http://sunilbambal.blogspot.in/

Monday, June 13, 2016

आकाशवाणी ०९/०६/२०१६


मी डीप.ए.एड. साठी Sir J J school of Art ला जायचं ठरवलं होत. अभिनव ला ५००० रु फी भरून डीप.ए.एड.केल्यापेक्षा Sir J J माझ्यासाठी उत्तम पर्याय होता.
फक्त प्रश्न होता तो तेथे राहण्याचा ,,,,
मुंबई मध्ये राहण्यासाठी खर्च तर लागतोच पण जीवाची मुंबई करूनच तुम्हाला तुमच्या प्रवासाला निघावं लागत ,,,मग ते ऑफिस असो वा कॉलेज. 
योगायोगाने माझ्या शेजारी राहणाऱ्या काका जवळ मी विषय काढला,तेव्हा ते मला पंडित दादा जवळ घेऊन गेले ,,माझी राहण्याची अडचण सांगितली. माझं सर्व ऐकून ते म्हणाले काही हरकत नाही. नाना कडे जा आणि मी पाठविले म्हणून सांग. तुझी मुंबईत राहण्याची व्यवस्था होऊन जाईल .
नाना भाऊ नी मला ताई च्या आकाशवाणी आमदार निवास चे एक पत्र दिले. आणि माझी मुंबई मध्ये राहण्याची सोय झाली होती .
यात च जी डी आर्ट चा निकाल हि आला होता ,,,,Sir J J ला जाण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला होता.
मुंबईत शिकण्याची अन राहण्याची सोय झाली होती.
मी खुश होतो,,,मात्र ४ वर्ष ज्या पुण्यातील मित्र मैत्रिणी होत्या ते सर्व अभिनव ला डीप.ए.एड.करणार होते, त्यांच्यापासून मी दूर गेलो ते कायमचाच,,,पुणे सुटले ते सुटलेच.
पुण्यात असताना आमचा बोन्दार्डे वाडा ,,अभिनव कॉलेज ,,,आणि मामीची मेस ,,,हेच खर विश्व होत माझ.
अभिनव मध्ये शिकायला मिळाले ते तोरवणे सर यांच्या सल्ल्याने.
हृषीकेश चिंचोरे , संजय खोचरे , सोमनाथ बोठे , गणेश तांबे , नवनाथ क्षीरसागर सारखे रूम पार्टनर मिळाले,संजय टिक्कल कडून ही खूप शिकायला मिळाले,,टिक्कल आणि खोचरे च माझे अप्रत्यक्षपणे गुरू होते. कॉलेज पेक्षा त्यांच्या कडूनच मी खूप काही शिकलो ,तसे सर्वांकडून मी काही न काही शिकलो. अनेक मित्र मिळाले.
अभिनव सोडून आकाशवाणी गाठली मी आणि परत मित्र जोडण्याचा प्रवास सुरु झाला ,,,अजून ही सुरूच आहे.
आता मात्र ठिकाण बदलले या प्रत्यक्ष ठिकाणांची जागा फेसबुक ने घेतली.
यशवंत ,,,,अभिनव ,,सर जे जी ,,,सारखेच माझ्यासाठी  'आकाशवाणी' होत.आकाशवाणीत अनेक मित्र बनले.काही व्यक्ती कायम मनाच्या कोपऱ्यात घर करून गेल्या. आकाशवाणी आमदार निवास मध्ये राहताना जे मंतरलेले दिवस काढले त्यातील किस्से आणि अनुभव लिहताना आनंद होईल. …
सुनिल बांबल ०९/०६/२०१६आकाशवाणी

कॉलेज च्या आठवणी ०१/०६/२०१६ सुनिल बांबल


रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अस आपण सर्वच म्हणतो. मी आतापर्यंत बऱ्याच वेळा रक्तदान केले आहे,रक्तदान केल्यानंतर एक वेगळेच समाधान मिळते. खरतर रक्तदान या सारख कुठलेच दान नाही ,,,,पण आपण रक्तदान कुणाला करतोय ते म्हह्त्वाचे. मला वाटते आपण रक्तदान करताना गरजू रुग्णालाच करावे. रक्तपेढी ला रक्तदान करते वेळी पेक्षा हजार पट आनंद मिळतो तो गरजू रुग्णाला रक्त देताना.
यशवंत ला असताना हेगडेवार रुग्णालय च्या रक्तपेढी ने रक्तदान शिबीर आयोजित केल होत मी हि रक्तदान करण्यास गेलो ,,,त्यांनी रक्तगट तपासणी केली सोबत च इतर हि तपासण्या केल्या,,,वजन ,हिमोग्लोबिन वैगेरे वैगेरे.
नंतर ते म्हणाले तुम्ही रक्तदान करू नका ,,,
ते म्हणाले ,,,,तुमच्या शरीरात १ % रक्त कमी आहे,,,
हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी आहे….
हे ऐकून मला थोड हसायला आल त्या वेळी… न राहवून मी म्हणालो,,माझ्या शरीराकडे बघून तर नका म्हणू अस .
ते म्हणाले तस काही नसत ,,,प्रमाण कमी जास्त कुणाच्या हि शरीराचे असू शकते…
मग माझ रक्त वाढायला काय करू ,,,किमान पुढच्या वेळी तरी मी रक्तदान करू शकेल ,,,त्यांनी काळ्या काळ्या गोळ्या दिल्या.
सोबत एक सल्ला …. . रोज मुठभर कच्चे शेंगदाणे आणि गुळाचा खडा खा.
रक्त वाढेल .मी त्या वेळी रक्तदान इच्छा असूनही नाही करू शकलो .
त्यानंतर मात्र मी आज पर्यंत सहा वेळा रक्तदान केलय.५ वेळा रक्तदान शिबिरात तर एका वेळा गरजू रुग्णास.
अभिनव ला इंटर ला असताना दिवाळी नंतर २८ दिवस कॉलेज ला गेलो नव्हतो मी ,,,कदाचित त्यावेळी माझ कॉलेज संपल्यात जमा झाल होत.अभिनव ला इंटर ला असताना दिवाळी नंतर २८ दिवस कॉलेज ला गेलो नव्हतो मी ,,,कदाचित त्यावेळी माझ कॉलेज संपल्यात जमा झाल होत.
strict Bed Rest चे प्रमाणपत्र ने वाचवल ,,,हा सविस्तर किस्सा कधीतरी .
२८ दिवसानंतर पहिलाच कॉलेज चा दिवस ,,,,त्यात शिक्षक माझ्यावर रागावलेले.
अमोल सांभार नावाचा मित्र आला त्याने वर्गात सांगितल ,,,कुणी O + रक्तगट असेल तर रुबी हॉस्पिटल ला नगर चा रुग्ण आहे . अपघात चा रुग्ण आहे मोठ्या प्रमाणात रक्त लग्न आहे कुणी इच्छुक असेल तर सांगा,,, मी शिल्पा मडम कडे लेखी अर्ज करून रक्तदान करायला गेलो ,,,तेथे रक्त तपासले व नंतर रक्त घेतले . तो रूग्ण नंतर वाचला कि नाही माहित नाही … दुसऱ्या दिवशी मात्र माझ्यावर तावरे सर नि फियरींग केली.
पण मला त्या रुग्णा ला रक्त दिल्याच समाधान होत .

कॉलेज च्या आठवणी / सुनिल बांबल ३०/०५/२०१६


अडव्हांस चे पेपर चालू होते ,,,,प्रिंट चा पहिला दिवस होता तो . 
मी ,सिद्धार्थ ,प्रणव आणि ऋषी ,,,,,आम्ही चहा नाश्त्याला बाहेर आलो. वर्तमानपत्र बघत असताना ,,,करम सिनेमा ,,,inox ला लागला होता ,,,,आणि मोर्निग चे ५० रुपयेच तिकीट होते ,,,लगेच सर्वांनी प्लान केला आणि काय ,,,,सकाळी ९ ते १२ करम. 
दुसर्या दिवशी कानडे सर झाले न आमच्यावर गरम. 
त्यांना कळले कि आम्ही काल कुठेतरी गेलो होतो ,,,,आम्ही कशीतरी २ दिवसात प्रिंट करून सबमिट केली . 
कांनडे सर मला रागावले ,,,त्यावेळी मी सहज म्हणून गेलो होतो .
कोण विकत घेत हो सर प्रिंट ला ?
जाउद्या ना ,
सर म्हणाले ,,,"अरे किमान प्रिंट च्या मास्तर समोर तरी नको म्हणू ".
नकळत माझ्या शब्दांनी त्याचं मन दुखावलं असाव .
दुखावलं असेलच तर खरच सॉरी सर,,,माझा तसा हेतू नव्हता.
कानडे सर सर्वांचे आवडते होते ,,,कधी कुणाला हि दुखावत नसत ,,,,,,नेहमी हसत बोलत
माझी बरेच वर्ष झाली भेट नाही … पण कॉलेज चे दिवस आठवले तर कानडे सर हमखास आठवतात च . .

