान्य नसावे.
तसे जे ही घडले ते चांगल्या साठीच घडल असावे, पुढे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण येणार असावा. अस समजून मी पुढच्या दिवसाची वाट बघायचो.

माझी लग्नासाठी एक अट होती कि किमान मुलगी १२ वी च्या पुढे शिकलेली हवी,म्हणजे पदवीधर असेल तर फारच छान. पण आमच्यापर्यंत तश्या मुली खूप कमी पोचायच्या, आणि आलेच तर त्यांना नोकरी पाहिजे असायची. काही नोकरी करणाऱ्या मुलींचे स्थळे आमच्याकडे आली पण मला नोकरी करणारी मुलगी नको होती.

बर्याच  मुली बघून ही यश मिळत नाही , मग मात्र आमची स्वारी वधू-वर मेळाव्याकडे वळली, आम्ही माझा biodata दिला त्यात खाली स्पष्ट शब्दात उल्लेख होताच ,,,,,मी नोकरी करत नाही. पाहिलं वर्ष गेल, आम्ही त्यातील चित्रकलेतील शिक्षण घेतलेल्या मुलींच्या घरी संपर्क साधले , पण ते ही चित्रकाराला मुलगी द्यायला तयार नव्हते. अस का ?
मी या पुस्तकात नाव नोंदणी करण्या अगोदर चित्रकलेतील मुली बघितल्या, पण रेशीमगाठी काही जुळून येत नव्हत्या. मग त्या पुस्तकाचे दुसर वर्ष आला आणि परत एकदा त्यात biodata दिला.
पण नाही…. काही उपयोग झाला नाही.
धामधुमीचा काळ होता. सगळीकडे लगीनघाई होती. मुली बघण्याचे कार्यक्रम तर चालूच होती , मी माझी बाजू हि खूप चांगल्या पद्धतीने मांडायचो, पण यश मात्र येत नव्हते. अनेकांना तर मी माझे बँक चे पुस्तक हि दाखवायचो ,पण तरीही विस्वास बसत नव्हता हो त्यांचा,आम्ही सर्व खर सांगायचो,
मी असे कितीतरी उदाहरणे बघितले कि लग्न होइपर्यत नोकरी दाखवणारे अन नंतर ते सोडून देणारे ,,,,
पण आपण एव्हड प्रामाणिक वागूनही आपणासोबतच असे का घडावे ?
हळूहळू मी निगेटिव्ह होत चाललो होतो , माझी चिडचिड वाढत चालली होती काही झाल कि मी लगेच चिडचिड करायचो , कधी आई वर तर कधी भावावर ,तर कधी मुलगी सुंदर सांगून नेणाऱ्या मध्यस्थी असलेल्या माणसावर ही.
मुलगी दाखवणाऱ्या माणसाची सौंदर्या विषयी ची कल्पना आजपर्यंत ही मला कळली नाही.
त्या वेळी मला सुंदर मुली फक्त रस्त्यानेच दिसायच्या.असो काही आर्ट मधील मित्र म्हणायचे काय राव सुनील तू तिकडचीच पटवायची होती ना. पण ते सगळ्यांना नाही जमत.
एका पाठोपाठ मित्राची लग्न जुळत होती सुरवातीला मी अनेक मित्राचा लग्नात गेलो खुश ही असायचो पण नंतर मी चिडचिडा होत गेल्याने मी नेहमी नाराज नाराज राहायचो, मला कुणाच्या हि लग्नाला जायची इच्छा नसायची. मी घरच्यांनी किती ही सांगितले तरी कुणाच्या लग्नात त्या वेळी जात नव्हतो. मी खूप कठीण परीस्थित आणि कोमजलेल्या मनस्थितीत जगात होतो . तश्यातच माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न धरल, जाने तर आवश्यक होतेच बाकी ही सर्व मित्र येणार होते ,,,कसाबसा मी गेलो.
लग्न पैठण ला होत,,,,,,,सोमनाथ आणि प्रतिक्षा च
संजय टिक्कल , संजय खोचरे , नवनाथ क्षीरसागर , ऋषी जगनाडे निखिल गिरी आणि नितीन आलेले होते,,,,आम्ही सर्व मित्र तेथे पोचलो होतो, मी मात्र मनाने हरवलेला होत, बाकी चे सोमाच्या घोड्यासमोर नाचत होती, कसा बस दिवस काढला मी तेव्हा. सोमा च लग्न चं थाटामाटात झाल. खूप दिवसानंतर आम्ही मित्र भेटलो होतो.
हे सर्व चालू असताना मात्र मी चित्रावर कधीही दुर्लक्ष नाही केल. चित्र करून प्रदर्शने करत राहणे हा उपक्रम सातत्याने चालूच होता.
लग्न न जुळण्यात बऱ्याच गोष्टी आड येत होत्या , त्या म्हणजे माझ शिक्षणामुळे वाढलेले वय,परिस्थिती,माझ्या कडे पक्की नसलेली नोकरी,शेती, अश्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्यात परत आपला स्वाभिमानी बाणा.वय वाढल्यामुळे म्हणूनच मी शिक्षणाची अट टाकली होती आणि तश्याच मुली शक्यतोवर पाहायला जायचो . मी जवळपास २७ मुली बघितल्या त्यातील ४-५ मला आवडल्याही त्यातील काहीच-आमच जुळणारच होते पण काही ना काही कारणाने जुळत नव्हते अस करता करता २०१२ साल आल ,,,,,लगीन घाई ने जोर पकडलेला ,,,,मे महिना चा शेवट होता तो ,जे ते लग्नकार्यात मुली बघण्यात मग्न होती. आणि भावाकडे एक निरोप आला, मुलगी देखणी अन शिकलेली आहे म्हणे. तुम्ही एक वेळ बघून घ्या. माझ दिल्ली ला पुढील आठवड्यात ग्रुप प्रदर्शन होत. पण मी विचार केला, चल सुनील आलेली संधी कश्याला सोडायची बघून तर घे जे व्हायचे ते होईल. मी,भाऊ अन तो व्यक्ती आम्ही तेथे गेलो ,छान घर अन लोक बघून हि प्रसन्न वाटले. कांदा पोहे चा कार्यक्रम झाला ते चालू असताना नेहमीसारखी मी माझी बाजू मांडली.नंतर मुलीला बोलाविले , जशी ती आतून आली पाहिल्या क्षणी ती मला आवडली. प्रश्नोत्तर चा कार्यक्रम हि पार पडला आणि आम्ही निरोप घेतला , मी सहज मागे डोकावून पाहिलं असता ,मुलीची आई आणि वाहिनी खूप लांब जाई पर्यंत आम्हाला बघत होते.
मी मात्र नेहमीप्रमाणे जे होईल ते नशिबावर सोडून दिल्ली ला निघून गेलो.
आकार ग्रुप अजमेर,राजस्थान याच्या सह माझी काही चित्र ललित कला अकादमी, दिल्ली मध्ये लागली होती. रोज गल्लेरीत वेगवेगळी लोक येत चित्र बघत किंमत विचारात आणि पुढे जात होती.त्यातच महाराष्ट्रात घडामोडीं नी चांगलाच जोर पकडला होता,दिल्लीतील प्रदर्शनाची बातमी लोकमत च्या माध्यमातून थेट बुलडाण्यातील त्या घरी पोचली होती. जणू काही लोकमत ने माझी पावती च त्यांना दिल्ली.
दिल्लीत प्रदर्शनाचे एका मागोमाग दिवस जात होते , एक व्यक्ती चित्र पाहत होता,पाहत पाहत तो बाहेर जाण्याच्या दिशेने वळला. मला कळले होत त्याला माझ चित्र समजल नाही. मी लगेच उठलो न त्याला थांबवल त्यांना मी माझ्या चित्रात नेमक काय आहे आणि चित्र कस पहा हे सांगितले, ते चित्र पाहायला लागले. चित्र पाहता पाहता त्या विषयी विचारात होते. त्यांना काम आवडल होत त्यांनी किंमत आणि काही गोष्टी नोट करून ठेवल्या जाताना आमचा catlog हि सोबत नेला. मला बर वाटल.
प्रदर्शनाचा शेवटचा दिवस उगवला, आणि सकाळीच बोस्टन हून फोन आला कि तुमची काही चित्र घेण्याचे फायनल झाल म्हणून ,,,मी मात्र जाम खुश झालो होतो कारण अगोदर च्या रात्री भावाचा फोन होता कि बुलडाणा हून हि होकार असल्यासारखे आहे. खुशीतच मी गल्लेरीत गेलो,तर दुपारी मला massage आला होता ,,,त्यात लिहिले होते ,,,,,सुनील मला Couple Village (blue ) हे चित्र घ्यायचं आहे , पण माझ बजेट थोड कमी आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही गल्लेरीत या , आपण बघू .
शेवटचे ४० मिनिट उरली होती ,आम्ही आता चित्राची आवराआवर सुरु केली होती , आणि तो व्यक्ती आला त्यांनी ३०,०००/- किंमत असलेले २७,०००/- एक चित्र विकत घेतल , catlog वर माझी स्वाक्षरी घेतली अन मी त्यांची .तो German व्यक्ती म्हणजेच Olaf Winkelman.,त्यांची चित्र आम्ही व्यवस्थित आम्ही त्यांच्या कार पर्यंत पोचवली. मग आवराआवर चालू असताना प्रदीप दादाचा फोन आला लवकरात लवकर दिल्ली हून परत ये कुंकू टिळक आणि साखरपुड्या चा कार्यक्रम आहे म्हणे, मी लगेच जनरल चे तिकीट काढून भुसावळ आणि नंतर चिखली ला आलो.
दुसऱ्या दिवशी बुलडाणा ला साखरपुडा होता , मी माझ्या भावी बायको साठी चित्राच्या पैशातून ४.१० ग्रॅम ची सोन्याची अंगठी केली आम्ही सर्वच्या साक्षीने एकमेकांना अंगठी घातली,,,,त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने वाटला आपण दिल्ली जिंकली. मला खूप कष्टाने बायको मिळाली आहे त्यामुळेच मी रुपयाही हुंडा न घेता लग्न केले .
सुनिल बांबल.

१८०३ मराठा-इंग्रज दुसरे युद्ध (१२/०३/२०१५)लेख क्रं- ०६


      औरंगाबाद हून बुलडाणा ला जाताना मराठवाड्यातील माहोरा ते सिल्लोड मार्गावर आसई गावाचे गेट बनविले आहे ,,,, जाताजाता सहज त्याकडे लक्ष गेले. त्यावर युद्धभूमी आसई असे लिहिलेले दिसले. तेथे विचारपूस केली असता एक तरुण म्हणाला , चला मी दाखवतो तुम्हाला युद्धभूमी.
आम्ही लगेच गावात गेलो ,,सुरवातीला एक मंदिर लागले , ते बाहेरूनच न्याहाळत आम्ही पुढे सरकलो.
ज्या वेळी युद्ध झाले त्या वेळी म्हणे गावाच्या नदीला रक्ताचा पूर गेला मराठ्यांनी खूप संघर्ष केला पण इंग्रजांपुढे मराठ्यांचा पराभव झाला,पण इंग्रजांच हि नुकसान झाल,इंग्रजांचा मुख्य अधिकारी मक्सवेल ला शेवटी ज्या ठिकाणी हे युद्ध घडले येथेच युद्धात मारला गेला. आणि त्याची तेथे कबर बनविली आहे, हे तो तरुण सांगत होता आणि आम्ही अखेर त्या ठिकाणी पोचलो तेथे बघितले असता मला भल मोठ वडाचे झाड दिसले ज्याच्या पारंब्या ह्या खोडा सारख्याच मोठ्या होत्या आणि त्या पारंब्यानी जमीनीसोबत दोस्ती केली होती. मी तेथील दृश्य बघून थोडा नाराजच झालो. ती कबर आता मोडकळीस अवस्थेत आहे . तेव्हड्यात तो सांगू लागला या कबर वर पूर्वी सप्तधातूची प्लेट होती,त्यावर अधिकारी मक्सवेल चे चित्र अन नाव आणि मजकूर होता,,,,,काही वर्षा पूर्वी चोरट्यांनी ती प्लेट तोडून चोरून नेली,ते चोर पकडले बहुतेक आणि ती औरंगाबाद ला कुठल्यातरी पोलीस ठाण्यात जमा आहे म्हणे. आता ती प्लेट असेल कि नसेल माहित नाही आणि ते चोर पकडले गेले असेल तर असेल ही कदाचित.
हे सांगत असताना तो मक्सवेल ला राजा मक्सवेल असच संबोधत होता. तो म्हणाला सर येथे दर वर्षी त्या राजाची वंशज येतात आमच्या गावात. त्यांनी पैसे दिले होते त्या कबर आणि परिसरासाठी ,त्या कबर पर्यंत जाण्यासाठी सिमेंट चा रस्ता केला आहे,तो रस्ता तसा काही खास राहिला नाही आता,,,पण जाण्यासाठी रस्ता न दोन्ही बाजूनी विजे चे खांब आहे,,,कबर च्या भोवती पाच फुट उंचीची भिंत आहे तिला आतून बाहेरून टाइल्स लावल्या आहेत,,आजू बाजूचा परिसरालाही भीती उभारल्या आहेत,
हे बघत असता मी त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचा परिचय करून दिला. त्याच गजानन दाभाडे नाव तो B.Com II चा विद्यार्थी होता, अन कार वर चालक म्हणून हि काम करतो म्हंटला ,त्याच्या आई सोबत हि ओळख करून दिली त्याने. घरी थोडी शेती आहे म्हंटला ते हि बघतो. आणि आपल्यासारख कुणी गावात आला कि त्याला हे दाखवत फिरतो, इंग्रज लोक आले तर ते खूप पैसे हि देऊन जातात त्यांच्या सोबत फिरलं की. आणि तो सांगू लागला कि येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कड ला या युद्धात पडलेली एकमेव तोफ आहे. मी त्याला विचारले अंतर किती असेल तरीही,,तो बोलला जास्त नाही,,,,,आणि आम्ही गाड रस्त्याने निघाली. activa होतीच सोबत तीनेही चांगलीच साथ दिली.
हळूहळू आम्ही त्या गावाजवळ पोचलो तेथे एक महाराजांची समाधी होती . तेथील लोक सांगतात त्या महाराजांना पक्ष्यांची भाषा समजायची त्यांच्या सोबत पक्षी बोलत असत . त्या च्यासमोर एक मोठा कोरीव दगड होता . प्राथमिक अंदाज लावता त्याच्या बनावटी नुसार तो मला जुन्या काळातील दगडी तेलघाणा वाटत होता.ते बघून आम्ही शेवटी तोफ जवळ पोचलो,,,ती तोफ तेथील मंदिरासमोर शेकडो वर्षी पासून गुपचूप पडून आहे.
अंदाजे ७-८ फुट लांबीची तोफ असावी ती , आणि पंच अथवा सप्त धातू ची मराठे इतिहासाची साक्ष असलेली. ते बघून मला खूप आनंद झाला. मी तोफ चा फोटो काढला. एक चक्कर त्या गावात हि मारली, भेट दिलेल्या दोन्ही गावातून केळणा नावाची नदी वाहते,,,व नंतर ती माझ्या आई च्या माहेरात मेलात जाऊन जुई ला मिळते. या केळणा-जुई च्या संगमावर एक महादेवाचे मंदिर आहे. आम्ही ती तोफ पाहून परतीचा मार्ग धरला.
मी त्याला गावात सोडू कि कस म्हणून विचारल,,,तो माझ्यासोबत माहोरा आला कारण त्याला तिकडेच काम होत पण तरीही त्याच काम सोडून त्याने मला इतिहासत नेल. धन्यवाद गजानन.
त्याचे आभार कसे मानावे कळत नव्हते ,,,म्हणून मी त्याला चहा घेऊ घेऊया अस म्हंटल असता त्याने झकास चहा मिळतो त्या ठिकाणी नेल. आम्ही चहा घेतला. मी चहाचे बिल दिल . आमची निरोप घ्यायची वेळ झाली…. मी हळूच ५० रुपये त्याच्या खिश्यात कोंबत असतानाच तो म्हणाला नाही सर मला पैसे नकोत उलट तुम्हाला मी माझ्या शेतातल काहीतरी द्यायला हव होत ,,,,,शेतात मक्का आहे पण अजून कंनस आली नाहीत . .
तुम्ही परत या शेतात हरभरा असताना,,,आम्ही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले न परत भेटू कधीतरी म्हणून एकमेकांचा निरोप घेतला. या २ तासाच्या प्रवास भेटीत एक नवीन मित्र जोडला गेला. त्याची परत कधी भेट होईल माहित नाही ,,,,,आम्ही निरोप घेतला तो त्याच्या रस्त्याला न मी माझ्या ,,, मला बुलडाणा ला पोचायला खूप उशीर झाला. पण एक इतिहास असलेल्या दुर्लक्षित ठिकाणाची आपल्याला ओळख झाली याच समाधान मिळालं.
सुनिल बांबल

