http://sunilbambal.blogspot.in/

Tuesday, August 25, 2015

तुमच्या आतील कला बाहेर येऊ द्या .




कॉलेज पूर्ण झाले कि चित्रकार म्हणून जगायला सुरवात करताना,,चित्र केले कि बरेच जन ते चित्र मोठ्या कलाकारांना अथवा त्यांच्या शिक्षकांना दाखवतात. … पण मला वाटते तसे करू नये ,,,
आपल्याला जस जमते ते करत राहावे.या प्रमाणे आपण मार्गस्त झालो तर आपल्याला लवकर काही तरी सापडू शकते ,,,आणि कलाकार आणि शिक्षकाचे शिक्षण झाल्यावर मार्गदर्शन घेतले तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपणास सांगतील…तेव्हा आपल्यातील कलाकार बाहेर यायचा राहून जाऊ शकते.शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे ते कॉलेज ला असताना.
आणि आणखी एक ,,,आपले चित्र पूर्ण झाल्यावर व तुम्ही कुठे प्रदर्शित केल्यावर कुणाच्याही प्रतिक्रिया चा अति विचार करू नये… एखादा सल्ला ,सूचना हि स्वत:ला योग्य वाटल्यास पुढच्या चित्रात अमलात आणण्यास हरकत नाही.
तुमच्या चित्रावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया चा परिमाण होऊ देऊ नये ,,याची दक्षता घ्यायला हवी.
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ,,चित्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन हि वेगळा असतो,,,त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मत मांडत असतो.
तुम्हाला काय आवडते अन काय करायचे यावर ठाम राहा.
आणि बिनधास्त काम करा.
सातत्याने काम करत राहाल तर तुमच्या कामाला कुणी तरी जीव लावेलच.
त्यासाठी सातत्याने काम करत राहा जसे जमते तसे. हे माझे व्ययक्तिक मत आहे.

Friday, August 7, 2015

सृजनाच्या वाटेवर 02/07/2015


सृजनात्मक चित्राची मज्जा च न्यारी .
मी कॉलेज ला असताना पासूनच मला थोड वेगळे करावे वाटायचं.  सुरवातीला मी निसर्गचित्र करायचो,,व्यक्ती चित्र हि आवडायचं. पण व्यावसायिक चित्रकार म्हणून जगताना व्यक्तीचित्राला विकत घेणारे थोडे कमीच. आणि मी व्यक्ती चित्रणात खूप मास्टर काम करेल असेही वाटत नव्हतं. तसेच मुळातच माझा कल सृजनात्मक चित्रा कडे होता.
२००५ ला मुंबई ला गेलो असता तेथे प्रशांत शाह भेटले होते,त्यांना मी निसर्ग चित्र दाखवली आणि माझी चित्र ते विकून देतील अश्या विश्वासाने त्यांना दाखवत होतो पण त्यांनी मला खूप छान सांगितले निसर्गचित्र म्हणजे तुझ चित्र नव्हे ,,,हा तर तुझा रियाज झाला,हा तुझा आउट डोअर स्टडी चा भाग. मला त्यावेळी वाटले . या माणसाने आपले चित्र विकण्यासाठी तर ठेवले नाही पण आपल्या ला काहीही सांगून हुसकून लावले बहुतेक ,,,काय सांगू त्यावेळी मला त्यांचा रागच आला होता.मग हळूहळू मी निसर्गचित्र काढत होतो. saffronart हून माझे बरेच चित्र विकलेही गेले ,,,पण राहून राहून अस वाटायचे कि आपल्या जे करायचे ते हे नाही .
तरीही मी,,cityscape,seascape,night landscape,करत होतो,, हे चालू असतांना एक वेगळा प्रयोग म्हणून जत्रेतील पाळणे असतात ते चित्रात केवळ आकार वापरून आणि रंगाच्या फटकाऱ्या तून आणि त्यासोबत काही घराचे आकार वापरून चित्र काढत होतो पण ते सर्वापासून अनभिज्ञ होते. काही छोटे छोटे कॅनवास वर स्केच हि केले होते त्यातील ३ स्केच indianartcollectors वर टाकले असता त्यातील १ विकले. आणि माझा हुरूप वाढला मी त्यात अजून काम करायला सुरवात केली.२०१० ला नेहरू सेंटर च्या प्रदर्शन मध्ये रचना टाक यांनी माझे तीन चित्र घेतली २ night landscape आणि १ चित्र जे सृजनाच्या वाटेवर होते ते.
मला प्रदर्शक मध्ये प्रदर्शन करायचे होते तेव्हा तेथे प्रत्यक्ष काम दाखवावे लागत, मी गेलो…. काम बघून त्यांनी शो साठी date दिली. हिरा मडम म्हणाल्या ,,लांब panal मे पेंटिंग है क्या…त्यावेळी मी माझे creative च्या वाटेवरील चित्र दाखविले असता सुनिल ये तेरा बेेेटर काम है ,landscape से अच्छा ,,,ये तुझे नयी पहचान देगा । landscape तो बहुत artist करते है,सब के काम मे ज्यादा फरक नही लगता। लेकिन तेरा ये नया काम तुझे नयी पहचान जरूर दे सकता है ।
हा सल्ला माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरला पुढे मी portrait of village या सिरीज च्या चित्राचे प्रदर्शन केले ,,,त्यातील एक Couple Village नावाचे चित्र विकले गेले.
मी Portrait of villege , Karna , Banyan Tree, VillageTree ,Concreat Tree ,Concreat village , Motherland series, God of Village, Indian Fair, Wedding Series आणि सध्या Mother & Child यावर काम करत आहे.
या सर्व छोट्या छोट्या चित्र मालिका आहेत ,,,,मला जे चित्र सुचल ते मी करत असतो . या series वर आज हि माझ काम चालूच आहे.
या series करताना अनेक चित्र देश्याविदेशात पोचले. काही प्रदर्शनातून काही net च्या माध्यमातून.
 
