http://sunilbambal.blogspot.in/

Friday, September 22, 2017

प्रवास वर्णन

चित्रकार सतिष पिंपळे यांचे "अवघा रंग एक झाला " वाचले. त्यातील काही ठिकाणाविषयी वाचले ,,,त्या ठिकाणांना भेट देण्याचं मनासी ठरलं.मात्र इतक्या लवकर भेट देणं होईल हे माहित नव्हतं.
हिवरखेड ला लग्नानिमित्ताने आलो होतो,,,,लग्न आटोपले अन मी अकोली जहांगीर ला जायचं ठरले.
मी आणि माझे सासरे आम्ही दोघे सकाळी तयारी करून निघालो.
रस्त्यातच भास्कर महाराज संस्थान,आडगाव लागले. तेथील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न होत आणि मंदिर रचना पुरातन पद्धतीची होती.
बाजूनेच द्वारकेश्वर मंदिर होत त्याची बांधणी खूप वेगळी वाटली, बाजूने अजून एक उंच मंदिर आहे त्याच्या समोर भग्नावस्तेतील चौकोनी आकाराची, विहीर आहे.आत उतरायला पायऱ्या आहेत. मात्र या विहिरीत पाणी नाही, केर-कचरा आहे.एक बाजू ढासळली आहे. द्वारकेश्वर मंदिरासमोर दीपमाळ आहे.,,,,सर्व परिसर बघून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
अकोट हुन अकोली जहांगीर ला गेलो तेथे गावात पोचलो असता तेथील गावकऱ्यास विचारले ,,,गजानन महाराज यांनी सजल केलेली विहीर कोठे आहे ?
गावकऱ्यांचे उत्तर एकूण मी अवाक झालो, काय सांगावं सुचेना. त्या विहिरी विषयी मनात संभ्रम झाला.
गावकऱ्याने म्हंटले तुम्हाला कोणती विहीर बघायची ?
मी म्हंटले ,,,,,कोणती म्हणजे ?
महाराजांनी सजल केलेली.
तो म्हणाला,,,,,आमच्या कडे दोन विहिरी आहेत. एक गावात आहे अन एक गावाबाहेर पाच ते सहा किलोमीटर दूर आहे. रस्ता थोडा कच्चा आहे पण तुमची ऍक्टिवा जाईल व्यवस्थित.
मी विचार केला अगोदर गावाबाहेरची विहीर बघू अन परत आलो कि गावातली बघू.
मात्र तो रस्ता आम्ही विचार केला त्यापेक्षा खूपच खराब होता. पाऊस पडलेला असल्याने बऱ्याच ठिकाणी मागे बसलेल्यास उतरावे लागले. रस्त्यावर पाणी चिखल असल्याने चाक घसरत होती.
रस्त्यानं कुणी दिसत हि नव्हतं,,आम्ही पुढे पुढे जात होतो.
एका शेतात ट्रॅक्टर ने शेती ची काम चालली होती त्यांना विचारले ,,,ते म्हणाले जा समोर च आहे.
पण ठिकाण काही दिसेना.
पुढे दोन मोटरसायकल स्वार दिसले त्यांना विचारले ते बोलले जेवढे आले तेवढेच पुढे आहे.आम्ही म्हंटले महाराज आपली परीक्षा तर घेत नाही ना.
अस म्हणून पुढे चालत राहिलो. पुढे आल्यावर थोडं मंदिराचं शिखर अन काही भाग दिसल्यावर बर वाटलं .
जवळ आल्याच समाधान मिळालं,,,,
तेथे गेल्यावर विहिरीचं थंडगार पाणी काढून फ्रेश झालो.अजून एक बादली पाणी काढलं,,,मनसोक्त थंडगार पाणी पिऊन तृप्त झालो. मंदिरात गजाननाचे दर्शन घेतले, आणि बाहेर येऊन न राहवून एक आठवण म्हणून एक फोटो घेतला.
आम्ही कच्च्या रस्त्याने परत न जाता पोपटखेड रोड ने अकोट ला पोचलो.
अंजनगाव च्या रस्त्याने येताना भुईमूंग च्या शेंगा विकत घ्यायचं ठरलं होत.शेतात शेंगा काढन चालू होत. पण मार्ग वेगळा निवडल्याने शेंगा घ्यायचं राहून गेलं अस मनासी वाटून जाते न जाते तोच मागून एक ट्रॅक्टर येत होत त्यात शेंगा होत्या ,,,त्यांनी पन्नास रुपयात भरपूर शेंगा दिल्या.
आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
गजानन महाराज च्या विहिरीला भेट देऊन हिवरखेड ला परतलो त्या दिवसी मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवसी परतीचा प्रवास सुरु झाला.