Wednesday, August 5, 2015

ए.टी.डी. झालं म्हणजे शिक्षक होतं…. ( १०/०३/२०१५)लेख क्रं- ०५


        मी कला क्षेत्रात आलो च मुळात नोकरी मिळेल ही आशा बाळगून . मी समजायचो ए.टी.डी. झालो की आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळेल, म्हणून मी foundation केलेले असताना G.D.Art ला न जाता  ए.टी.डी. ला प्रवेश घेतला. पण मला कुठे माहिती होत की नोकरी साठी पैसा नसेल तर काही खरं नाही. संस्थांना सुद्धा शाळेत कलाशिक्षक भरताना कला नसली तरी चालती पण पैसा पाहजे, मग ते कॉलेज असो वा शाळा.
Govt.तर पदे भरत नाही, भरले तरी अंशकालीन भरतात आणि नंतर त्या अंशकालीन साठी ही लढाव लागत.
मला ए.टी.डी.आणि डीप.ए.एड चा नोकरी साठी फायदा नाही झाला.
सध्या इंग्रजी शाळांचे शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व वाढलं आहे ,  तर तेथे ही फार कमी मोबदला देतात आणि त्या कालाशिक्षकाला वेगळेच काम लागतात. पण किमान मानधन बरं असायचे.
 या पेक्षा वाईट अवस्था ही कॉलेज वरील सह. अधिव्याख्याताची असते. संस्थे मध्ये असणारा सह. अधिव्याख्याता याचे तर फार हाल असतात, मानधन नावाखाली ३००० ते ५००० आणि मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर मोठ्या मुश्किल ने ८०००-१०००० मिळतात. खरच सांगा कसा जगेल तो अधिव्याख्याता आणि तो कलाकार असेल तर त्याला लागणारा कलर ,कॅनवास आणि कलेच साहित्य याचे काय ? समजा एव्हड्या मानधनावर काम केल हि तरी पैसा घेतल्याशिवाय कुठली हि संस्था भरत नाही आणि भरेलच याची काहीच खात्री नसते. मित्राचा किस्सा ऐकून तर थक्क झाल मला त्याने १० वर्ष नावाजलेल्या संस्थेत जॉब केला ज्या वेळी कायम करण्याची वेळ आली त्या जागेवर दुसरा भरला,याने जाब विचारला असता कळले याचे पैसे ज्या माणसाच्या हाती दिले त्याने ते पुढे दिलेच नाही. बिचारा
असे समाजात खूप आहेत ज्यांच्या सोबत अश्या गोष्टी घडल्यात, पण कागदपत्रांच्या भरवश्या वर नोकरी नाही मिळत आता ,,,किमान कला क्षेत्रात तरी
मी रयत मध्ये २ वेळा मुलाखत दिली . मुलाखतीत नाव ,गाव ,पत्ता, तुम्ही रयत चे विद्यार्थी आहात काय ? असे प्रश्न विचारले होते. ठीक आहे या आपण, आम्ही कळवू आपल्याला. बस झाली मुलाखत,,,,,,, पहिल्या वेळी किमान फलक लेखन तरी करायला लावल होत.

