अडव्हांस चे पेपर चालू होते ,,,,प्रिंट चा पहिला दिवस होता तो .
मी ,सिद्धार्थ ,प्रणव आणि ऋषी ,,,,,आम्ही चहा नाश्त्याला बाहेर आलो. वर्तमानपत्र बघत असताना ,,,करम सिनेमा ,,,inox ला लागला होता ,,,,आणि मोर्निग चे ५० रुपयेच तिकीट होते ,,,लगेच सर्वांनी प्लान केला आणि काय ,,,,सकाळी ९ ते १२ करम.
दुसर्या दिवशी कानडे सर झाले न आमच्यावर गरम.
त्यांना कळले कि आम्ही काल कुठेतरी गेलो होतो ,,,,आम्ही कशीतरी २ दिवसात प्रिंट करून सबमिट केली .
कांनडे सर मला रागावले ,,,त्यावेळी मी सहज म्हणून गेलो होतो .
कोण विकत घेत हो सर प्रिंट ला ?
जाउद्या ना ,
सर म्हणाले ,,,"अरे किमान प्रिंट च्या मास्तर समोर तरी नको म्हणू ".
नकळत माझ्या शब्दांनी त्याचं मन दुखावलं असाव .
दुखावलं असेलच तर खरच सॉरी सर,,,माझा तसा हेतू नव्हता.
कानडे सर सर्वांचे आवडते होते ,,,कधी कुणाला हि दुखावत नसत ,,,,,,नेहमी हसत बोलत
माझी बरेच वर्ष झाली भेट नाही … पण कॉलेज चे दिवस आठवले तर कानडे सर हमखास आठवतात च . .
No comments:
Post a Comment