http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

१८०३ मराठा-इंग्रज दुसरे युद्ध (१२/०३/२०१५)लेख क्रं- ०६


      औरंगाबाद हून बुलडाणा ला जाताना मराठवाड्यातील माहोरा ते सिल्लोड मार्गावर आसई गावाचे गेट बनविले आहे ,,,, जाताजाता सहज त्याकडे लक्ष गेले. त्यावर युद्धभूमी आसई असे लिहिलेले दिसले. तेथे विचारपूस केली असता एक तरुण म्हणाला , चला मी दाखवतो तुम्हाला युद्धभूमी.
आम्ही लगेच गावात गेलो ,,सुरवातीला एक मंदिर लागले , ते बाहेरूनच न्याहाळत आम्ही पुढे सरकलो.
ज्या वेळी युद्ध झाले त्या वेळी म्हणे गावाच्या नदीला रक्ताचा पूर गेला मराठ्यांनी खूप संघर्ष केला पण इंग्रजांपुढे मराठ्यांचा पराभव झाला,पण इंग्रजांच हि नुकसान झाल,इंग्रजांचा मुख्य अधिकारी मक्सवेल ला शेवटी ज्या ठिकाणी हे युद्ध घडले येथेच युद्धात मारला गेला. आणि त्याची तेथे कबर बनविली आहे, हे तो तरुण सांगत होता आणि आम्ही अखेर त्या ठिकाणी पोचलो तेथे बघितले असता मला भल मोठ वडाचे झाड दिसले ज्याच्या पारंब्या ह्या खोडा सारख्याच मोठ्या होत्या आणि त्या पारंब्यानी जमीनीसोबत दोस्ती केली होती. मी तेथील दृश्य बघून थोडा नाराजच झालो. ती कबर आता मोडकळीस अवस्थेत आहे . तेव्हड्यात तो सांगू लागला या कबर वर पूर्वी सप्तधातूची प्लेट होती,त्यावर अधिकारी मक्सवेल चे चित्र अन नाव आणि मजकूर होता,,,,,काही वर्षा पूर्वी चोरट्यांनी ती प्लेट तोडून चोरून नेली,ते चोर पकडले बहुतेक आणि ती औरंगाबाद ला कुठल्यातरी पोलीस ठाण्यात जमा आहे म्हणे. आता ती प्लेट असेल कि नसेल माहित नाही आणि ते चोर पकडले गेले असेल तर असेल ही कदाचित.
हे सांगत असताना तो मक्सवेल ला राजा मक्सवेल असच संबोधत होता. तो म्हणाला सर येथे दर वर्षी त्या राजाची वंशज येतात आमच्या गावात. त्यांनी पैसे दिले होते त्या कबर आणि परिसरासाठी ,त्या कबर पर्यंत जाण्यासाठी सिमेंट चा रस्ता केला आहे,तो रस्ता तसा काही खास राहिला नाही आता,,,पण जाण्यासाठी रस्ता न दोन्ही बाजूनी विजे चे खांब आहे,,,कबर च्या भोवती पाच फुट उंचीची भिंत आहे तिला आतून बाहेरून टाइल्स लावल्या आहेत,,आजू बाजूचा परिसरालाही भीती उभारल्या आहेत,