मला माझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगावसा वाटतो ,२००८-०९ चा काळ होता तो,,, मी वसई येथील वसई विकसिनी दृक कला महाविद्यालय च्या मुलाखती ला गेलो होतो. मुलाखत झाली माझ काम ही मुलाखत घेणाऱ्या सर्व सभासदांना आवडले होत .नंतर मला सांगितले ३ तारखे पासून रुजू व्हा. मी सर्व तयारी केली नालासोपारा वेस्ट ला २५०० रु रेंट चे घर भाड्याने घेतले होत. मी खूप खुश होतो , ५००० रु मानधन मिळणार होत मुंबईत तस ते पुरेशे नव्हत तरीही माझी स्वारी मात्र खुश होती . त्या मागे कारण ही तसच होत मी मुंबईत राहून चित्र वर फोकस करू शकणार होतो. ३ तारीख उगवली मी सर्व तयारी करीत असताना मला त्या कॉलेज चे प्राचार्य गवळी सर चा फोन आला आणि ते म्हणाले आम्हाला dip.a.ed सेकंड क्लास पाहिजे म्हणे आणि तसा Govt.चा रूल आहे म्हणे.
 मला रूल ही माहित होता ,,,,जॉब साठी dip.a.ed फक्त पास असणे आवश्यक असते ,,,,मला भांडून जॉब करणे नव्हत. आणि हा जॉब कंत्राटी होता हे विशेष.
मग मी नाराज झालो थोडा काही दिवस करमले नाही,,पण मग मी जे घर भाड्याने घेतले होते तेथे सातत्याने काम करत राहिलो १७ महिने मी त्या ठिकाणी काढले आणि त्या कालावधीत ३ प्रदर्शन केली ,,एक समूह प्रदर्शन नेहरू सेंटर मध्ये केल या प्रदर्शनातून ५५००० हजार रुपयात ३ चित्र विकली गेलीत.ती चित्र फ्लोरिडा येथील अनिवासी भारतीय श्री रवी टाक यांनी घेतलीत,,नंतर २ रे माझा व्ययक्तिक प्रदर्शन प्रदर्शक ला तेथून हि १ चित्र विकले अन ३ रे प्रदर्शन लीला हॉटेल च्या गलरीत केल तेथून दक्षिण आफ्रिकला चित्र गेल. …. या कालावधीत केलेले एक काम Reader's Digest ने प्रकाशित करून मला मानधन हि दिल.
"धन्यवाद" गवळी सर,,, तुम्ही मला डावलल नसत तर मी चित्रावर कदाचित एव्हड फोकस नसतो करू शकलो.
पण म्हणतात ना
"जो भी होता ही अच्छे के लिये होता है।"

माझ्या माय-बापाचे शब्द एकले कि कसं तरी होत,,, ते राहून कधीतरी म्हणतातच कि
 "काय एवड शिकला आमचा सुनील अन त्याला नोकरी नाही .''
आणि हो महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र परिवारातील कुणी घरी आल्या वर आई विचारते ,
 तू पण हेच शिकलास का ?
आणि उत्तर हो आल्यास मग त्याला आई म्हणते
 ''काय रे भाऊ कशाला केल तू हे शिक्षण.''
 आई चा या शिक्षणा हून विस्वास उडाला मात्र माझ्या चित्रावर अजून तिचा ठाम विस्वास आहे.

 फक्त तिला वाटते दर महिन्याला एखाद्तरी चित्र विकत रहाव.जगण्यापुरता पैसा मिळत राहावा.

यशवंत कला महाविद्यालयात मी फौंडेशन आणि आर्ट टीचर डिप्लोमा केला होता. पुढे तोरावणे सर च्या सल्ल्याने अभिनव ला गेलो G.D.Art पूर्ण केलं,,,नंतर Sir J J School गाठलं,,, कालांतराने २०१४ च्या शेवटी मी यशवंत वर ४००० रु मानधन वर २ महिने काम केल सह. अधिव्याख्याता म्हणून. पण तेथेही मानधन पुरेसे नसल्या मुळे टिकू शकलो नाही ..4 हजार रुपयात कसे जगता आलं असते औरंगाबाद शहरात .या दोन महिन्यात मी खूप काही शिकलो. ज्या कॉलेज ला ए.टी.डी. केल त्या माझ्या कॉलेज ला शिकवायला मिळाले हेच फक्त काय ते समाधान. यशवंत मध्ये तोरवणे सर यांनी शिकवायची संधी दिली त्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे. 
शाळेवर कलाशिक्षक नाही झालो मात्र खासगी ट्युशन घेऊन कला शिक्षक होता आले. 
खासगी क्लास सुरू करून स्वतंत्र जीवन जगता येत.  

आणि ए टी डी झाले की शिक्षक होतं....

