मी पुण्याला शिकायला गेलो खरा ,,,सुरवातीला मावस भाऊ गजानन काळे च्या रूम ला होतो. त्यांचा डब्बा यायचा त्यातच मी ही असायचो . नंतर अभिनव ची काही मुला एकत्र येउन रूम केली. मी त्या रूम वर जेवण बनवून सहा महीने काढले,,,,,पुढे मी खोचरे च्या रूम वर राहायला गेलो. अगोदर च्या रूम वर जेवण बनवायचो आम्ही. नवीन रूम वर तसी सोय नव्हती.मग काय संध्याकाळी कधी पोळीभाजी केंद्र तर कधी काही ,,,दिवस वडापाव आणि मिरची मात्र असायची.
बाहेरच्या या खाण्याने आणि वडापाव च्या तेलाने माझा घसा खराब झाला होता आणि खोकला लागला होता.
हे संजू भाऊ ला माहित झाले मेस साठी पैसे नाही म्हणून मी बाहेर वडापाव वैगेरे खातो. तेव्हा ते मला मामींच्या मेस वर घेऊन गेले.
मामीची मेस म्हणजे अभिनव ची हक्काची खानावळ च.
मी गेल्यावर बघतो तर ,,,त्या मेस ला अभिनव चीच जास्तीत जास्त पोर … काही पोरी होत्या त्या हि अभिनव मधीलच वास्तुकला विभागाच्या.
आणि या मेस चा इतिहास हि तसाच ,,,बाळू देवरुखे ,अरविंद कोळपकर,सतीस काळे,संजय भालेराव,बाळासाहेब अभंग,अनिल फलके ,,,आणि बरेच्या नावाजलेले चित्रकार त्या मेस चे सदस्य.
मी जायचो त्यावेळी खास काम करणारी पोर होती ,,जेवायला गेलो कि मस्त गप्पा टप्पा व्हायच्या. चित्रकले वर वादविवाद व्हायचे. त्यावेळी या मेसला संजय खोचरे,संजय टिक्कल ,हवाले,संदेश खुळे,सोमनाथ,भूषण वनकुद्रे,असे बरेच होते.आणि हो या मेस मधील किमान एक तरी राज्यातून मेरीट असायचा बर.
मेस मध्ये बाळू देवरुखे ने केलेले एक सुंदर तैल रंगातील चित्र होते .
मामीच तस छोट कुटुंब ,,,,मामी त्यांची २ मुल आणि मामा.
मामी चा स्वभाव अतिशय शांत होता ,,,चेहऱ्यावर कधीही ताण दिसला नाही. आम्हा सर्व मुलांना लेकरा परी जपायच्या. आमच्या साठी कधी शक्य तोवर मेस बंद नाही ठेवली.कुठला हि सण असेल तर घरी जे पदार्थ करतात तेच करून आम्हाला खाऊ घालायच्या. पुरण पोळी,भजे वडे,खीर हे सर्व असे ,,,जसा सण तसे पदार्थ.
मोठे उपवास हि सर्वाना बंधनकारक होते,,, फराळाची रेलचेल असे मात्र.
जेवायला गेलो नाही तर खूप रागवायच्या.
मेल्या,मुडद्या काल कुठे गेला होता, असा शब्द प्रयोग असायचा ,,,घरच्या सारखा.
मामा फार गप्पा करणारे होते ,,,मेस वरील सर्व मुलांना ते बोलत असत ,,,,मुलगा कुठल्याही भागातील असला तरी त्याच्या भागात मामा जाऊन आलेले असायचे ,,,तिकडचे कुणी ना कुणी त्यांच्या परिचयाचे असायचे. खडकवासला धरण फुटले तो किस्सा ते बर्याच वेळा सांगायचे त्यांच्या गप्पा तून मस्त वेळ जायचा मेस ला आल्यावर. ते वधु-वर सूचक केंद्र चालवायचे.