Redears Digest सारख्या जागतिक दर्जाच्या पुस्तकाने मे २०१२ च्या अंकात प्रकाशित केले सोबत छान मानधन हि दिले.
तीन चित्रचा गाला म्युजियम मध्ये लिलाव झाला. सृजनाच्या वाटेवर चालताना मी मात्र bombay art socitye , art socitye of india, camlin art foundation, या सारख्या महाराष्ट्रातील फेमस चित्र प्रदर्शनी पासून दूर आहे. मात्र मी दर वर्षी किमान एक तरी व्ययक्तिक प्रदर्शन करतो.
जहांगीर ला मी सतत अर्ज भरले आहे आणि आता पर्यंत तीन वेळा माझा अर्ज नाकारला गेला. जहांगीर मध्ये शो करन हे कलाकारासाठी अभिमानाची बाब आहे. मी सातत्याने काम करतोय ,,,येईल कधीतरी जहांगीर चा होकार ?
जहांगीर ला शो केला म्हणजे तुमची सर्व चित्र विकली जातात अस नाही ,,,पण व्हावा आपला हि शो या जहांगीर मध्ये असे प्रत्येकाला वाटते त्यातील च एक मी हि आहे

साखळडोह 2

दगडाचे देव या लेखमालेत मी साखळडोह विषयी लिहिले होते ,,,,त्याच साखळडोह ला आज जाऊन आलो. 

हा डोह जाफराबाद तालुक्यातील मेरखेड गावाजवळ आहे येथे वर्षभरात हजारो भाविक येतात पण अजून हि पाहिजे तसा रस्ता नाही,,जाफराबाद रोड पासून ४ किलोमीटर अंतर त्या रस्त्यावर नुसती मोठ मोठी खडी टाकलेली आहे. त्यालाही बरेच वर्ष झाली असावी. त्यावर डांबरीकरण तर नाहीच नाही पण पावसाळ्यात पाऊस असेल तर फजितीच होईल.शेवटी शेवटी थोड्या अंतरा पर्यंत गाव जवळ आल्यावर थोडा बरा रस्ता आहे आणि चिखली-जाफराबाद रस्त्याने चिखली हून निघाले कि मराठवाड्याची बोर्डर संपलीकि चांगला रस्ता हि संपतो आणि मराठवाडा सुरु झालेले कळते ,,,वर्षनुवर्षे हा रस्ता खराब अवस्थेत आहे. का कुणास ठाऊक पण तो रस्ता फार दुर्लक्षित आहे,,,आमदार हि त्या कडे पाहिजे असे लक्ष देतात अस वाटत नाही,,,,काही असो किमान जाफराबाद रोड पासून साखळ डोह पर्यंत चा रस्ता डांबरीकरण करायला हवा.
असो
मी, ओवी आणि बायको तेथे गेलो. बायकोने भक्तिभावाने पूजा केली.
ओवी ला हि दर्शन घडविले.
मी त्यांचे फोटो काढले ,,,मी हि दर्शन घेतले.
ओवी चे जावळ वाहायचे होते ते वाहिले. ते कोठे ठेवायचे विचारले असता तेथील आजी ने डोहात टाका अस सांगितले,,,डोहाच्या पाण्याकडे बघितले ,,पाणी खूप घाण झाले आहे ,,,हिरवट रंग आला आहे त्या पाण्याला. त्याच क्षणी मनात विचार आला आपण डोहाच्या पाण्यात टाकून पाणी खराब करतोय,,,पण दुसरे मन तेथील परंपरेला आणि बायको च्या श्रद्धेला छेद देण्यास तयार नाही झाले. पाण्यातच ते जावळ वाहिले. पाऊस नसल्याने ते पाणी साचून आहे.

तेथे एक फलक आहे डोहात पोहण्यास सक्त मनाई आहे ,,,,मात्र काही म्हशी त्या डोहात मनसोक्त पोहत होत्या. त्या म्हशीचा मालकच त्यांना डोहावर घेऊन आला होता. असो पण तो फलक माणसांसाठी होता ना… त्या बिचाऱ्या म्हशीचा त्यात काय दोष. एका ने तर अख्खी बैलगाडीच डोहात टाकली होती अन सोबत अनेक बैल.
तेथे एक कुटुंब भेटले होते ते म्हणाले मुलीला मोठ्या मोठ्या गाठी झाल्या होत्या. दवाखान्यात नेत तरी फरक नाही पडला … अन आसरा ला पाया पडायला येऊ म्हंटले अन फरक पडला. म्हणून लेकराला पाया पडायला घेऊन आलो.यावर काय बोलाव काहीच सुचले नाही,,मला
जाण्याची वेळ आली होती ,,,परत जाता जाता पुन्हा एकदा हात जोडले.
चटणी पोळी चा डब्बा सोबत नेला होता ,,,तो संपविला. त्यातील १ पोळी तेथेल एका मोती ने संपविली.
थोडा वेळ बसून राहिलो,,,,,,अन नंतर परतीच्या मार्गाला लागलो.
सुनिल बांबल

साखळडोह आसरा १४/०६/२०१५


मी काही दिवसापूर्वी एक लेख टाकला होता,,,,
मी दगडाचे देव बनताना पाहीले आहे.
माणूस श्रद्धे पोटी दगडाला देव मानतो,,,कुणी भीती पोटी हि देव मानतो.देवाला हे करा ते करा ,,,,अस नाही केल तर देव कोपल,,,लेकराला धरल,,असे कितीतरी कारण असतात,,,,,नाही तर देवाप्रती पूर्ण श्रद्धा असते.
श्रद्धा अन अंधश्रद्धा यातूनच देव मनात घर करतो नाही का ?
प्रत्येकाचे वेगवेगळे देव त्यात
कुलदैवत वेगळे ,,,,ग्रामदैवत वेगळे ,,,देवी,गणपती,मारोती,म्हसोबा असे कितीतरी देव.
जागृत,दक्षिणमुखी, गणपती असेल तर डाव्या-उजव्या सोंडेचा असे आहेच.
आणि हो मी रिद्धी सिद्धी सह गणपतीला स्मशानात ही बगीतले आहे.
अजून एक देवाविषयी सांगावस वाटत ते म्हणजे ,,,,,,आसरा.
माझी आई नेहमी सांगायची कि साखळडोह ला आपल्या आसरा आहे ,,,मला ही लहानपणी तेथे पाया पडायला गेलो होतो ते आठवते.
त्यांनंतर खूप वर्ष आसरा च्या पाया पडायला जायचा योग आला नव्हता ,,,मात्र लग्न झाले आणि आसरा ला जायचा योग आला.आई ने सांगितले कि तुम्ही दोघे जाऊन एकदा पाया पडून या.
मी activa घेतली होतीच ,,,मग काय ठीक आहे येऊ जाऊन असे ठरले. त्या अगोदर असेच आमचे ग्रामदैवत असलेली ,,नागरतास ची देवी आणि आणि तिचीच काकू च्या शेतात असलेली स्थापना या ठिकाणी भेटी देऊन झालेल्या होत्याच.
चिखली पासून अंदाजे २५ ते ३० किलोमीटर अंतर असावे. चिखली जाफराबाद रोड वर खासगाव फाट्यावरून ४ किलोमीटर आत हे आमचे आसरा.
मेरखेड गावाच्या हद्दीत असलेले हे आसरा चे ठिकाण.
मेरखेड जवळून वाहणाऱ्या नदीमध्ये मोठा डोह आहे .या डोह च्या खोली विषयी सांगतात,,,,,
१२ बाजीचे सुम जरी आत सोडले तरी याचा ठाक लागत नाही.
आम्ही गेलो त्या वर्षी जास्त पाऊस न पडल्याने डोहामध्ये जास्त पाणी नव्हते ,,,आणि ते हि गढूळ पाणी होत. आजूबाजूने खूप साऱ्या आसरा होत्या.
या आसराना खूप लांबून लांबून लोक येतात ,,,नवस बोलतात.
आणि तो नवस खरा हि होतो.
अनेक लोक येथे मुलांचे जावळ काढण्यासाठी येतात. कुणाचा साधा नैवेद्य असतो तर कुणाचा बोकड्याचा.
मी नवस बोललेल्या स्त्रियांना भर उन्हात बिन चपला चे दंडवत घालत येताना बघितले.
सुरवातीला काही आसरा होत्या… प्रत्येकाने शेंदूर लाऊ लाऊ खूप साऱ्या आसरा केल्या आहेत.
आता त्यातील जागृत कोणत्या ते मात्र त्या आसरा नाच माहित. असो
तेथे छान छोटी छोटी दुकाने आहे ,,,पालातील.
नास्ता साठी ची हि सोय आहे ,,,पाण्याची व्यवस्था आहे ,,,तिनसेड हि केली आहे,,,
आम्ही तेथे पोचल्यावर तेथे नारळ घेतला. बाकी पूजेचे समान बायको ने आणले होतेच. बायको ने खूप भक्ती भावाने पूजा केली.
माझी बायको खूप श्रद्धाळू आहे.स्वामीसमर्थ ची ती पक्की भक्त आहे.
ती आसरा ची भक्ती भावाने पूजा करताना बघून मी हि हात जोडले. नारळ फोडला,,,, ,,,काही लोकांना त्या नारळाचा प्रसाद वाटला.
आणि परतीच्या मार्गाला लागलो.


महाबीज चा म्हसोबा १५/०६/२०१५


        आईला महाबीज मध्ये ४ रुपये रोज होता तेव्हा पासून ते निवृत्त होई पर्यंत कामाला होती. पण शेवट पर्यंत महाबीज प्रशासन ने कायम करून घेतले नाही ,,,आई ला हंगामी रोजदार म्हणूनच शेवट पर्यंत काम करत राहावे लागले.आणि निवृत्त झाल्यावर दर महा. १००० रु पेन्शन मिळते.
आई कामाला असताना आई चा जेवणाचा डब्बा घेऊन जात असे मी. मग गेले की आत आवारात कडूलिंबाच्या झाडा खाली म्हसोबा होता,,,भल्या मोठ्या दगडाला शेंदूर लावलेला आणि त्यावर चांदीचे डोळे बसविलेले होते. या म्हसोबा विषयी एक गोष्ट मी नेहमी एकली होती ती म्हणजे ,,,,महाबीज मधील म्हसोबा खूप जागृत आहे.
मी नेहमी आत गेलो की म्हसोबाच्या पाया पडायला जायचो. मग काय म्हसोबा जवळ गेलो कि मज्जा असायची. कुणी नारळ तर कुणी पेडा ठेवलेला असायचा. मग मस्त नारळ अन पेडा खायचा आणि आपला घरचा रस्ता धरायचं,,,,देवाच्या दर्शनापेक्षा माझ लक्ष त्या नारळ अन पेडयावर जास्त असायचं. नारळ तर कायमच असायचं,,,पेडा मात्र कदाचित च सापडायचा .
पेडा सापडला की मग आनंदी आनंद.
महाबीज ला चे मुख्य अभियंता जे असत…. त्यांना सर्व कामगार आणि आम्ही ही मोठे साहेब म्हणत असे..
त्यावेळी जे मोठे साहेब होते त्यांना महाबीज च्या गोडाऊन मध्ये आणखी एक गोडाऊन बांधायचं ठरविले होते. आणि त्या गोडाऊन च्या जागेच्या काही भागात हा म्हसोबा आलेला,,,,मग त्या म्हसोबाला तेथून हटवून दुसऱ्या ठिकाणी बसवायचे ठरले .सुरवातीला मनुष्य बळ वापरून त्याला हलवायचा प्रयत्न केला पण जमेना.
मग तो म्हसोबाच आकार लहान करायचं ठरले पण तो वडर माणसाकडून हि पाहिजे तसा कमी झाला नाही,,,आणि नंतर लोकांनी एक अफवा हि पसरविली. म्हणे ज्याने त्या म्हसोबाला फोडला त्याला म्हसोबा कोपला ,,,असच एकदा त्याचे चांदीचे डोळे चोरले होते तेव्हा ही त्या माणसाचे डोळे गेले म्हणे,,तो आंधळा झाला. खरंच झाला असल का ?
शेवटी म्हसोबाला लहान करूनही हटवू शकले नाही .मग ट्रक्टर चा हि वापर झाला ,,,पण काही उपयोग नाही झाला. म्हसोबा जागृत जो होता ना…
अश्या वेळी काय म्हणव सुचत नाही पण तो भला मोठा म्हसोबा न मनुष्य बळाने हलला न ट्रक्टर ने.
मग निर्णय घेण्यात आला कि म्हसोबाला गोडावून मध्ये छोटीसी जागा सोडून त्याला दक्षिणेला प्रवेशद्वार ठेवून मंदिर करायचं ठरले.
आज ही महाबीज मध्ये तो म्हसोबा आहे.
आई २०११ ला निवृत्त झाली.भाऊ आहे तेथे हंगामी रोजदार.
माझ लग्न झाल्यावर परत या म्हसोबाच्या दर्शनाला जायचं ठरले. बायको, मी अन भावाचा मुलगा.
दर्शन घेतल्यावर आम्ही महाबीज चा आतील प्लांट बघायला गेलो,,,, मी लहानपणी पासून पाहत आलेला प्लांट मी बायको ला दाखवत होतो. कशी बियाण्यावर प्रक्रिया केली जाते ते सांगत होतो. तेथे कामात असलेल्या आईच्या मैत्रिणी विचार पूस करत होत्या. आमच कौतुक करताना कासाबाई ला जीव लावा बर हे हि आवर्जून सांगत होत्या.
चिखली येथील महाबीज बियाण्यावर प्रक्रिया करणारे आशिया खंडातील सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचे प्रक्रिया केंद्र आहे .महाबीज मुळेच आमच शिक्षण झाले .नाहीतर आई ला खूप कठीण झाले असते . जी डी आर्ट ला ७०%मिळाले होते तेव्हा आई कामगार असल्याने मी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण च्या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलो होतो. १८०० रु शिष्यवृत्ती मिळाली होती.
मी दगडाचे देव बनताना पहिले आहे या लेख मालिकेतील हा लेख मधील म्हसोबा चे रहस्य नाही कळले,,,महाबीज प्रशासन ने मनुष्य आणि यंत्र अश्या दोन्ही बळाचा वापर करूनही म्हसोबा ला हटवू शकले नाही.
मी कधीही महाबीज ला गेलो कि म्हसोबा च्या पाया पडायला जातो,,,,आणि देवापुढील नारळ उचलून खातो.
माझी नजर मात्र देवापुढे कुठे पेडा दिसतो का ,,,हेच शोधत असते.

मी दगडाचे देव बनताना पहिले आहे. २४/०५/२०१५


मी बाहेर गावी शिकायला होतो ते जवळपास ८ वर्ष . या आठ वर्षात बर्याच वेळां घरी येणेजाणे होत असे. मग बस चा कंटाळवाणा प्रवास सुरु होत असे पुणे ते चिखली,,,पण काय करणार तो प्रवास कंटाळवाणा असला तरी फायद्याचा होता.
एस टी बसची विद्यार्थी सवलत मिळायची ,, त्या सवलतीचा मी पुरेपूर वापर करायचो.
मग प्रवास सुरु झाला रस्त्याच्या कडेला एक दगडाचे चौथरे बांधलेेलेे दिसले ,,ते नवीनच होत . त्यावर एक दगड मांडून त्याला शेंदूर फासला होता. आणि त्या ठिकाणी नारळ फोडलेली दिसत होती. त्या दगडी देवासमोर फुल आणि अगरबत्ती हि दरवळत होत्या. बस मधून असे अनेक गोष्टी आपणास दिसतात पण आपण त्यावर तेव्हड्या पुरतेच लक्ष्य देतो,,,अन नंतर पुढील प्रवासात तीच गोष्ट तुम्हाला नव्याने दिसली तर आपण मनाशीच म्हणतो अरे यार मी हे पूर्वी पहिल्या सारखा वाटते.
मी जेव्हा परत गावाकडे जात असताना लक्ष्यात ठेऊन त्या ठिकाणाची वाट पाहत होते तर तेथे आता त्या देवाला तीनपत्र्याचे छपर मिळाले होते. बघता-बघता तो देव प्रसन्ना व्हायला लागला,,,आणि नंतर जागृत ही झाला असेल. त्याला चांदीचे डोळे बसविले कि नाही ते काही बस मधून दिसत नव्हते आता,, शेड मुळे .
हे मंदिर मी आजही जाता येता बघतो. आता त्या देवाचा त्रास रस्ता रुंदीकरणाच्या वेळी होत आहे. असो
अजून एक देव अन तो ही माझ्या घराच्या दरवाज्यातून दिसतो ,,,,एका टेकडीवर
हा देव अन पत्र्याचे शेड रात्रीत उभे राहिले. दोन जमिनीच्या कोपर्यावर… आता हा देव का या ठिकाणी स्थापला ते सांगायची गरजच नाही,,,आता हळूहळू तो हि जागृत होईल .
माणूस स्वार्था साठी देवाचा जास्तीत जास्त वापर करतो,,,नाही का.
दगडा ला देव पण आणण्यात आपल्या मनातील श्रद्धा च कारणीभूत आहे. मग या श्रद्धे पाई दानधर्म सुरु होतो. आणि त्या दानाचे मालक होतात त्या मंदिराचे ,,,देवाचे विश्वस्त.
खरच तुम्ही त्याच्या पेटीत टाकलेल्या पैश्याची त्या देवाला गरज आहे का ?
श्रद्धा आणि देव याचं खूप घट्ट नात आहे,,,आणि याचाच फायदा देवस्थानांना होतोय.
मी देवाला दान द्यायचे टाळतो,,,पण कधी कधी आई आणि बायको पुढे नतमस्तक व्होऊन दान करावे लागते. कारण त्यांच्यावर माझी जास्त श्रद्धा आहे.
पण मी हि श्रद्धे पोटी या दगडाला देव मानतोच.
माझी आई ज्या महाबीज च्या महामंडळात काम करत असे तेथे म्हसोबा आहे,,,अन म्हणतात तो ही जागृत. त्या विषयी नंतर सांगतो .

प्रात्याक्षिके (demo)


प्रात्याक्षिक (demo) या शब्दाला चित्रकलेत खूप महत्व आहे. मोठ मोठे कलाकार या साठी मोठ मानधन हि घेतात. ते योग्य च आहे ,,,कारण तो कलाकार त्याच्या इतर नियोजन बाजूला सारून आलेला असतो. आणि आजचे प्रात्यक्षिक संस्थे साठी उद्या मानाचे ठरणारे असू शकते.
प्रत्येक कलावंत त्याच्या परीने टप्याटप्या ने प्रगती करत असतो.प्रात्यक्षिकासाठी मला छोट्या मोठ्या संधी मिळाल्या.
२०१० या वर्षी,,,,, यशवंत कला महाविद्यालय , औरंगाबाद ला ५० वर्ष पूर्ण झाली.
त्यावेळी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला ,,कलादालनाचे उद्घाटन हि करण्यात आल. काही कलावंताचे प्रात्यक्षिक चे आयोजन करण्यात आली,,,त्यात एक मी ही होतो .
मी जलरंग माध्यमात व्यक्तिचित्रण केले होते.
त्याचे माझ्याकडे फोटो नव्हते,,,योगायोगाने मला २ महिने यशवंत ला डिप्लोमा पेंटिंग ला शिकवायची संधी मिळाली. तेव्हा कमलेश पाटील नावाच्या विध्यार्थ्याने त्या वेळी काढलेला हा फोटो मला दाखविला आणि माझ्या आठवणी ताज्या झाल्या.
खुल्या वातावरणात केलेले हे व्यक्तिचित्रण होते ,, बंधिस्त खोलीत व्यक्तिचित्रण करणे अन मोकळ्या वातावरणात यात खूप फरक असतो,,,,आणि तेही जलरंगात. सर्व बाजूने प्रकाश येत असतो. आणि सारखा बदलत ही असतो.तांबटकर सर आणि तोरवणे सर यांनी त्यावेळी मला संधी दिली.
यशवंत मध्ये मला बर्याच वेळा प्रात्यक्षिक सदर करण्याचा योग आला.
तोरवणे सर ए टी डी ला असताना त्यांच्या वर्गात ,,,फक्त ए टी डी च्या विद्यार्थ्यासाठी निसर्ग चित्र चे प्रात्यक्षिक दिल होत.ते प्रात्यक्षिक त्यांच्या कडे आहे .
नंतर जी डी आर्ट च्या वर्गात ,,,राजू कुमावत चे व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक म्हणून केल होत. ते चित्र तोच घेऊन गेला आहे बहुतेक ,,,,मस्त झाल होत.
मग तोरवणे सर प्राचार्य झाल्यानंतर सरांनी प्रात्यक्षिक देण्याची संधी मला दिली.आणि मी निखिल राउत चे व्यक्तिचित्र केल. ते चित्र तोरवणे सर यांनी जपून ठेवले आहे. हे सर्व चित्र जलरंग आणि पेपर या माध्यमात असल्याने आणि फ्रेम नसल्याने ते चित्र अजून यशवंत च्या भिंतीवर नाहीत.
मी तोरवणे सरांना बोललो होतो प्रात्यक्षिक विषयी कि ,,,, माझ एक हि प्रात्यक्षिक दिसत नाही ,,,,तेव्हा ते म्हणाले होते माझ्या कडील प्रात्याक्षिके आहेत जपून ठेवलेली पण अगोदेरची माहित नाही,,,आहे अथवा नाही. पण मला आशा आहे यातील एखाद तरी प्रात्यक्षिक यशवंत मध्ये भिंतीवर कलारसिकांना चिरकाल बघायला मिळेल.
मला यशवंत कला महाविद्यालयाने आणि तोरवणे सरांनी वेळोवेळी प्रात्यक्षिका साठी संधी दिल्या.त्याचा मी ऋणी आहे,,,धन्यवाद सर
अजिंठा चित्रकला महाविद्यालय सिल्लोड , शान्तेय चित्रकला महाविद्यालय चिखली , डहाणू चे कॉलेज, चंद्रपूर चे अनिमेशन कॉलेज, लोकमान्य टिळक राष्ट्रीय प्रदर्शन पुणे अश्या विविध ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करण्याच्या संधी मिळाल्यात. निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र आणि स्टील लाइफ असे विषय ,,,जलरंग आणि कोलाज अश्या माध्यमात हाताळले.
डहाणू कॉलेज ची तर मजेशीर संधी होती ,,,मी मुलाखतीला गेलो.
आणि त्या कॉलेज च्या प्राचार्या म्हणाल्या आमच्या विद्यार्थ्यांना डेमो द्या स्टील लाइफ चा ,,,,अन मी हि तयार झालो. मस्त चित्र केल,,,ते ही तासाभरात. मज्जा आली होती. मुल हि खुश झाली होती.