सुनिल बांबल

वड / banyan tree/ वटवृक्ष (०९/०३/२०१५) लेख क्रं- ०४


               का कुणास ठाऊक पण मला वडाच्या झाडाचा खूप लळा लागला होता. माझ्या घराच्या बाजूने दोन तीन घर सोडल्या नंतर भल मोठं वडाचे झाड नव्हे जणू वटवृक्ष आहे, त्या झाडाची सावली ,त्याची पान याचा पुरेपूर फायदा आजू बाजूचे सर्वच घ्यायचे. त्या पानावर कुरडया बनवायचे. आमची लहान मुलाची धमाल ती वटसावित्री पौर्णिमाच्या दिवस ला,,,त्या वेळी आजूबाजूच्या स्त्रिया पूजेला यायच्या ,आंबे आणि वेगवेगळा प्रसाद तेथे ठेवायच्या ,,,तो प्रसाद मात्र आमचाच असायचा. 
हे माझ्या लहान पनातील झाड अजून हि तसेच उभ आहे. आजू बाजूने पक्की एखाद दुसरी घर झालीत नवीन सिमेंट ची ते बांधताना त्या लोकांना त्याच्या काही फांद्यांना मात्र त्याच्या पासून दूर करावे लागल.जस माणूस लहान च मोठ होत जाताना जसे बदल घडत जातात तसे बदल त्यात हि घडले. माणूस म्हातारपणाकडे झुकल्यावर जस तो दिसायला लागतो तसी आज त्या झाडाची गत झाली आहे, आजू बाजुने घर असल्याने काही प्रमाणात फांद्या तोडल्याने त्याचे सौंदर्याचे तीन तेरा वाजले ,,,अगोदर चा पूर्वीसारखा रुबाबदार पणा न सौंदर्य त्यात दिसत नाही. त्याचा काहीही दोष नसताना शेजारी त्याचा अधून मधून उद्धार करतात.
मला मात्र या झाडाच नेहमीच कुतूहल वाटलं. याला येणारी कोवळी कोवळी पान असो वा नंतर येणारी लाल लाल फळ असो. मी जाम खुश असायचो कारण त्यावर ती फळ खायला वेगवेगळे पक्षी यायचे,कावळे,पोपटआणि अनेक छोटे छोटे पक्षी असायचे खारुताई चे तर नेहमीचे ठिकाण ,
आणि हो कोकिळा तर हमखास असायची, आणि आम्हाला आवाज दयायची,,
कुहु कुहु कुहु,,,,,
माकड आली कि काही खर नसायचं बर त्याचे आगमन झाले कि आम्ही फरार.
या वडाच्या झाडाने पुढे आर्ट मध्ये आल्यावर हि साथ सोडली नाही औरंगाबाद ला शिकायला काय गेलो तेथे तोरवणे सरांनी केलेली सुंदर सुंदर वडाच्या झाडाची चित्र बघायला मिळाली. नंतर पुढे मला हि राहवलं गेल नाही. मी ही
त्यावर collage & water colour मध्ये चित्र केलीत. मग मी कालांतराने माझ्या चित्राचे विषय बदलत गेले, मी थोडा creative चित्रांकडे वळलो. हि चित्रे करत असताना सारख वाटायचं कि आपण वडाच्या झाड हा विषय घेऊन painting करावीत आणि ती हि सृजनात्मक.
मी पुण्याला शिकत असताना चिखली-पुणे महामार्गावर खूप मोठ मोठी वडाची झाड होती आणि त्या सर्व झाडांवर लाल पांढऱ्या रंगाचे पट्टे होते ,ते पट्टे जणू सांगत होते कि हे सरकारी झाड आहे आणि हे कुणी हि तोडू नये ,,,आणि रोड रुंधीकरन मध्ये ते महाकाय वृक्ष तोडली गेली. त्या वेळी हे मी पाहत होतो पण अस वाटल नव्हत कि हा आपल्या चित्राचा कधी विषय हि होईल म्हणून. आणि मी सुरवात केली ती Banyan Tree series ला. आणि त्या मध्ये मी बरीच चित्र केली त्यातील काही चित्र अमेरिकेतील बोस्टन येथे आहे. या तीन चित्रातील २ चित्रचा लिलाव या शहरातील एका प्रसिद्ध मुझीयम मध्ये लिलाव झाला. आणि चांगल्या किमतीला ते चित्र विकली गेलीत. या मालिकेतील एक चित्र दक्षिण आफ्रिकेतील एका उद्योगपती ने हि घेतले आहे.आणि नुकतेच एक चित्र जपान ला ही गेल.
म्हणतात या झाडाच आयुष्य चारशे वर्षाच असत मग या चारशे वर्षात याच्या आजूबाजूने घडणाऱ्या किती गोष्टी बघत असल न बरे हे,
किती सत्ताधीश आणि किती संस्कृती हि बघितल्या असेल नाही का ?
पण मला वाटते कि हे वृक्ष दर वर्षी वाट पाहत असेल वटसावित्री पौर्णिमेची अन कदाचित माझ्या नवीन चित्राची.
याच मला कायम दर्शन व्हावे म्हणून मी याच नवीन रोप माझ्या घराच्या बाल्कनीत लावलं आहे.
सुनिल बांबल