मी तर पुणे सोडे पर्यंत मामीच्या मेस ला जेवलो.
अभिनव सोडून मी जे जे ला गेलो,,मुंबई त गेल्याने पैश्याची थोडी अडचण जास्त च येत होती ,,,मामी चे पैसे हि देणे होते मला.
जे जे चे कॉलेज आणि येथील दिवस फार कठीण होते ,,,जेवणाचे तर फार च वाईट हाल होते ,,,जास्त पैसे देऊन हि मामीच्या जेवणाची सर कधीच आली नाही त्या जेवणाला. दिवसामागून दिवस संपत चालले होते आणि जेवायला गेलो की मामीच्या पैश्याची आठवण यायची,,,मी एकदोन वेळा पुण्यात आलो जे जे ला असताना ,,,पण पैसे नसल्याने मी मामी कडे गेलो नाही.
मी मेस ला असताना मामी बऱ्याच वेळा सांगायच्या कि अरे माझे जेवणाचे पैसे अनेकांनी डूबविले,, त्या म्हणायच्या कि काही ची तर चित्र खूप महाग महाग जातात म्हणे,,,पण तरीही माझे पैसे मात्र देत नाहीत.
मला या मामीनी सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या ,,,कधीकधी वाटायचे आपण ही यातलेच निघालो काय ? अस मामी आपल्या समजत असाव्या .
मन बेचैन व्हायचे,,,पण मी वाट पाहायचो कि आपल्याकडे कधी पुरेशे पैसे येईल अन मी मामी चे पैसे नेउन देईल.यात जवळ पास १ वर्षा पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल ,,,कदाचित मामी नि माझ्याकडील पैसे बुडाले अस समजले हि असेल. बऱ्याच वेळा मला शिव्या दिल्या असेल.
परीक्षेचा काळ जवळ येत होता ,,शाळा वरील पाठ संपले होते. इतरांचे कॉलेज वरील पाठही संपले होते ……. म्हणून की काय मला चौधरी सरांनी जे जे च्या ए. टी.डी च्या वर्गावर पाठ घायला सांगितले.
माझे २ पाठ संपले होते आणि ३ रा पाठ चालू होता ,,,,,आमचे जे जे चे वातावरण थोडे तापले होते ,,त्यातच मुलांनी आंदोलन उभ केल ,,,त्यात आम्ही सर्व भरडून निघालो, मुलाच्याच म्हणण्याने परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. आम्ही बाहेर गावच्या मुलाचे मात्र त्यात नुकसान झाले ,,,,आर्थिक आणि मानसिक. आणि शैक्षणिक ही.
जेजे ला असताना तसा माझा भर चित्रावर होताच ,,,मी काही जलरंगातील चित्र केली होती ,,त्यातील २ चित्र विदेशी नागरिकाने घेतली ,,,त्यातून बर्यापैकी पैसे मिळाले होते.
मी थेट पुणे गाठले ,,,,मिळालेल्या पैश्यातून ३००० रुपये मामी च्या हाती ठेवले. मामी च्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळले ,,,ते बघून खूप समाधान लाभले मला.मामी ला माझ्या कडील बाकी दिली दोनशे काही रुपये बाकी होते ,,,पण मी मामीला सांगितले हे मी देणार नाही हे असू द्या माझेकडेच,,,त्या निमिताने मला परत भेटता तरी येईल तुम्हाला.
या माउली ला विसरणे थोडे अवघडच आहे. सोमा च्या लग्नात परत भेट झाली होती.
सोमाच्या लग्नातील भेटी नंतर भेट झाली नाही ,,,,धन्य ती माउली.
तिच्या प्रेमाची अन मायेची शिदोरी आम्हाला मिळाली.
सुनिल बांबल १२/११/२०१५ चिखली
1 comment:
खूप पुण्याई कमावली आहे मामींनी. तुमचाही प्रामाणिक पणा प्रकर्षाने दिसून येतो.
Post a Comment