टी टी एम एम ३०/०५/२०१६

टी टी एम एम ,,,,ची अन माझी ओळख झाली . हे मला खूप आवडला. 
मी पुण्यात जी डी आर्ट ला गेलो ,,आणि हळूहळू नवनवीन मित्र होऊ लागले .मग सोमनाथ अयुब ऋषी हे मित्र झालेच होते ,,,या मैत्रीला गावाची किनार होती . कारण हे सर्व गावाकडून आलेले होते ,,,९ वाजता च्या दरम्यान चहा नाश्ताच्या बेत असायचा . वर्गात सर्व काम करताना मज्जा यायची ,,,,आमचा वर्ग हि जवळपास ६० ते ६२ मुलामुलीचा होता . 
जवळपास आता सर्वजण एकमेकाशी मिसळत ,,,एकदा असच मी ,सिद्धार्थ ,प्रणव अमृता आणि मरियम असे ५ -६ आम्ही विश्वा मध्ये चहा नाश्त्याला गेलो.
कुणी उत्तपा ,डोसा तर कुणी कोल्ड कॉफी सांगितली ,,,मी खिश्याचा विचार करत चहा सांगितला . त्या हॉटेलचे रेंट आम्ही रोज चहा घ्यायचो त्यापेक्ष्या ही जास्त होते. आणि मनात भीती हि होती कि हे बिल सर्व आपल्याला द्यावे लागले तर.
मी औरंगाबाद ला शिकताना किवा गावाकडे हि ,,,एकाद्याला बकरा करत असे ,,,,म्हणजेच पूर्ण बिल भरावे लागत असे.
सर्वांचा चहा नाश्ता झाल्यावर सर्वांनी आपापल्या खिशातून पैसे काढले ,,,,बिलाचे.
तेव्हा खर्या अर्थाने टी टी एम एम कळले ,,,,तू तेरा ,,मै मेरा . ,,,,,मग काय आज ,,,,,टी टी एम एम,,,, चा जमाना आहे ना.

कॉलेज च्या आठवणी ,,२९/०५/२०१६

कॉलेज च्या आठवणी(भाग १/१)
अभिनव कला महाविद्यालय मध्ये शिकत असताना तेच ते व्यक्ती मॉडल असायचे ,,,बऱ्याच वेळा खप कंटाळा यायचा . आम्ही वेगळ मॉडल आणायचं ठरवलं ,,पार्किंग मध्ये एक म्हातारा मनुष्य पैसे मागत होता . आम्ही त्याला म्हंटले ५ तास बसायचे फक्त ,,६० रुपये देऊ . ५ दिवस यावे लागेल . तो म्हणाला .
मी मनात चित्र तयार केल होत ,,,मला त्याचा जसा चा तसा अवतार पेंट करायचा होता ,,,तसा मी केला . मुलांनी काका इकडे बघा तिकडे बघू नका ,,,यात तो जाम कंटाळला . अजून ५ दिवस बाकीच्या साठी बसा म्हंटले तर म्हणाला ,,,,पोराहो मी नाही येत तुम्ही देत त्यापेक्षा मी भिक मागून कमवितो. खरय राव .
कला महाविद्यालये आजही मॉडल ला खूप कमी पैसे देत . मॉडल म्हणून काहीच्या पिढ्या खर्ची झाल्या ,,,मोबदल्यात मात्र तुरळक वाढ झाली असेल ,,,,,असो .

कॉलेज च्या आठवणी (भाग १/२) / सुनिल बांबल ,,२९/०५/२०१६
अभिनव ला तेच ते व्यक्ती मॉडल असायचे ,,,बऱ्याच वेळा खप कंटाळा यायचा .बहुतेक सर्व कॉलेज ला हाच प्रोब्लेम असतो. अभिनव चे एक मॉडल विसरणे खूप अवघड आहे , शिक्षक कायमस्वरूपी नव्हते मात्र हे काका कायम होते ,,,कदाचित आता हि असेल . ,
मी खूप दिवस तर त्यांना साधू महाराज समजायचो ,,,कायम भगवी वस्त्र परिधान केलेली असायची ,,भली मोठी दाढी वाढलेली तसेच केसाच्या बटाही वाढलेल्या ,,,जणू काही नाशिकच्या कुंभ मेळ्यातील साधू च . .
नंतर कळले ते साध्य पुरुष नसून त्यांचा कायम स्वरूपी पोशाख च तो . आणि नंतर कळते ते पुण्यातील जवळपास सर्वच कॉलेज ला जात.
एलिमेंटरी पासून ते डिप्लोमा संपेपर्यंत त्यांचेच जास्त चित्र केली आम्ही .
डिप्लोमाच्या वर्षी तर ५ ते ६ मी या साधू चेच चित्र केली होती ,,,,कधी पाठीमागचा भाग बदलायचा , कधी नुसते रंग ओतायचे. .
या मॉडल चे काही डिप्लोमाच्या वर्षी चे वर्ग काम. एकाच व्यक्तीला रंगवताना ते हि नेहमीच खरच कंटाळा येतो ,,,,पण मज्जा यायची .

कॉलेज च्या आठवणी (भाग १/३) / सुनिल बांबल ,,२९/०५/२०१६
मला व्यक्तीचित्राची तशी काही खास आवड नव्हती ,,,मी जेव्हा संजय खोचरे आणि सोमनाथ च्या रूमवर राहायला आलो आणि हळूहळू मला त्यात रस वाढू लागला, पहिल्या दोन्ही वर्षी मी तैल रंग या माध्यमात चित्र रंगवायचो. रंग खूप महाग पडायचे म्हणून मी ठरवलं कि अडव्हांस पासून जलरंगात च व्यक्तिचित्रण करायचे . मनासी पक्क केल होत.
आम्ही रूमवर आलेल्यांना मॉडल बसवाय चो ,,,आणि कॉलेज हि काम व्हायचं.
आम्ही राहायचो ते ठिकाण म्हणजे बोन्दार्डे वाडा …या वाड्या च वैशिष्ट म्हणजे चार मधील ३ रूम मध्ये अभिनव ची मुल राहायची ,,,रात्री १ ते २ वाजे पर्यंत रोज कधी व्यक्तिचित्रण तर कधी गप्पा टप्पा चालायच्या. मग सकाळी उशिरा उठायचे.
सर्वाना सकाळी ७:३० चे कॉलेज असायचे ,,,४ रूम मिळून बाथरूम -टोयलेत एकच.
मग कॉलेज ला कधी वेळेवर जाऊच शकलो नाही. तावरे सर कायम रागवायचे त्यांनी डायरी केली होती उशिरा येणार्याची … दुर्दैव आमच च .
कायम नाव असायचं आमच ,,,,
उशिरा आल कि मग व्यक्तिचित्रण च्या दिवसी हवी ती जागा भेटत नसे ,,,त्यामुळे मात्र सर्व बाजूने व्यक्तिचित्रण करता आले .
परीक्षेला कुठे हि बसविले तरी मनात भीती राहिली नव्हती… अभिनवला मज्जा यायची. आता ते कॉलेज चे दिवस पुन्हा येणे नाही ,,,,आठवणीत रमताना मागे, वळून पाहताना ,,,,ते मंतरले ले दिवस आठवले की बर वाटते.

दृष्टीकोन ,,12/06/2016


चित्रकार हा चित्र करत असताना त्या चित्रात एकरूप होऊन त्यात त्याच्या भावना ओतत असतो ,,,मग त्या चित्रचा विषय असेल ,,,रंग असेल ,,,त्याचा पोत ,,,चित्रसंवाद असेल. तो त्याच काम मोठ्या तन्मयतेने करून जातो.
ज्या वेळी दर्शक ,रसिक चित्र बघतो ,,,त्या वेळी तो चित्रकाराच्या नव्हे तर स्वतः च्या दृष्टी ने बघतो… तो त्या चित्रात स्वतः च अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतो. २०१० च्या लीला च्या प्रदर्शन मधून माझ एक चित्र दक्षिण आफ्रिका च्या अल्बर्ट डीणून ( Alburt Dinoon) नावाच्या व्यक्तीने चित्र विकत घेतले होत,,,मी जेव्हा त्याला विचारले कि तुम्हाला यात नेमके काय आवडले .
तेव्हा तो म्हणाला मला या चित्रातील रंगाची मांडणी आवडली, म्हणून मी अगोदर च्या दिवसी फोटो काढून घरी बायको ला दाखविला.
जेव्हा तिकडून होकार आला हे चित्र घेतले ,,,आमच्या दोघाच एकमत झाल. आणि हे घेतले.
त्यात नेमके काय आहे हे त्यांना माहित नव्हते ,,,ते चित्र घेतानाचा त्याचा दृशिकोन वेगळा होता .
नंतर त्या चित्राचा विषय समजून सांगितला ,,,ते एकूण त्यांना खूप आनंद झाला .
कारण त्यांनी नवरा-बायको दोघांनी एकमत होऊन ते चित्र घेतले आणि त्या चित्रात ,,,,हि लपलेले जोडपे होते .
उत्कृष्ठ चित्र घेतल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते .
काही वेळा असच एकमत न झाल्याने चित्र नापसंत झाले ,,,,आणि माझ्याकडेच राहिले .
प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा आहे ,,,,त्यामुळेच भिन्न भिन्न चित्रनिर्मिती होते आणि रसिक ना त्या चा आनंद घेत येतो.