हे बघत असता मी त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचा परिचय करून दिला. त्याच गजानन दाभाडे नाव तो B.Com II चा विद्यार्थी होता, अन कार वर चालक म्हणून हि काम करतो म्हंटला ,त्याच्या आई सोबत हि ओळख करून दिली त्याने. घरी थोडी शेती आहे म्हंटला ते हि बघतो. आणि आपल्यासारख कुणी गावात आला कि त्याला हे दाखवत फिरतो, इंग्रज लोक आले तर ते खूप पैसे हि देऊन जातात त्यांच्या सोबत फिरलं की. आणि तो सांगू लागला कि येथून जवळच असलेल्या पिंपळगाव कड ला या युद्धात पडलेली एकमेव तोफ आहे. मी त्याला विचारले अंतर किती असेल तरीही,,तो बोलला जास्त नाही,,,,,आणि आम्ही गाड रस्त्याने निघाली. activa होतीच सोबत तीनेही चांगलीच साथ दिली.
हळूहळू आम्ही त्या गावाजवळ पोचलो तेथे एक महाराजांची समाधी होती . तेथील लोक सांगतात त्या महाराजांना पक्ष्यांची भाषा समजायची त्यांच्या सोबत पक्षी बोलत असत . त्या च्यासमोर एक मोठा कोरीव दगड होता . प्राथमिक अंदाज लावता त्याच्या बनावटी नुसार तो मला जुन्या काळातील दगडी तेलघाणा वाटत होता.ते बघून आम्ही शेवटी तोफ जवळ पोचलो,,,ती तोफ तेथील मंदिरासमोर शेकडो वर्षी पासून गुपचूप पडून आहे.
अंदाजे ७-८ फुट लांबीची तोफ असावी ती , आणि पंच अथवा सप्त धातू ची मराठे इतिहासाची साक्ष असलेली. ते बघून मला खूप आनंद झाला. मी तोफ चा फोटो काढला. एक चक्कर त्या गावात हि मारली, भेट दिलेल्या दोन्ही गावातून केळणा नावाची नदी वाहते,,,व नंतर ती माझ्या आई च्या माहेरात मेलात जाऊन जुई ला मिळते. या केळणा-जुई च्या संगमावर एक महादेवाचे मंदिर आहे. आम्ही ती तोफ पाहून परतीचा मार्ग धरला.
मी त्याला गावात सोडू कि कस म्हणून विचारल,,,तो माझ्यासोबत माहोरा आला कारण त्याला तिकडेच काम होत पण तरीही त्याच काम सोडून त्याने मला इतिहासत नेल. धन्यवाद गजानन.
त्याचे आभार कसे मानावे कळत नव्हते ,,,म्हणून मी त्याला चहा घेऊ घेऊया अस म्हंटल असता त्याने झकास चहा मिळतो त्या ठिकाणी नेल. आम्ही चहा घेतला. मी चहाचे बिल दिल . आमची निरोप घ्यायची वेळ झाली…. मी हळूच ५० रुपये त्याच्या खिश्यात कोंबत असतानाच तो म्हणाला नाही सर मला पैसे नकोत उलट तुम्हाला मी माझ्या शेतातल काहीतरी द्यायला हव होत ,,,,,शेतात मक्का आहे पण अजून कंनस आली नाहीत . .
तुम्ही परत या शेतात हरभरा असताना,,,आम्ही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले न परत भेटू कधीतरी म्हणून एकमेकांचा निरोप घेतला. या २ तासाच्या प्रवास भेटीत एक नवीन मित्र जोडला गेला. त्याची परत कधी भेट होईल माहित नाही ,,,,,आम्ही निरोप घेतला तो त्याच्या रस्त्याला न मी माझ्या ,,, मला बुलडाणा ला पोचायला खूप उशीर झाला. पण एक इतिहास असलेल्या दुर्लक्षित ठिकाणाची आपल्याला ओळख झाली याच समाधान मिळालं.
सुनिल बांबल

Wednesday, August 5, 2015

ए.टी.डी. झालं म्हणजे शिक्षक होतं…. ( १०/०३/२०१५)लेख क्रं- ०५


        मी कला क्षेत्रात आलो च मुळात नोकरी मिळेल ही आशा बाळगून . मी समजायचो ए.टी.डी. झालो की आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळेल, म्हणून मी foundation केलेले असताना G.D.Art ला न जाता  ए.टी.डी. ला प्रवेश घेतला. पण मला कुठे माहिती होत की नोकरी साठी पैसा नसेल तर काही खरं नाही. संस्थांना सुद्धा शाळेत कलाशिक्षक भरताना कला नसली तरी चालती पण पैसा पाहजे, मग ते कॉलेज असो वा शाळा.
Govt.तर पदे भरत नाही, भरले तरी अंशकालीन भरतात आणि नंतर त्या अंशकालीन साठी ही लढाव लागत.
मला ए.टी.डी.आणि डीप.ए.एड चा नोकरी साठी फायदा नाही झाला.
सध्या इंग्रजी शाळांचे शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व वाढलं आहे ,  तर तेथे ही फार कमी मोबदला देतात आणि त्या कालाशिक्षकाला वेगळेच काम लागतात. पण किमान मानधन बरं असायचे.
 या पेक्षा वाईट अवस्था ही कॉलेज वरील सह. अधिव्याख्याताची असते. संस्थे मध्ये असणारा सह. अधिव्याख्याता याचे तर फार हाल असतात, मानधन नावाखाली ३००० ते ५००० आणि मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर मोठ्या मुश्किल ने ८०००-१०००० मिळतात. खरच सांगा कसा जगेल तो अधिव्याख्याता आणि तो कलाकार असेल तर त्याला लागणारा कलर ,कॅनवास आणि कलेच साहित्य याचे काय ? समजा एव्हड्या मानधनावर काम केल हि तरी पैसा घेतल्याशिवाय कुठली हि संस्था भरत नाही आणि भरेलच याची काहीच खात्री नसते. मित्राचा किस्सा ऐकून तर थक्क झाल मला त्याने १० वर्ष नावाजलेल्या संस्थेत जॉब केला ज्या वेळी कायम करण्याची वेळ आली त्या जागेवर दुसरा भरला,याने जाब विचारला असता कळले याचे पैसे ज्या माणसाच्या हाती दिले त्याने ते पुढे दिलेच नाही. बिचारा
असे समाजात खूप आहेत ज्यांच्या सोबत अश्या गोष्टी घडल्यात, पण कागदपत्रांच्या भरवश्या वर नोकरी नाही मिळत आता ,,,किमान कला क्षेत्रात तरी
मी रयत मध्ये २ वेळा मुलाखत दिली . मुलाखतीत नाव ,गाव ,पत्ता, तुम्ही रयत चे विद्यार्थी आहात काय ? असे प्रश्न विचारले होते. ठीक आहे या आपण, आम्ही कळवू आपल्याला. बस झाली मुलाखत,,,,,,, पहिल्या वेळी किमान फलक लेखन तरी करायला लावल होत.

मला माझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगावसा वाटतो ,२००८-०९ चा काळ होता तो,,, मी वसई येथील वसई विकसिनी दृक कला महाविद्यालय च्या मुलाखती ला गेलो होतो. मुलाखत झाली माझ काम ही मुलाखत घेणाऱ्या सर्व सभासदांना आवडले होत .नंतर मला सांगितले ३ तारखे पासून रुजू व्हा. मी सर्व तयारी केली नालासोपारा वेस्ट ला २५०० रु रेंट चे घर भाड्याने घेतले होत. मी खूप खुश होतो , ५००० रु मानधन मिळणार होत मुंबईत तस ते पुरेशे नव्हत तरीही माझी स्वारी मात्र खुश होती . त्या मागे कारण ही तसच होत मी मुंबईत राहून चित्र वर फोकस करू शकणार होतो. ३ तारीख उगवली मी सर्व तयारी करीत असताना मला त्या कॉलेज चे प्राचार्य गवळी सर चा फोन आला आणि ते म्हणाले आम्हाला dip.a.ed सेकंड क्लास पाहिजे म्हणे आणि तसा Govt.चा रूल आहे म्हणे.
 मला रूल ही माहित होता ,,,,जॉब साठी dip.a.ed फक्त पास असणे आवश्यक असते ,,,,मला भांडून जॉब करणे नव्हत. आणि हा जॉब कंत्राटी होता हे विशेष.
मग मी नाराज झालो थोडा काही दिवस करमले नाही,,पण मग मी जे घर भाड्याने घेतले होते तेथे सातत्याने काम करत राहिलो १७ महिने मी त्या ठिकाणी काढले आणि त्या कालावधीत ३ प्रदर्शन केली ,,एक समूह प्रदर्शन नेहरू सेंटर मध्ये केल या प्रदर्शनातून ५५००० हजार रुपयात ३ चित्र विकली गेलीत.ती चित्र फ्लोरिडा येथील अनिवासी भारतीय श्री रवी टाक यांनी घेतलीत,,नंतर २ रे माझा व्ययक्तिक प्रदर्शन प्रदर्शक ला तेथून हि १ चित्र विकले अन ३ रे प्रदर्शन लीला हॉटेल च्या गलरीत केल तेथून दक्षिण आफ्रिकला चित्र गेल. …. या कालावधीत केलेले एक काम Reader's Digest ने प्रकाशित करून मला मानधन हि दिल.
"धन्यवाद" गवळी सर,,, तुम्ही मला डावलल नसत तर मी चित्रावर कदाचित एव्हड फोकस नसतो करू शकलो.
पण म्हणतात ना
"जो भी होता ही अच्छे के लिये होता है।"

माझ्या माय-बापाचे शब्द एकले कि कसं तरी होत,,, ते राहून कधीतरी म्हणतातच कि
 "काय एवड शिकला आमचा सुनील अन त्याला नोकरी नाही .''
आणि हो महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र परिवारातील कुणी घरी आल्या वर आई विचारते ,
 तू पण हेच शिकलास का ?
आणि उत्तर हो आल्यास मग त्याला आई म्हणते
 ''काय रे भाऊ कशाला केल तू हे शिक्षण.''
 आई चा या शिक्षणा हून विस्वास उडाला मात्र माझ्या चित्रावर अजून तिचा ठाम विस्वास आहे.

