चित्रकार हा चित्र करत असताना त्या चित्रात एकरूप होऊन त्यात त्याच्या भावना ओतत असतो ,,,मग त्या चित्रचा विषय असेल ,,,रंग असेल ,,,त्याचा पोत ,,,चित्रसंवाद असेल. तो त्याच काम मोठ्या तन्मयतेने करून जातो.
ज्या वेळी दर्शक ,रसिक चित्र बघतो ,,,त्या वेळी तो चित्रकाराच्या नव्हे तर स्वतः च्या दृष्टी ने बघतो… तो त्या चित्रात स्वतः च अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतो. २०१० च्या लीला च्या प्रदर्शन मधून माझ एक चित्र दक्षिण आफ्रिका च्या अल्बर्ट डीणून ( Alburt Dinoon) नावाच्या व्यक्तीने चित्र विकत घेतले होत,,,मी जेव्हा त्याला विचारले कि तुम्हाला यात नेमके काय आवडले .
तेव्हा तो म्हणाला मला या चित्रातील रंगाची मांडणी आवडली, म्हणून मी अगोदर च्या दिवसी फोटो काढून घरी बायको ला दाखविला.
जेव्हा तिकडून होकार आला हे चित्र घेतले ,,,आमच्या दोघाच एकमत झाल. आणि हे घेतले.
त्यात नेमके काय आहे हे त्यांना माहित नव्हते ,,,ते चित्र घेतानाचा त्याचा दृशिकोन वेगळा होता .
नंतर त्या चित्राचा विषय समजून सांगितला ,,,ते एकूण त्यांना खूप आनंद झाला .
कारण त्यांनी नवरा-बायको दोघांनी एकमत होऊन ते चित्र घेतले आणि त्या चित्रात ,,,,हि लपलेले जोडपे होते .
उत्कृष्ठ चित्र घेतल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते .
काही वेळा असच एकमत न झाल्याने चित्र नापसंत झाले ,,,,आणि माझ्याकडेच राहिले .
प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा आहे ,,,,त्यामुळेच भिन्न भिन्न चित्रनिर्मिती होते आणि रसिक ना त्या चा आनंद घेत येतो.
प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा आहे ,,,,त्यामुळेच भिन्न भिन्न चित्रनिर्मिती होते आणि रसिक ना त्या चा आनंद घेत येतो.
No comments:
Post a Comment