http://sunilbambal.blogspot.in/

Tuesday, July 25, 2017

शब्दसुमने

चंद्रशेखर गोखले सर यांनी माझ्या चित्रावर शब्दसुमने उधळत माझा आत्मविश्वास वाढविला .....त्यांचे शब्द जसेच्या तसे मी माझ्या ब्लोग वर टाकत आहे,,,,सोबत ज्या चित्राविषयी त्यांनी लिहिले ते चित्र ही .....सर धन्यवाद ,,तुम्ही माझे चित्र share करून माझ्या कलेचा गौरव केला. खूप खूप धन्यवाद.


 त्यांचे माझ्या चित्राविषयी चे शब्द जपण्याचा छोटासा प्रयत्न ,,,



 सुनीलच्या या चित्रात विलक्षण अर्थ सामावलेला आहे, ग्रंथ लिहून जी गोष्ट अपूर्ण राहू शकेल ती याने याचित्रात मोठया कल्पकतेने पूर्णत्वास नेली
मराठी भाषेत श्लेष हा जो एक रम्य कल्पक प्रकार आहे तो याने याचित्रात आणलाय.( स्त्री आणि माता ).
मुलाला झोळीत घालून कष्ट करणारी माता हा तसा पुरातन तितकाच सवयीचा झालेला विषय अधोरेखीत करताना त्याने दाखवलेली रसिकता ही त्या त्याच्या व्यक्तिमत्वात असलेली तरलता आहे,निव्वळ चित्राकार म्हणून मिळवलेली कामातली सफाई नाही.त्या झोळीची रचना त्या बाईचं पाठमोरं असणं आणि डोक्यावरच्या ओझ्याचा भास, तसच झॊळीत आईच्या भरवशावर निवांत झोपलेला जीवही .. जागतीक पातळीवर दखल घ्यायला लावणारं चित्र आहे
चिखली सारख्या छोट्याशा गावात राहून हा चित्रकार आपली साधना करतोय... बायकोची भक्कम साथ ही त्या कलाकाराची खरी ताकद आहे
पण आपण सुद्धा अशा कलाकराना जगासमोर आणण्यासाठी काहीतरी विचार करणं आणि विचार कृतीत आणणं गरजेचं आहे
सुनील मला खात्री आहे श्री गजाननाच्या कृपेनं तू नक्कीच यश किर्तीच्या शिखरावर पोहोचशील याची मला खात्री आहे... (हा लेख लेखक-कवी श्री चंद्रशेखर गोखले यांचा ४ एप्रिल २०१७ ला फेसबुक वरील आहे. ) 


जुन्या रचनेत नव्या रंगाची भर

पूर्वी माझे काही चित्र एका कला रसिक ने विकत घेतली होती,,,मग कालांतराने मी त्यांना काही माझ्या चित्राच्या प्रतिमा पाठविल्या ,,,,त्यातील एक चित्र त्यांना आवडले. मात्र त्यात काही बदल करून पाहिजे होते त्यांना. मी त्यांना बदल करून देतो म्हंटले,,,मात्र ,,,ते करत असताना माझ्याकडून प्रमाणाबाहेर बदल झाले आणि त्या चित्राचं जुने सोंदर्य गेले. 
त्यांनी मला काही रंग काढून त्यात दुसरे रंग टाकायला सांगितले पण माझ्याकडून तिसरे रंग टाकले गेले. 
ते पूर्वी सारख दिसत नसल्याने त्या चित्राची वाटचाल तेथेच थांबली . त्या कलारसिकास हे चित्र फारसे आवडले नाही नंतर ते घेण्यास त्यांनी नकार दिला.
मग मी ते चित्र पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला.
आणि
पूर्वीच सोंदर्य जाऊन नव्याने हे चित्र आपणासमोर आहे.
या व्यवहारात मला नवं शिकायला मिळाल.
आणि त्या जुन्या रचनेत नव्या रंगाची भर पडली.

Saturday, November 5, 2016

ujjain camp- kalavart nyas

उज्जैन च्या मानव संकेत आणि कलावर्त न्यास या दोन संस्था राष्ट्रीय कॅम्प चे आयोजन करत असत.तसेच कॅम्प अगोदर ते एक राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेत असे. त्या स्पर्धेचे N S Bendre Gold Medel आणि कॅश अवॉर्ड मला मिळाला होता. तो अवॉर्ड घेण्यासाठी आणि कॅम्प ला मी जाणार होतो. त्या वेळी आम्ही किमान १३ विध्यार्थी असेल तर रेल्वे भाड्यात काही सूट मिळायची ,,,त्या विद्यार्थ्या सह एक शिक्षक आवश्यक होता. 
आम्ही काही रोहित , संजय , माणिक ,नितीन , शिल्पा ,स्वरूपा ,सुमेध ,पंकज ,मयुरा आणि मी असे दहा जण कॅम्प ला जाण्यासाठी तयार होतो.
आम्ही आमच्या शिक्षकांना विनंती केली होती पण काही ना काही कारणाने ते येऊ शकत नव्हते ,,,,चव्हाण सर ,,,मानव संकेत च्या कॅम्प ला जाणार असल्याने आमच्या सोबत येऊ शकत नव्हते.
कुठलेच शिक्षक यायला तयार नव्हते ,,,मात्र कॅम्पला तर जायचं होत .
काय करावं सुचेना.
टिळक रोड चे शिक्षक येऊ शकत नाही मग आता काय करायचं ,,,,
माणिक, संजय, नितीन यांनी ATD वर्गाला शिकवणारे श्री पुंड सर याना हि बाब सांगितली आणि विनंती केली कि तुम्ही आमच्यासोबत या.
सर टिळक रोड ला येऊन प्राचार्यांना भेटले व मी या मुलासह कॅम्प ला जाणार सांगितले.
आम्हाला आमच्या त्या प्रवासासाठी सोबतीला अभिनव चे शिक्षक येणार हे पक्का झाल्याने आनंद झाला.
माझा सर चा काही खास परिचय नव्हता ,,,,या कॅम्पमध्ये आमची सर सोबत चांगली ओळख झाली.
सर टिळक रोड ला नसून हि ते आणि आम्ही चांगलेच मिसळलो होतो असं वाटलेच नाही कि ते आम्हाला शिकवायला नाही .
कॅम्प मध्ये हि आम्ही खूप मज्जा केली ,,,तेथे ४ दिवस केलेल्या चित्रातून बक्षीस काढणार होते ,,,,,, ते २००० रुपये चा प्रथम पुरस्कार मला मिळाला होता .
त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला होता .
संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी सर्वाना म्हसाला पान ची पार्टी दिली होती.
आमच्या सोबत पुंड सर यांनी हि कॅम्प चा आनंद घेतला होता ,,,,त्यांनी आमच्यातीलच एक आहे असे ते आमच्यासह वागले होते .
कॅम्प मध्ये बरेच मित्र जुळले होते . त्यातील काही आजही कनेक्ट आहेत .
धन्यवाद पुंड सर .
नंतर परती चा प्रवास झाला,,,आम्ही सर्व पुणे ला परतलो....

Hemant sir,,,,,,,Surekha aani Mohan,Awale

Surekhatai aani Mohan,Awale
यांना भेटायचा योग आला तो हेमंत सर मुळे ,,,,
त्यांनी पेपर कोलाज चे चित्र विकत घेतले ,,,त्या चित्राचे पेमेंट ऑगस्ट महिन्यात मिळाले होत ,,मात्र चित्र कोठे द्यायचे ते ठरले नव्हते.
एके दिवशी त्यांची बहीण सुरेखा यांच्याकडे चित्र द्यायचे सांगितलं ,,,, नंतर हे चित्र कॅनडा ला जाऊन टोरांटो च्या भारतीय घराच्या भिंतीचे सौन्दर्य वाढवेल.
मी तसा मुबईला त्या चित्रांच्या फ्रेम साठी ऑगस्ट महिन्यात गेलो होतो ,,,,आता चित्र द्यायसाठी .
आम्ही खूप गप्पा मारल्या माझा मित्र चंद्रशेखर मुळे ते सर्व मनमोकळे होऊन बोलले . सुनील पडवळ त्यांच्या खूप जवळचा कलावंत .
राजन सर आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह बोलताना मज्जा आली .
नंतर हेमंत सर यांनी सांगितले राजन सर गिटार छान वाजवतात.
मोहन सर आजारी असल्याने जास्त बोलले नाहीत ,,,,ते एक अष्टपैलू नेतृत्व आहेत हे कळले.
चहा नास्ता झाला,
निरोप घेताना आपोआपच आमचे हात दर्शनासाठी पाउलाकडे वळले .
आणि आम्ही निरोप घेतला Thanks Hemant sir ji.

Sunday, July 24, 2016

महान भारतीय चित्रकार रझा साहेब

रझा साहेब आपल्यातून गेले ,,,पण अनेकांच्या आठवणीत कायम आहे आणि राहतील . चित्र रूपाने तेर शेकडो आर्ट लव्हर आणि आर्ट कलेक्टर, तसेच म्युझियम मध्ये ते चिरकाळ अमर राहतील.
मी अभिनव ला असताना ,,पुण्यातील सुदर्शन आर्ट गॅलरी ने शिशिर नावाने एक सामूहीक प्रदर्शन भरविले होते .
या प्रदर्शन चा एक भाग मी ही होतो ,,,प्रत्येकी एक चित्र या प्रदर्शनात होत . या प्रदर्शनाचे उदघाटन हे रझा साहेबाच्या हस्ते झालं होत ,,,त्यावेळी ते सर्व कलाकारांचे चित्र बघून बालगंधर्व ला त्यांचा प्रोग्राम होता तेथे गेले होते ,,,,त्या सुदर्शन मध्ये या अवलिया ला भेटण्याचा योग आला होता ,,,
 रझा साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली ..