http://sunilbambal.blogspot.in/

Monday, June 13, 2016

टी टी एम एम ३०/०५/२०१६

टी टी एम एम ,,,,ची अन माझी ओळख झाली . हे मला खूप आवडला. 
मी पुण्यात जी डी आर्ट ला गेलो ,,आणि हळूहळू नवनवीन मित्र होऊ लागले .मग सोमनाथ अयुब ऋषी हे मित्र झालेच होते ,,,या मैत्रीला गावाची किनार होती . कारण हे सर्व गावाकडून आलेले होते ,,,९ वाजता च्या दरम्यान चहा नाश्ताच्या बेत असायचा . वर्गात सर्व काम करताना मज्जा यायची ,,,,आमचा वर्ग हि जवळपास ६० ते ६२ मुलामुलीचा होता . 
जवळपास आता सर्वजण एकमेकाशी मिसळत ,,,एकदा असच मी ,सिद्धार्थ ,प्रणव अमृता आणि मरियम असे ५ -६ आम्ही विश्वा मध्ये चहा नाश्त्याला गेलो.
कुणी उत्तपा ,डोसा तर कुणी कोल्ड कॉफी सांगितली ,,,मी खिश्याचा विचार करत चहा सांगितला . त्या हॉटेलचे रेंट आम्ही रोज चहा घ्यायचो त्यापेक्ष्या ही जास्त होते. आणि मनात भीती हि होती कि हे बिल सर्व आपल्याला द्यावे लागले तर.
मी औरंगाबाद ला शिकताना किवा गावाकडे हि ,,,एकाद्याला बकरा करत असे ,,,,म्हणजेच पूर्ण बिल भरावे लागत असे.
सर्वांचा चहा नाश्ता झाल्यावर सर्वांनी आपापल्या खिशातून पैसे काढले ,,,,बिलाचे.
तेव्हा खर्या अर्थाने टी टी एम एम कळले ,,,,तू तेरा ,,मै मेरा . ,,,,,मग काय आज ,,,,,टी टी एम एम,,,, चा जमाना आहे ना.

No comments: