http://sunilbambal.blogspot.in/

Saturday, November 14, 2015

मुंबईतील पहिला मुक्काम



अभिनव मधील डिप्लोमा ची परिक्षा झाली अन अभिनव पासून मी दूर झालो. ते कायम चाच…. 

मी परिक्षा संपताच गावाकडे निघून गेलो. जे जे ला प्रवेश घ्यायचा अशी इच्छा खूप होती ,,पण मुंबई तील वातावरण ,खर्च याचा विचार करणे हि गरजेचे होते. मुंबई मध्ये किमान राहण्याची सोय होणे महत्वाचे होत,,कारण मुंबईत पोटाला भाकर सहज मिळते पण राहायला जागा नाही. कुणी ओळखी च नसले कि मुंबई समजते.
२००५ चे साल असाव ,,,,मी आणि जगनाडे एकदा एका सोसायटी च्या प्रदर्शनासाठी एन्ट्री घेऊन गेलो होतो. दुसर्या दिवशी कुठले तरी जहांगीर ला प्रदर्शन पाहण्यासाठी थांबायचे होते. आमच्या ओळखीचे कोणी नव्हते.

प्रश्न होता ,,,,,,आता थांबायचे कुठे ?

जसा जसा अंधार पडायला लागला,,,काय कराव सुचेना.
मग आम्ही आझाद मैदानाकडे कूच केला ,,,बराच वेळ गेल्यावर थोडे फार जेवण केले. परत खूप वेळ आझाद मैदान.
आझाद मैदान ला थांबणे थोड त्रासदायक ठरलअसत ,,,मग काय ?
स्केचिंग पेपर होतेच ,,,,आम्ही मुंबई सी एस टी ( V.T ) ला थांबायचं ठरले.
हळू हळू रात्र पुढे सरकत होती,,,, का कुणास ठाऊक पण ती रात्र खूप मोठी वाटत होती.
स्केचिंग करून हि कंटाळा येत होता एक वाजला….  दीड झाला… दोन झाले ,,,मात्र पुढील काळ संपता संपेना. अधून मधून आम्ही कुणी स्केचिंग कुणी झोप हे चालू होत ,,,,मात्र झोप काही येईना ,,,डोळे बंद असायचे,,,तेवढेच खर ,,मनाला समाधान.

सकाळ चे ४ वाजले आणि सूचनांच्या फेऱ्या झाडू लागल्या,,,,कुपया सभी यात्रीयो ने अपने अपने तिकीट या प्लटफार्म तिकीट निकाल के रखे…
हे कानावर पडले आणि मी आणि जगनाडे तेथून बाहेर पडलो.
हिवाळ्याचे ते दिवस स्टेशन मधून बाहेर पडलो ,,,मुंबई मध्ये जास्त थंडी नसल्याने आम्ही थंडी पासून बचावलो. स्टेशन बाहेर आल्यावर हवेतील गारवा जाणवत होता. एवढ्या भल्या पाहटे मी स्वप्नात हि उठलो नव्हतो.
पण त्या रात्री झोपलो अस म्हणव तरी कस.
बाहेर पडलो आणि मस्त एका ठिकाणी गरम गरम चहा घेतला. त्या गारव्या मध्ये चहा ची मज्जा च वेगळी होती. त्या चहाने मुंबई तील दुसऱ्या दिवसाचा दिनक्रम चालू झाला,,,,न थकता,,,,थेट प्रगती एक्सप्रेस मध्ये बसे पर्यंत.
असाच वरील पेक्षा हि वाईट अनुभव पुणे येथील आहे त्यात आम्ही चौघे मित्र होतो,,,दत्ता बागुल , शिंगणे ,सुरेश वाघ आणि मी….तो ही सांगेल

पण,,,ही मुंबई तील रात्र आठवली की , मुंबईत राहणाऱ्या मित्राची आठवण येते ज्यांनी कधी मुंबईला गेल्या वर त्यांच्या रूम वर आश्रय दिला.

या कटू आठवणी मुळेच मुंबईत शिकायचं तर आहे पण राहायचं कोठे हा मोठा प्रश्न मनात सलत होता.
मुंबईला बॉम्बे आर्ट सोसायटी , आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रदर्शनाच्या एन्ट्री घेऊन येताना काही मित्र झाले ,,,त्यातले काही आमदार निवास ला राहून शिकत होते ,,,कुणी ३ ऱ्या वर्षा ला होते तर कुणी शेवटच्या .
त्यामुळे आमदार निवास ला सोय होऊ शकते,,,अस मनात पक्का झाल होत. पण कशी होणार ?

आमच्या शेजारच्या काकांना मी ही अडचण सांगितली ,,,, त्यांच्या ओळखीचे चिखली तील श्री पंडितराव देशमुख यांना आम्ही भेटलो . काका ची ओळख असल्याने ते हो म्हणाले.
ताई च्या कानावर टाकतो म्हणाले.
चार पाच दिवस गेल्यावर परत भेटलो ,,,त्यावेळी डिप्लोमाचा निकाल लागलेला होता. मला ७०% च्या वर गुण मिळाले होते ,,,आणि राज्यातून पाचवा मेरीट.
हे सांगितल्यावर ते म्हणाले ,,,अरे वा ,,,काही काळजी करू नको. होऊन जाईल तुझी राहण्याची सोय.
ताई च्या ऑफिस ला जा तेथे नाना ला भेट,,,आणि सांग मी पाठवले.

मी ऑफिस ला गेलो तेथे नाना भाऊ ला भेटलो. नाना ने ताई चे एक पत्र दिले ,,,,,आणि माझी आमदार निवास ला राहण्याची सोय झाली.

सुनिल बांबल १५/११/२०१५ चिखली

Thursday, November 12, 2015

अन्नपूर्णा



मी पुण्याला शिकायला गेलो खरा ,,,सुरवातीला मावस भाऊ गजानन काळे च्या रूम ला होतो. त्यांचा डब्बा यायचा त्यातच मी ही असायचो . नंतर अभिनव ची काही मुला एकत्र येउन रूम केली. मी  त्या रूम वर जेवण बनवून सहा महीने काढले,,,,,पुढे मी खोचरे च्या रूम वर राहायला गेलो. अगोदर च्या रूम वर जेवण बनवायचो आम्ही. नवीन रूम वर तसी सोय नव्हती.मग काय संध्याकाळी कधी पोळीभाजी केंद्र तर कधी काही ,,,दिवस वडापाव आणि मिरची मात्र असायची.
बाहेरच्या या खाण्याने आणि वडापाव च्या तेलाने माझा घसा खराब झाला होता आणि खोकला लागला होता.
हे संजू भाऊ ला माहित झाले मेस साठी पैसे नाही म्हणून मी बाहेर वडापाव वैगेरे खातो. तेव्हा ते मला मामींच्या मेस वर घेऊन गेले.
        मामीची मेस म्हणजे अभिनव ची हक्काची खानावळ च.
मी गेल्यावर बघतो तर ,,,त्या मेस ला अभिनव चीच जास्तीत जास्त पोर … काही पोरी होत्या त्या हि अभिनव मधीलच वास्तुकला विभागाच्या.
आणि या मेस चा इतिहास हि तसाच ,,,बाळू देवरुखे ,अरविंद कोळपकर,सतीस काळे,संजय भालेराव,बाळासाहेब अभंग,अनिल फलके ,,,आणि बरेच्या नावाजलेले चित्रकार त्या मेस चे सदस्य.
मी जायचो त्यावेळी खास काम करणारी पोर होती ,,जेवायला गेलो कि मस्त गप्पा टप्पा व्हायच्या. चित्रकले वर वादविवाद व्हायचे. त्यावेळी या मेसला संजय खोचरे,संजय टिक्कल ,हवाले,संदेश खुळे,सोमनाथ,भूषण वनकुद्रे,असे बरेच होते.आणि हो या मेस मधील किमान एक तरी राज्यातून मेरीट असायचा बर.
मेस मध्ये बाळू देवरुखे ने केलेले एक सुंदर तैल रंगातील चित्र होते .

मामीच तस छोट कुटुंब ,,,,मामी त्यांची २ मुल आणि मामा.
मामी चा स्वभाव अतिशय शांत होता ,,,चेहऱ्यावर कधीही ताण दिसला नाही. आम्हा सर्व मुलांना लेकरा परी जपायच्या. आमच्या साठी कधी शक्य तोवर मेस बंद नाही ठेवली.कुठला हि सण असेल तर घरी जे पदार्थ करतात तेच करून आम्हाला खाऊ घालायच्या. पुरण पोळी,भजे वडे,खीर हे सर्व असे ,,,जसा सण तसे पदार्थ.
मोठे उपवास हि सर्वाना बंधनकारक  होते,,, फराळाची रेलचेल असे मात्र.
जेवायला गेलो नाही तर खूप रागवायच्या.
मेल्या,मुडद्या काल कुठे गेला होता, असा शब्द प्रयोग असायचा ,,,घरच्या सारखा.
मामा फार गप्पा करणारे होते ,,,मेस वरील सर्व मुलांना ते बोलत असत ,,,,मुलगा कुठल्याही भागातील असला तरी त्याच्या भागात मामा जाऊन आलेले असायचे ,,,तिकडचे कुणी ना कुणी त्यांच्या परिचयाचे असायचे. खडकवासला धरण फुटले तो किस्सा ते बर्याच वेळा सांगायचे त्यांच्या गप्पा तून मस्त वेळ जायचा मेस ला आल्यावर. ते वधु-वर सूचक केंद्र चालवायचे.
मी तर पुणे सोडे पर्यंत मामीच्या मेस ला जेवलो.
अभिनव सोडून मी जे जे ला गेलो,,मुंबई त गेल्याने पैश्याची थोडी अडचण जास्त च येत होती ,,,मामी चे पैसे हि देणे होते मला.
जे जे चे कॉलेज आणि येथील दिवस फार कठीण होते ,,,जेवणाचे तर फार च वाईट हाल होते ,,,जास्त पैसे देऊन हि मामीच्या जेवणाची सर कधीच आली नाही त्या जेवणाला. दिवसामागून दिवस संपत चालले होते आणि जेवायला गेलो की मामीच्या पैश्याची आठवण यायची,,,मी एकदोन वेळा पुण्यात आलो जे जे ला असताना ,,,पण पैसे नसल्याने मी मामी कडे गेलो नाही.
 मी मेस ला असताना मामी बऱ्याच वेळा सांगायच्या कि अरे माझे जेवणाचे पैसे अनेकांनी डूबविले,, त्या म्हणायच्या कि काही ची तर चित्र खूप महाग महाग जातात म्हणे,,,पण तरीही माझे पैसे मात्र देत नाहीत.
मला या मामीनी सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या ,,,कधीकधी वाटायचे आपण ही यातलेच निघालो काय ? अस मामी आपल्या समजत असाव्या .
मन बेचैन व्हायचे,,,पण मी वाट पाहायचो कि आपल्याकडे कधी पुरेशे पैसे येईल अन मी मामी चे पैसे नेउन देईल.यात जवळ पास १ वर्षा पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल ,,,कदाचित मामी नि माझ्याकडील पैसे बुडाले अस समजले हि असेल. बऱ्याच वेळा मला शिव्या दिल्या असेल.

परीक्षेचा काळ जवळ येत होता ,,शाळा वरील पाठ संपले होते. इतरांचे कॉलेज वरील पाठही संपले होते …….  म्हणून की काय मला चौधरी सरांनी जे जे च्या ए. टी.डी च्या वर्गावर पाठ घायला सांगितले.
माझे २ पाठ संपले होते आणि ३ रा पाठ चालू होता ,,,,,आमचे जे जे चे वातावरण थोडे तापले होते ,,त्यातच मुलांनी आंदोलन उभ केल ,,,त्यात आम्ही सर्व भरडून निघालो, मुलाच्याच म्हणण्याने परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. आम्ही बाहेर गावच्या मुलाचे मात्र त्यात नुकसान झाले ,,,,आर्थिक आणि मानसिक. आणि शैक्षणिक ही.
जेजे ला असताना तसा माझा भर चित्रावर होताच ,,,मी काही जलरंगातील चित्र केली होती ,,त्यातील २ चित्र विदेशी नागरिकाने घेतली ,,,त्यातून बर्यापैकी पैसे मिळाले होते.
मी थेट पुणे गाठले ,,,,मिळालेल्या पैश्यातून ३००० रुपये मामी च्या हाती ठेवले. मामी च्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळले ,,,ते बघून खूप समाधान लाभले मला.मामी ला माझ्या कडील बाकी दिली दोनशे काही रुपये बाकी होते ,,,पण मी मामीला सांगितले हे मी देणार नाही हे असू द्या माझेकडेच,,,त्या निमिताने मला परत भेटता तरी येईल तुम्हाला.
या माउली ला विसरणे थोडे अवघडच आहे. सोमा च्या लग्नात परत भेट झाली होती.
सोमाच्या लग्नातील भेटी नंतर भेट झाली नाही ,,,,धन्य ती माउली.
तिच्या प्रेमाची अन मायेची शिदोरी आम्हाला मिळाली.

सुनिल बांबल १२/११/२०१५  चिखली

Saturday, November 7, 2015

आनंद घ्यायचाय ना,,,मग चित्र काढा.

         
         अभिनव कला महाविद्यालयात जी डी आर्ट करत असताना,,, आम्ही ६० ते ६२ मुल मुली एकाच वर्गात चित्रकलेची एकेक पायरी चढलो. डिप्लोमा ची पायरी तशी सोबत राहण्याची शेवटचीच म्हंटले तरी चालेल,,,कारण त्यानंतर ज्याचे त्याचे वेगवेगळे रस्ते झाले.
काहींनी अभिनव ला डीप ए एड केल,,,,,तर काहींनी इतर कॉलेज
मी आणि नगरकर ने जे जे गाठले.
काहींनी एस एन डी टी महिला कॉलेज ला मास्टर केल,,,
बऱ्याच मुला मुलीचे शिक्षण संपले ,,,
एखाद दुसरा शिकायला विदेशात गेला.
या दरम्यान काही चे लग्न झाले ,,,
काहीची पाऊले कमाई साठी मार्ग शोधत शोधत ,,,चित्रकले पासून थोड्या फार प्रमाणात दूर झाले .
कॉम्प्युटर च्या जगात हरविले ,,
त्यातील काही कला अंश असलेली तर काही नसलेली.
काही चित्राच्या पैशात जगण्याचा प्रयत्न करत आहे,,,काही चित्रकलेतून शिक्षक माध्यमात तर काही खाजगी शिकवणीच्या आधार ,,,फोटोग्राफी तून,,,,तर व्यावसायिक चित्रकार म्हणून.

पैसा कमविण्याची माध्यम च सारी.
काहींना भरपूर पैसा मिळाला,,,
काहींना गाडी,घर, पाहिजे तशी बायको सर्व काही मिळाले ,,,काहींना तडजोड करावी लागली ,,,ज्याचे चित्र काढण बंद झाले त्यांनी किमान चित्रकले तून शिकले म्हणून किमान महिना भरातून एक चित्र तरी काढण्या साठी वेळ काढावा.चित्रात रमायला वेळ लागेल पण…… पण रमाच.
ज्यांनी चित्रकलेत ५ वर्ष घालवली त्यांनी किमान ५ चित्र करून घरात लावायला हरकत नाही .
विकली च पाहिजे हा अट्टाहास थोडीच आहे,,,थोडा आनंद तर देईल ती ,,काही काळ का होईना.
मान्य आहे सर्व चित्रकार नाही होऊ शकत,,त्या साठी खूप सय्यम हवा.
चित्र काढून आनंद तर निश्चित मिळेल ना,,,
प्रत्येकाचा चित्रातील विचार पाहणाऱ्याला कळत वा पटत थोडी असतो ,,,पण पाहणाऱ्या रसिकांच्या गर्दीत आपल्या चित्रात हरवणारा एखादा तरी असतोच ना.
तर मग आनंद घ्यायचाय ना,,,,,

ओवी @ ओवी



माझ लग्न झाले ,,दिपाली सारखी जिवलग साथीदार आयुष्यात लाभली.
दिवस,महिने हळू हळू जात होते ,,आम्ही या काळात वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या,,,हे ठिकाण कधी पर्यटनाची असत तर कधी नातेवाईकांची.
आनंदच आणि उत्साहाचे वातावरण होत काही काळ लोटला मग,,, मुल पाहिजे अस वाटायला लागला.
वानेरे हॉस्पिटल ला गेलो. औषध सुरु झाली ,,,,पण त्या औषध चा त्रास दिपाली ला झाल्याने आम्ही ती बंद केली. मग २-३ महिन्याचा काळ गेला.सकारात्मक रिपोर्ट आल्याने चिखली तील डॉक्टर करवंदे यांचे कडे गेलो,,, सोनोग्राफी केली. मात्र रिपोर्ट एकूण धक्का बसला. बाळ जन्म देण्या योग्य नव्हत.
आम्हाला खूप धक्का बसला.
दिपाली च्या अश्रुकडे पाहत … मी कस बस स्वत: सावरले.
मन मात्र सावरू शकलो नाही.
डॉक्टर काकांनी धीर देत सांगितले ,,,काळजी नका करू.
तुमचे काय वय थोडी झाले ,,,२ महिन्यात तर तुम्हाला गोड बातमी कळू शकते.
५ महिने चा काळ लोटला अन परत एकदा गोड गुड न्यूज मिळाली.
महिन्यामागून महिने जात होते,,,माझ्या बाळाच्या आई ची काळजी ,,,,तिची आई अन माझी आई घेत होती,,आणि मी होतोच.असे दिवस महिने जात होते .

१ दिवस तोरवणे सरांचा फोन आला. तोरवणे सर आणि फासे सर यांनी मला ,,,त्या परिस्थितीत मला विनानुदानित महाविद्यालयावर अधिव्याख्याता म्हणून येण्याचे सांगितले. महिना ४००० मानधन हि देणार होते,,,आणि अनुदान आल्यावर मी कायम होईल असे आश्वासन हि मिळाले होते.
एका मनाची इच्छा नसतानाही,,,दुसऱ्या मनाचे ऐकूण मी गेलो खरा.
पण माझ मन तेथे रमत नव्हते. रात्री झोप यायची नाही,,दिवसभर मी चित्रमय वातावरणात असल्याने बर वाटायचा. पण शनिवार जवळ  आला कि मी activa घेऊन घराच्या दिशेने निघायचो,,,जाणेयेणे ५०० रुपये खर्च करून २ दिवस घरी आल की मन रमायचे. मिळणारे मानधन पुरेसे नव्हते,,वरून साडेतीन चार हजार माझे व्ययक्तिक खर्च व्हायचे. मन मारून कसे बसे २ महिने तेथे अधिव्याख्याता म्हणून राहिलो.
मी औरंगाबाद ला निघालो की माझी बायको नेहमी मन बारीक करायची तिचा चेहरा रडायला आल्यासारखा भरायचा.मला ही निघाव असे वाटेना . तेव्हा ते दोन महिने फार खडतर होते माझ्या कुटुंबासाठी.

पाटील सर निवृत्त होणार होते त्या जागेवर माझा विचार होईल का असं मी एकदा सहज विचारले होतं तेव्हा कळले तेथे दुसऱ्यास भरणार आहे . माझ्या मनाच्या विरुद्ध मी तेथे राहत होतो शेवटी न राहवून मी एक दिवस तोरवणे सरांना म्हणालो दुसरे अधिव्याख्याता बघा.मी येथे नाही थांबू शकत. 
 
तेव्हा तोरवणे सरांना माझ्यामुळे त्रास झाला असेल बहुदा,,,त्याबद्दल मला माफ करावे. सर तुमचा हेतू चांगला होता. मात्र माझ्या परिस्थितीला ते मान्य नव्हते ,,हेच खरे. माझ वय विनानुदानित वर वेळ घालविन्यास योग्य नव्हते. जी डी आर्ट ला अजून ही अनुदानित मान्यता आली की नाही माहीत नाही. 
शरयू जाधव ने बालगंधर्व ला  समूह प्रदर्शन आयोजित केल होत,,,त्या साठी मी पुणे ला गेलो.  प्रदर्शन झाले.पुुणे वरून परतल्यानंतर वासुदेव कामत यांचा डेमो यशवंत ला असल्याने मी थांबलो. यशवंत चा दोन महिने काही दिवस चा अनुभव घेतला. या वेळी मला ना कॉलेज ने ऑर्डर दिली नव्हती. 

परतत असताना मन गहिवरून आल ,,,,,काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मला निरोप द्यायला आले होते.

पालातील राहणारे जसे एक जागा सोडताना जसा घरातील पसारा आपल्या बैलगाडी वा गाढवावर बांधतात जणू काही तसेच सर्व समान मी activa वर लादून निघालो होतो.
मी सर्वांचा निरोप घेतला. आणि माझा अधिव्याख्याता म्हणून सुरू झालेला प्रवास दोन महिने सात दिवसात संपला. मी ५ फेब्रुवारी ला घरी परतलो.
          ६ फेब्रुवारी डॉक्टर ने दिलेली तारीख उलटली,,,,दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी २०१५ ला ७ वाजून ४२ मिनिटांनी ,,,ओवीचा जन्म झाला . माझा आनंद गगनात मावेनासा होता.whats app ने ती मला प्रथम दिसली ,,,पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी रात्र आडवी आली होती,,,मी रात्रीच येऊ नये सांगितल्याने. दुसऱ्या दिवशी मी बुलडाणा येथे गेलो ,,,,आणि ओवी ला ओंजळीत घेऊन सुखावलो.
तिने जीवनच पालटून टाकले.
ती ओवी आज ९ महिने पूर्ण झाली,,,,,तिचा हा १८ महिन्याचा काळ आमच्या साठी.
न विसरण्या सारखाच .
सुनिल बांबल ७/११/२०१५