 फक्त तिला वाटते दर महिन्याला एखाद्तरी चित्र विकत रहाव.जगण्यापुरता पैसा मिळत राहावा.

यशवंत कला महाविद्यालयात मी फौंडेशन आणि आर्ट टीचर डिप्लोमा केला होता. पुढे तोरावणे सर च्या सल्ल्याने अभिनव ला गेलो G.D.Art पूर्ण केलं,,,नंतर Sir J J School गाठलं,,, कालांतराने २०१४ च्या शेवटी मी यशवंत वर ४००० रु मानधन वर २ महिने काम केल सह. अधिव्याख्याता म्हणून. पण तेथेही मानधन पुरेसे नसल्या मुळे टिकू शकलो नाही ..4 हजार रुपयात कसे जगता आलं असते औरंगाबाद शहरात .या दोन महिन्यात मी खूप काही शिकलो. ज्या कॉलेज ला ए.टी.डी. केल त्या माझ्या कॉलेज ला शिकवायला मिळाले हेच फक्त काय ते समाधान. यशवंत मध्ये तोरवणे सर यांनी शिकवायची संधी दिली त्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे. 
शाळेवर कलाशिक्षक नाही झालो मात्र खासगी ट्युशन घेऊन कला शिक्षक होता आले. 
खासगी क्लास सुरू करून स्वतंत्र जीवन जगता येत.  

आणि ए टी डी झाले की शिक्षक होतं....

सुनिल बांबल

वड / banyan tree/ वटवृक्ष (०९/०३/२०१५) लेख क्रं- ०४


               का कुणास ठाऊक पण मला वडाच्या झाडाचा खूप लळा लागला होता. माझ्या घराच्या बाजूने दोन तीन घर सोडल्या नंतर भल मोठं वडाचे झाड नव्हे जणू वटवृक्ष आहे, त्या झाडाची सावली ,त्याची पान याचा पुरेपूर फायदा आजू बाजूचे सर्वच घ्यायचे. त्या पानावर कुरडया बनवायचे. आमची लहान मुलाची धमाल ती वटसावित्री पौर्णिमाच्या दिवस ला,,,त्या वेळी आजूबाजूच्या स्त्रिया पूजेला यायच्या ,आंबे आणि वेगवेगळा प्रसाद तेथे ठेवायच्या ,,,तो प्रसाद मात्र आमचाच असायचा. 
हे माझ्या लहान पनातील झाड अजून हि तसेच उभ आहे. आजू बाजूने पक्की एखाद दुसरी घर झालीत नवीन सिमेंट ची ते बांधताना त्या लोकांना त्याच्या काही फांद्यांना मात्र त्याच्या पासून दूर करावे लागल.जस माणूस लहान च मोठ होत जाताना जसे बदल घडत जातात तसे बदल त्यात हि घडले. माणूस म्हातारपणाकडे झुकल्यावर जस तो दिसायला लागतो तसी आज त्या झाडाची गत झाली आहे, आजू बाजुने घर असल्याने काही प्रमाणात फांद्या तोडल्याने त्याचे सौंदर्याचे तीन तेरा वाजले ,,,अगोदर चा पूर्वीसारखा रुबाबदार पणा न सौंदर्य त्यात दिसत नाही. त्याचा काहीही दोष नसताना शेजारी त्याचा अधून मधून उद्धार करतात.
मला मात्र या झाडाच नेहमीच कुतूहल वाटलं. याला येणारी कोवळी कोवळी पान असो वा नंतर येणारी लाल लाल फळ असो. मी जाम खुश असायचो कारण त्यावर ती फळ खायला वेगवेगळे पक्षी यायचे,कावळे,पोपटआणि अनेक छोटे छोटे पक्षी असायचे खारुताई चे तर नेहमीचे ठिकाण ,
आणि हो कोकिळा तर हमखास असायची, आणि आम्हाला आवाज दयायची,,
कुहु कुहु कुहु,,,,,
माकड आली कि काही खर नसायचं बर त्याचे आगमन झाले कि आम्ही फरार.
या वडाच्या झाडाने पुढे आर्ट मध्ये आल्यावर हि साथ सोडली नाही औरंगाबाद ला शिकायला काय गेलो तेथे तोरवणे सरांनी केलेली सुंदर सुंदर वडाच्या झाडाची चित्र बघायला मिळाली. नंतर पुढे मला हि राहवलं गेल नाही. मी ही
त्यावर collage & water colour मध्ये चित्र केलीत. मग मी कालांतराने माझ्या चित्राचे विषय बदलत गेले, मी थोडा creative चित्रांकडे वळलो. हि चित्रे करत असताना सारख वाटायचं कि आपण वडाच्या झाड हा विषय घेऊन painting करावीत आणि ती हि सृजनात्मक.
मी पुण्याला शिकत असताना चिखली-पुणे महामार्गावर खूप मोठ मोठी वडाची झाड होती आणि त्या सर्व झाडांवर लाल पांढऱ्या रंगाचे पट्टे होते ,ते पट्टे जणू सांगत होते कि हे सरकारी झाड आहे आणि हे कुणी हि तोडू नये ,,,आणि रोड रुंधीकरन मध्ये ते महाकाय वृक्ष तोडली गेली. त्या वेळी हे मी पाहत होतो पण अस वाटल नव्हत कि हा आपल्या चित्राचा कधी विषय हि होईल म्हणून. आणि मी सुरवात केली ती Banyan Tree series ला. आणि त्या मध्ये मी बरीच चित्र केली त्यातील काही चित्र अमेरिकेतील बोस्टन येथे आहे. या तीन चित्रातील २ चित्रचा लिलाव या शहरातील एका प्रसिद्ध मुझीयम मध्ये लिलाव झाला. आणि चांगल्या किमतीला ते चित्र विकली गेलीत. या मालिकेतील एक चित्र दक्षिण आफ्रिकेतील एका उद्योगपती ने हि घेतले आहे.आणि नुकतेच एक चित्र जपान ला ही गेल.
म्हणतात या झाडाच आयुष्य चारशे वर्षाच असत मग या चारशे वर्षात याच्या आजूबाजूने घडणाऱ्या किती गोष्टी बघत असल न बरे हे,
किती सत्ताधीश आणि किती संस्कृती हि बघितल्या असेल नाही का ?
पण मला वाटते कि हे वृक्ष दर वर्षी वाट पाहत असेल वटसावित्री पौर्णिमेची अन कदाचित माझ्या नवीन चित्राची.
याच मला कायम दर्शन व्हावे म्हणून मी याच नवीन रोप माझ्या घराच्या बाल्कनीत लावलं आहे.
सुनिल बांबल

मग,,, बाकी ? ( ०८/०९/२०१५) लेख क्रं- ०३


मी आणि माझा मित्र निलेश भारती आमचा मोबाईल वर सवांद चालू होता,,आम्ही बऱ्याच दिवसानंतर बोलत होतो. आम्ही बोलत असताना खूप विषयावर गप्पा रंगल्या ,,,आणि विषय सापडत नसल्यावर मला बाकी काय ,,बाकी काय ,,,म्हणायची सवय आणि मी असे बऱ्याच वेळा म्हणल्यावर,
तो म्हणाला,,, " सुन्या बाकी माझ्या कडे काही नाही तुझ्याकडेच आहे माझे बाकी ."
आणि आम्ही खूप हसलो. पण ते बाकी मी अजूनही दिले नाही.शेवटी तोच हसत म्हणाला त्या ५० मध्ये तुझ्याकडून १ रुपया तक न लग्नातला आहेर समज…मी म्हणालो ,,,,,''५१ आहेर नको मला मला इझल आहेर म्हणून दे.'' कसे असतात न मित्र ते दिवस नाही परत आयुष्यात येणार .
सध्या तो अतिशय चांगला कलाकार म्हणून नावारूपास आला आहे. नाशिक च्या मोजक्याच चित्रकार मध्ये गणला जातो आज तो जहांगीर आर्ट मुंबई ला त्याचे एकल प्रदर्शन आहे या ओक्टोंबर २०१५ मध्ये,,अश्या अनेक मित्र मैत्रिणीनी मला कॉलेज ला असताना मदत केली. मी काहीची मदत परत केली तर काहीची अजूनही परत करू शकलो नाही. जसे बाकी माझ्याकडे आहे तसेच बाकी माझेही दुसऱ्या कडे आहे .मला वेळोवेळी अनेकांनी मदत केली,,त्यामध्ये रवींद्र तोरवणे सर यांनी काम देऊन आर्थिक मदत केली,,मी याचेकडे बरीच काम शिकत असताना केली ,,,संजय खोचरे ,याचे तर कधी ५० कधी २०० कधी ४०० असे जवळ जवळ १००० रुपये तरी माझ्याकडे बाकी असेल. ,रघुनाथ श्रीरामवार हा माझा खूप जवळचा मित्र याचे हि २००० रुपये माझ्याकडे आहेत.या दोघांचे पैसे परत नाही करू शकलो मी ,,,आज हि माझ्याकडे त्यांची ती तेव बाकीच आहे .
मला इतरांनीही मदत केली ते मी त्यांना पैसे परत करू शकलो,पण त्यांचे ते ऋण नाही फेडू शकणार कधीच त्यामध्ये हृषिकेश चिंचोरे ,शुभांगी राजपूत,चंद्रशेखर अहेर , नमिता पारख, आमच्या मेस च्या मामी,आणि माझे रूममेट व क्लासमेट अश्या ची मदत मला झाली. सर्वांचे आभार .
नमिता ने मी डिप.ए.एड ला असताना १००० रु दिले होते . कॅनवास घ्यायला त्यावर मी जे painting केले होते . ते माझे कायम स्मरणात राहतील. तिचे ते पैसे मी २ वेळेस करून परत केले . त्यातील चित्र विकले नाही पण कॅनवास ची सुरवात मात्र त्या वेळी झाली.
माझा प्रदर्शक चा शो असो वा लीला चा मला अहेर , रघु ,हृषी आणि अमोल यांनी मदत केली आणि मी छोटे छोटे प्रदर्शन करू शकलो,,,,,सर्वांना सलाम

सुनिल बांबल 

Sunday, July 26, 2015

चित्र (०७/०३/२०१५) ओवी-०१


चित्र असत तरी काय
लहान मुलाचा प्रमाणात नसलेला विचार ,
त्याच्या भावनांचं हक्काच व्यासपीठ ,
मुलांच्या बुद्धीला चालना देणार खाद्द्य ,
त्याचं कागदावरच विश्व .
चित्र असत तरी काय
इंजिनिअर साठी त्याच इंजिनीरिंग drawing,
डॉक्टर साठी शरीराच्या आतील भागाचा अभ्यास,
लेखकासाठी कच्ची सामुग्री तर कवी मनास काव्याच्या पंक्ती,
इतिहासकारासाठी भूतकाळातील वर्तमान शिदोरी,
चित्र असत तरी काय
चित्राने दिला समाजाला इतिहास,
चित्राने संस्कृती चे दळणवळण हि केल,
चित्राने उद्रेक हि निर्माण केला,
आणि आपल गूढ हि जपलं .
खर तर चित्र असत
चित्रकाराच कसब
अन त्याला जगायला लागणारी रसद .
सुनील बांबल .

