http://sunilbambal.blogspot.in/

Sunday, September 24, 2017

' पोही ' वरचा महादेव


चिखली शहरातील जुन्या मंदिरापैकी ' पोही ' वरचा महादेव हे एक मंदिर.
८ ते १० फुट उंचीचे हे मंदिर हेमाड पंथी प्रकारातील आहे. मंदिरावर नक्षीकाम नाही मात्र मोठ मोठे दगडावर दगड ठेऊन हे मंदिर बांधकाम आहे.पूर्वी हे काळ्या पाषाणात काळेशार उठून दिसे. मंदिरात पिंड आहे बाहेर नंदी ,,,सध्या ते MIDC मध्ये गेल्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे,त्याची रंगरंगोटी केली आहे.
पूर्वी या मंदिराजवळ भंडारे व्हायचे,,,'रोडगे' आणि वरण ,वांग्याची भाजी असा मेनू असायचा. मी त्यावेळी आवर्जून या भंडाऱ्यात जायचो. आता तेथे भंडारा होतो कि नाही माहित नाही.
एक वेळ भेट देण्यासारख मंदिर,,,,अवश्य जा
या मंदिराच्या समोर एक बारव मोडकळीस आलेला आहे.MIDC ने त्या बारवाचा ही जीर्णोद्धार केल्यास त्याला पूर्व सौंदर्य प्राप्त होईल. 

2 comments:

Anjalideshmane said...

फार सुंदर चित्र. मनाला शांतता वाटते बघून.

Sunil Bambal said...

हो ,,,अतिशय सुंदर आहे हा भाग. पूर्वी इकडे जास्त वर्दळ नसायची.पण आता MIDC मुळे हा भाग वर्दळीचा झाला. आता बरेच लोक येथे भेट देतात.