मग,,, बाकी ? ( ०८/०९/२०१५) लेख क्रं- ०३


मी आणि माझा मित्र निलेश भारती आमचा मोबाईल वर सवांद चालू होता,,आम्ही बऱ्याच दिवसानंतर बोलत होतो. आम्ही बोलत असताना खूप विषयावर गप्पा रंगल्या ,,,आणि विषय सापडत नसल्यावर मला बाकी काय ,,बाकी काय ,,,म्हणायची सवय आणि मी असे बऱ्याच वेळा म्हणल्यावर,
तो म्हणाला,,, " सुन्या बाकी माझ्या कडे काही नाही तुझ्याकडेच आहे माझे बाकी ."
आणि आम्ही खूप हसलो. पण ते बाकी मी अजूनही दिले नाही.शेवटी तोच हसत म्हणाला त्या ५० मध्ये तुझ्याकडून १ रुपया तक न लग्नातला आहेर समज…मी म्हणालो ,,,,,''५१ आहेर नको मला मला इझल आहेर म्हणून दे.'' कसे असतात न मित्र ते दिवस नाही परत आयुष्यात येणार .
सध्या तो अतिशय चांगला कलाकार म्हणून नावारूपास आला आहे. नाशिक च्या मोजक्याच चित्रकार मध्ये गणला जातो आज तो जहांगीर आर्ट मुंबई ला त्याचे एकल प्रदर्शन आहे या ओक्टोंबर २०१५ मध्ये,,अश्या अनेक मित्र मैत्रिणीनी मला कॉलेज ला असताना मदत केली. मी काहीची मदत परत केली तर काहीची अजूनही परत करू शकलो नाही. जसे बाकी माझ्याकडे आहे तसेच बाकी माझेही दुसऱ्या कडे आहे .मला वेळोवेळी अनेकांनी मदत केली,,त्यामध्ये रवींद्र तोरवणे सर यांनी काम देऊन आर्थिक मदत केली,,मी याचेकडे बरीच काम शिकत असताना केली ,,,संजय खोचरे ,याचे तर कधी ५० कधी २०० कधी ४०० असे जवळ जवळ १००० रुपये तरी माझ्याकडे बाकी असेल. ,रघुनाथ श्रीरामवार हा माझा खूप जवळचा मित्र याचे हि २००० रुपये माझ्याकडे आहेत.या दोघांचे पैसे परत नाही करू शकलो मी ,,,आज हि माझ्याकडे त्यांची ती तेव बाकीच आहे .
मला इतरांनीही मदत केली ते मी त्यांना पैसे परत करू शकलो,पण त्यांचे ते ऋण नाही फेडू शकणार कधीच त्यामध्ये हृषिकेश चिंचोरे ,शुभांगी राजपूत,चंद्रशेखर अहेर , नमिता पारख, आमच्या मेस च्या मामी,आणि माझे रूममेट व क्लासमेट अश्या ची मदत मला झाली. सर्वांचे आभार .
नमिता ने मी डिप.ए.एड ला असताना १००० रु दिले होते . कॅनवास घ्यायला त्यावर मी जे painting केले होते . ते माझे कायम स्मरणात राहतील. तिचे ते पैसे मी २ वेळेस करून परत केले . त्यातील चित्र विकले नाही पण कॅनवास ची सुरवात मात्र त्या वेळी झाली.
माझा प्रदर्शक चा शो असो वा लीला चा मला अहेर , रघु ,हृषी आणि अमोल यांनी मदत केली आणि मी छोटे छोटे प्रदर्शन करू शकलो,,,,,सर्वांना सलाम

सुनिल बांबल