Saturday, July 25, 2015

कला क्षेत्रात प्रदार्पण(०६/०३/२०१५) लेख क्रं-०२


        मी लिखाणाला सुरवात तर केली ती माझ्या गणित च्या शिक्षक श्री बारोटे सर यांच्या सांगण्याहून ,,,,,मी लेखक तर नाहीच तेव्हा मला तुम्ही समजून घ्याल हि अपेक्षा.
मी चित्रकला क्षेत्रात आलो ते न ठरवता . म्हणावी तशी काही खास चित्रकला माझ्या अंगी नव्हती,तरीही या क्षेत्रात मी आलो ,,,,त्याचे झाले असे की मी दहावीला असताना माझा शेजारी मित्र दिनकर शेवाळे ला G D Art करायचे होते ,,,त्याचे तसे ठरलेलेच होते . म्हणून तो इंटरमिजीएट ची परीक्षा देत होता . त्याला सोबत म्हणून मला हि त्या परीक्षेला बसविले. तो क्लास करायचा आणि मी त्याचे पाहून चित्र काढण्याचा प्रयत्न करायचो. शेवटी परीक्षा दिली पास झालो आम्ही.त्याने लगेच अकरावी नंतर खामगाव ला टिळक राष्ट्रीय ला Foundation प्रवेश घेतला . माझा मात्र प्रवेश लांबला.
पुढे दहावी नंतर मी आर्ट मधून ११ -१२ केली. कसाबसा ५०% घेऊन पास हि झालो.
नंतर काय ? मोठा प्रश्नच की,,,,,, मोठी हिम्मत करून spm ला BA ला प्रवेश घेतला,,, सकाळी कॉलेज आणि दुपारी प्रकाश मेडिकल वर नोकरी ,,,,हे सहा महिने चालल मग माझ्या भावाच्या मित्राने भावाला सांगितले अरे हा चित्र चांगल काढतो याला ATD करायला पाठव ,,,मग काय ठरलं,,,,,,,,,,,,,आपण ATD करणार.
औरंगाबाद च्या यशवंत कला महाविद्यालयात ATD प्रवेश घ्यायला गेलो पण प्रवेश फुल्ल झालेले… तेथील सर म्हणाले Foundation ला प्रवेश घ्या . मला नको वाटायचे पण मित्र म्हंटला वर्ष वाया गेल्या पेक्षा कर. मी हि म्हंटल ठीक आहे, आणि प्रवेश निश्चित झाला.
आणि हेच Foundation ला प्रवेश म्हणजे ते माझ कला क्षेत्रात पाहिलं पाऊल ठरल.
या वर्षी तोरवणे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .या वर्गा विषयी मला बराच काही बोलायचे आहे ते मी पुढे लिह्नारच आहे,,,,,या एका वर्षाने माझ्या कला जीवनात खूप काही त्यावेळी घडवून आणले होते पण तरीही ,,,,,मला मात्र एकच माहित होते,,,ते म्हणजे ATD झाले म्हणजे शिक्षक होत.
सुनिल बांबल.

चित्र-प्रवास (०५/०३/२०१५) लेख क्रं-०१

       
      खऱ्या अर्थाने २६ डिसें २००९ च्या नेहरू सेंटर सर्क्युलर आर्ट gallery मधील group show ने माझ्या चित्र-प्रवासाला सुरवात झाली. त्या प्रदर्शनात माझ्या तीन कलाकृती अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका अनिवासी भारतीय couple ने घेतल्या…   स्वतः च्या प्रदर्शनातून न तेही हातोहात painting विकण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. 
,,,,,आणि आज माझी अनेक चित्रे वेगवेगळ्या देशात आणि शहरात पोचली आहेत ,,,,,,,,
कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क,फ्लोरिडा ,दक्षिण आफ्रिका,दुबई ,जर्मनी ,बोस्टन ,जपान ,,,,,,,,आणि भारतातील मुंबई ,पुणे ,हैदराबाद ,वडोदरा,दिल्ली ,चेन्नई ,जालना ,औरंगाबाद येथील कलारसिकांच्या घराच्या भिंतीवर विसावली आहेत,,,,त्यांच्या घर ऑफिस ची शोभा वाढवत आहेत . असे अजूनही मला परिचित नसलेल्यांच्या घरात हि माझी चित्रे आहेत ,,,,,,पुढे हि अनेकांच्या घरात ऑफिस मध्ये माझे चित्र त्यांच्या भिंतीवर विसावतीलच……
निसर्ग चित्रण करता करता मी नवनिर्मिती कडे वळलो …त्यातूनच मला नवी ओळख मिळवता आली ,,,या चित्रातील एका चित्राला प्रसिद्ध मासिक Readers Digest मध्ये ही स्थान मिळाले ,,,,,,,आणि काही चित्रांचा बोस्टन येथील एक museum मध्ये लिलाव झाला … पण सर्व प्रथम मला या creative चित्रांना प्रदर्शित करण्याची संधी दिली ती Gallery Pradarshak च्या सविता हिरा यांनी ,,,त्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे ,,,तसेच माझी निसर्ग चित्र online gallery विकून खूप सहकार्य करत आहेत.
माझ्या इतपर्यंत च्या प्रवासात खूप जणांनी सहकार्य केले त्यांचे ऋण मी कधिच चुकवू शकणार नाही,,,सर्वांना धन्यवाद
माझी पुढील चित्र मालिका ,,,,,आई अन मुल,,,,,,आहे… त्याला हि आपण असाच प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा
धन्यवाद .