मी दोन महिने यशवंत ला जी डी आर्ट ला शिकवायला होतो ,,,,,तेव्हा शीतल नावाची विद्यार्थिनी होती.,तीच गाव हिवरखेड च्या आसपास आहे तेव्हा मी तेल्हारा ला निघालो असता मी सहज माझ्या स्टूडेंट शीतल ला फोन केला. तेव्हा तिने सांगितले या सर माझ्या घरी. मॅडम सोबत आणल्या का नाही . तिने एकदा सांगितले होत तीच गाव हिवरखेड पासून जवळच आहे ,,,,तिच्या वडिलांनी रस्ता सांगितला ,,,,जवळपास 10 किलोमीटर अंतर होत. रात्री पाऊस पडलेला असल्याने नदी ला पूर येऊन गेला होता रात्री पुलावरून पाणी वाहिले होत. रस्तावर काट्याच्या काड्या आणि इतर घाण वाहून आलेली होती. त्यांनी सांगितल्या प्रमाणे रस्ता विचारात विचारत मी कोलद ला पोचलो. त्यांच्या घरी पोचलो,,,घर बघितले.
जुन्या पद्धतीच पण छान ठेवलेले घर होत ,,,मागे छोटसं गार्डन होतं,,,त्यात गुलाब ब्रम्हकमळ आणि बरीच वनस्पती होत्या. बाजूनेच त्यांचं नवीन घर बांधकाम चालू होत,,,मात्र त्यांनी जुने धाब्याचे घर हि जपले होत.या घराचे खास वैशिष्ट्य असते,, उन्हाळ्यात ते तापत नाही आणि हिवाळ्यात गरम राहते.
चहा घेत नाही म्हंटल्यावर शीतल च्या आई ने पोहे केले ,,,,मस्त इंदोरी पोहे. थोडीसी साखरेमुळ पोहे ला गोडवा होता,,,सोबत सोन पापडी हि होती.
शीतल चे बाबा शेतातून घरी आले होते ,,,त्यांच्या शेतातील भुईमूंग च्या शेंगा काढण्याची गडबड चालू होती.
बराच वेळ गप्पा झाल्या. शीतल चे बाबा-आई ,काका-काकू ,,,आणि भावंडाना भेटून छान वाटले.
शीतल ची बहीण साक्षी हि छान चित्र काढते.drawing आणि colour हि सुरेख करते.भाऊ सद्या 10 च्या निकालाची वाट बघतोय. शेतातून आणलेल्या शेंगा सोबत दिल्या. गुलाब बाबा विषयी माहिती दिली जाताना भेट देण्यास सांगितले ,,,,पुढील रस्ता कसा ते हि सांगितले.
जाताजाता मला त्यांनी रस्ता दाखविला ,,,,ते शेताकडे गेले अन मी गुलाब बाबा मंदिरास धावती भेट देऊन काही फोटो घेत पुढील प्रवास सुरु केला.
गुलाब बाबा मंदिर परिसर बघून थेट वरवट बकाल आणि पुढे शेगाव. रस्ता चांगला असल्याने बर्यापैकी वेगाने निघालो होतो.
शेगाव आल्यावर कलश दर्शन घेत मी खामगाव कडे निघालो ,,,,अर्धा टप्पा पार झाला होता मी बर्याच वेळा तेथून जात असताना Sanjay Gulhane यांच्या घरी भेट देत पुढे जायचो ,,,,पण या वेळी मी Prakash Kute यांना भेटायचं ठरवलं.
फेसबुक वर बोलताना मी त्यांच्याकडून मोबाईल नंबर घेतला होताच फोन केला त्यांनी ते घरीच आहे अस सांगितले.
बस थांब्यावर थांबायचं ठरल.
ते आल्यावर त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जायचे होते.
मग काही वेळ वाट बघून झाल्यावर ते आले ,,,,फेसबुक वरील एखादी व्यक्ती प्रत्येक्षात भेटल्यावर काय आनंद होत असेल ते त्या दिवसी कळले.
खर तर मी त्या दिवशी पहिल्या फेसबुक मित्राला भेटत नव्हतो.
त्यांच्या घरी गप्पा झाल्या ,,,चित्रकलेचे शास्त्रीय शिक्षण न घेताही चित्रकलेत पेंटर म्हणून आयुष्य जगणारे ,,,आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणाऱ्या महान व्यक्तिमत्व माझ्या समोर होते ,,,विविध गोष्टीवर चर्चा करत होतो तो पर्यंत त्यांच्या पत्नीने स्वादिष्ट भोजन बनविले.
आमरस , कढी , कांद्याची चटणी ,पापडाचा खुडा ,चपाती ,,,,सर्व काही
दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती,,,,,न लाजता भरपेट जेवलो.
तुप्त झालो ,,,एका मोठया मनाच्या कुटूंबास भेटलो होतो मी.
यांना भेटण्याच एकमेव कारण म्हणजे ते माझ्या चित्रांना ज्या कॉमेंट करायचे त्या थोड्या हटके आणि साहित्य ची जोड देऊन असायची .
खूप दिवसा पासून भेटण्याची इच्छा होती,,,,,ती पूर्ण झाली.
त्यांची झाडविषयी ची ओढ पाहून मला चांगले वाटले ,,,बाहेर गुंज पत्ता चा वेल होता, त्याचे पान गोड लागतात ,,,गुंज च्या काही बिया घेतल्या होत्या मी न विसरता.
जेवणा अगोदर एक वॉटर कलर चित्र त्यांना भेट म्हणून केलं.
गप्पा संपत नव्हत्या पण मी पुढे घरी जायला अंधार होईल म्हणून आवरते घेत निरोप घेतला.

No comments: