चंद्रशेखर गोखले सर यांनी माझ्या चित्रावर शब्दसुमने उधळत माझा आत्मविश्वास वाढविला .....त्यांचे शब्द जसेच्या तसे मी माझ्या ब्लोग वर टाकत आहे,,,,सोबत ज्या चित्राविषयी त्यांनी लिहिले ते चित्र ही .....सर धन्यवाद ,,तुम्ही माझे चित्र share करून माझ्या कलेचा गौरव केला. खूप खूप धन्यवाद.
त्यांचे माझ्या चित्राविषयी चे शब्द जपण्याचा छोटासा प्रयत्न ,,,
सुनीलच्या या चित्रात विलक्षण अर्थ सामावलेला आहे, ग्रंथ लिहून जी गोष्ट अपूर्ण राहू शकेल ती याने याचित्रात मोठया कल्पकतेने पूर्णत्वास नेली
मराठी भाषेत श्लेष हा जो एक रम्य कल्पक प्रकार आहे तो याने याचित्रात आणलाय.( स्त्री आणि माता ).
मुलाला झोळीत घालून कष्ट करणारी माता हा तसा पुरातन तितकाच सवयीचा झालेला विषय अधोरेखीत करताना त्याने दाखवलेली रसिकता ही त्या त्याच्या व्यक्तिमत्वात असलेली तरलता आहे,निव्वळ चित्राकार म्हणून मिळवलेली कामातली सफाई नाही.त्या झोळीची रचना त्या बाईचं पाठमोरं असणं आणि डोक्यावरच्या ओझ्याचा भास, तसच झॊळीत आईच्या भरवशावर निवांत झोपलेला जीवही .. जागतीक पातळीवर दखल घ्यायला लावणारं चित्र आहे
चिखली सारख्या छोट्याशा गावात राहून हा चित्रकार आपली साधना करतोय... बायकोची भक्कम साथ ही त्या कलाकाराची खरी ताकद आहे
पण आपण सुद्धा अशा कलाकराना जगासमोर आणण्यासाठी काहीतरी विचार करणं आणि विचार कृतीत आणणं गरजेचं आहे
सुनील मला खात्री आहे श्री गजाननाच्या कृपेनं तू नक्कीच यश किर्तीच्या शिखरावर पोहोचशील याची मला खात्री आहे... (हा लेख लेखक-कवी श्री चंद्रशेखर गोखले यांचा ४ एप्रिल २०१७ ला फेसबुक वरील आहे. )

1 comment:
वाs खुपच सुंदर ! अभिनंदन ! शुभेच्छा !
Post a Comment