http://sunilbambal.blogspot.in/

Saturday, November 5, 2016

ujjain camp- kalavart nyas

उज्जैन च्या मानव संकेत आणि कलावर्त न्यास या दोन संस्था राष्ट्रीय कॅम्प चे आयोजन करत असत.तसेच कॅम्प अगोदर ते एक राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेत असे. त्या स्पर्धेचे N S Bendre Gold Medel आणि कॅश अवॉर्ड मला मिळाला होता. तो अवॉर्ड घेण्यासाठी आणि कॅम्प ला मी जाणार होतो. त्या वेळी आम्ही किमान १३ विध्यार्थी असेल तर रेल्वे भाड्यात काही सूट मिळायची ,,,त्या विद्यार्थ्या सह एक शिक्षक आवश्यक होता. 
आम्ही काही रोहित , संजय , माणिक ,नितीन , शिल्पा ,स्वरूपा ,सुमेध ,पंकज ,मयुरा आणि मी असे दहा जण कॅम्प ला जाण्यासाठी तयार होतो.
आम्ही आमच्या शिक्षकांना विनंती केली होती पण काही ना काही कारणाने ते येऊ शकत नव्हते ,,,,चव्हाण सर ,,,मानव संकेत च्या कॅम्प ला जाणार असल्याने आमच्या सोबत येऊ शकत नव्हते.
कुठलेच शिक्षक यायला तयार नव्हते ,,,मात्र कॅम्पला तर जायचं होत .
काय करावं सुचेना.
टिळक रोड चे शिक्षक येऊ शकत नाही मग आता काय करायचं ,,,,
माणिक, संजय, नितीन यांनी ATD वर्गाला शिकवणारे श्री पुंड सर याना हि बाब सांगितली आणि विनंती केली कि तुम्ही आमच्यासोबत या.
सर टिळक रोड ला येऊन प्राचार्यांना भेटले व मी या मुलासह कॅम्प ला जाणार सांगितले.
आम्हाला आमच्या त्या प्रवासासाठी सोबतीला अभिनव चे शिक्षक येणार हे पक्का झाल्याने आनंद झाला.
माझा सर चा काही खास परिचय नव्हता ,,,,या कॅम्पमध्ये आमची सर सोबत चांगली ओळख झाली.
सर टिळक रोड ला नसून हि ते आणि आम्ही चांगलेच मिसळलो होतो असं वाटलेच नाही कि ते आम्हाला शिकवायला नाही .
कॅम्प मध्ये हि आम्ही खूप मज्जा केली ,,,तेथे ४ दिवस केलेल्या चित्रातून बक्षीस काढणार होते ,,,,,, ते २००० रुपये चा प्रथम पुरस्कार मला मिळाला होता .
त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला होता .
संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी सर्वाना म्हसाला पान ची पार्टी दिली होती.
आमच्या सोबत पुंड सर यांनी हि कॅम्प चा आनंद घेतला होता ,,,,त्यांनी आमच्यातीलच एक आहे असे ते आमच्यासह वागले होते .
कॅम्प मध्ये बरेच मित्र जुळले होते . त्यातील काही आजही कनेक्ट आहेत .
धन्यवाद पुंड सर .
नंतर परती चा प्रवास झाला,,,आम्ही सर्व पुणे ला परतलो....

Hemant sir,,,,,,,Surekha aani Mohan,Awale

Surekhatai aani Mohan,Awale
यांना भेटायचा योग आला तो हेमंत सर मुळे ,,,,
त्यांनी पेपर कोलाज चे चित्र विकत घेतले ,,,त्या चित्राचे पेमेंट ऑगस्ट महिन्यात मिळाले होत ,,मात्र चित्र कोठे द्यायचे ते ठरले नव्हते.
एके दिवशी त्यांची बहीण सुरेखा यांच्याकडे चित्र द्यायचे सांगितलं ,,,, नंतर हे चित्र कॅनडा ला जाऊन टोरांटो च्या भारतीय घराच्या भिंतीचे सौन्दर्य वाढवेल.
मी तसा मुबईला त्या चित्रांच्या फ्रेम साठी ऑगस्ट महिन्यात गेलो होतो ,,,,आता चित्र द्यायसाठी .
आम्ही खूप गप्पा मारल्या माझा मित्र चंद्रशेखर मुळे ते सर्व मनमोकळे होऊन बोलले . सुनील पडवळ त्यांच्या खूप जवळचा कलावंत .
राजन सर आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह बोलताना मज्जा आली .
नंतर हेमंत सर यांनी सांगितले राजन सर गिटार छान वाजवतात.
मोहन सर आजारी असल्याने जास्त बोलले नाहीत ,,,,ते एक अष्टपैलू नेतृत्व आहेत हे कळले.
चहा नास्ता झाला,
निरोप घेताना आपोआपच आमचे हात दर्शनासाठी पाउलाकडे वळले .
आणि आम्ही निरोप घेतला Thanks Hemant sir ji.

Sunday, July 24, 2016

महान भारतीय चित्रकार रझा साहेब

रझा साहेब आपल्यातून गेले ,,,पण अनेकांच्या आठवणीत कायम आहे आणि राहतील . चित्र रूपाने तेर शेकडो आर्ट लव्हर आणि आर्ट कलेक्टर, तसेच म्युझियम मध्ये ते चिरकाळ अमर राहतील.
मी अभिनव ला असताना ,,पुण्यातील सुदर्शन आर्ट गॅलरी ने शिशिर नावाने एक सामूहीक प्रदर्शन भरविले होते .
या प्रदर्शन चा एक भाग मी ही होतो ,,,प्रत्येकी एक चित्र या प्रदर्शनात होत . या प्रदर्शनाचे उदघाटन हे रझा साहेबाच्या हस्ते झालं होत ,,,त्यावेळी ते सर्व कलाकारांचे चित्र बघून बालगंधर्व ला त्यांचा प्रोग्राम होता तेथे गेले होते ,,,,त्या सुदर्शन मध्ये या अवलिया ला भेटण्याचा योग आला होता ,,,
 रझा साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली ..  

Monday, June 13, 2016

आकाशवाणी ०९/०६/२०१६


मी डीप.ए.एड. साठी Sir J J school of Art ला जायचं ठरवलं होत. अभिनव ला ५००० रु फी भरून डीप.ए.एड.केल्यापेक्षा Sir J J माझ्यासाठी उत्तम पर्याय होता.
फक्त प्रश्न होता तो तेथे राहण्याचा ,,,,
मुंबई मध्ये राहण्यासाठी खर्च तर लागतोच पण जीवाची मुंबई करूनच तुम्हाला तुमच्या प्रवासाला निघावं लागत ,,,मग ते ऑफिस असो वा कॉलेज. 
योगायोगाने माझ्या शेजारी राहणाऱ्या काका जवळ मी विषय काढला,तेव्हा ते मला पंडित दादा जवळ घेऊन गेले ,,माझी राहण्याची अडचण सांगितली. माझं सर्व ऐकून ते म्हणाले काही हरकत नाही. नाना कडे जा आणि मी पाठविले म्हणून सांग. तुझी मुंबईत राहण्याची व्यवस्था होऊन जाईल .
नाना भाऊ नी मला ताई च्या आकाशवाणी आमदार निवास चे एक पत्र दिले. आणि माझी मुंबई मध्ये राहण्याची सोय झाली होती .
यात च जी डी आर्ट चा निकाल हि आला होता ,,,,Sir J J ला जाण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला होता.
मुंबईत शिकण्याची अन राहण्याची सोय झाली होती.
मी खुश होतो,,,मात्र ४ वर्ष ज्या पुण्यातील मित्र मैत्रिणी होत्या ते सर्व अभिनव ला डीप.ए.एड.करणार होते, त्यांच्यापासून मी दूर गेलो ते कायमचाच,,,पुणे सुटले ते सुटलेच.
पुण्यात असताना आमचा बोन्दार्डे वाडा ,,अभिनव कॉलेज ,,,आणि मामीची मेस ,,,हेच खर विश्व होत माझ.
अभिनव मध्ये शिकायला मिळाले ते तोरवणे सर यांच्या सल्ल्याने.
हृषीकेश चिंचोरे , संजय खोचरे , सोमनाथ बोठे , गणेश तांबे , नवनाथ क्षीरसागर सारखे रूम पार्टनर मिळाले,संजय टिक्कल कडून ही खूप शिकायला मिळाले,,टिक्कल आणि खोचरे च माझे अप्रत्यक्षपणे गुरू होते. कॉलेज पेक्षा त्यांच्या कडूनच मी खूप काही शिकलो ,तसे सर्वांकडून मी काही न काही शिकलो. अनेक मित्र मिळाले.
अभिनव सोडून आकाशवाणी गाठली मी आणि परत मित्र जोडण्याचा प्रवास सुरु झाला ,,,अजून ही सुरूच आहे.
आता मात्र ठिकाण बदलले या प्रत्यक्ष ठिकाणांची जागा फेसबुक ने घेतली.
यशवंत ,,,,अभिनव ,,सर जे जी ,,,सारखेच माझ्यासाठी  'आकाशवाणी' होत.आकाशवाणीत अनेक मित्र बनले.काही व्यक्ती कायम मनाच्या कोपऱ्यात घर करून गेल्या. आकाशवाणी आमदार निवास मध्ये राहताना जे मंतरलेले दिवस काढले त्यातील किस्से आणि अनुभव लिहताना आनंद होईल. …
सुनिल बांबल ०९/०६/२०१६आकाशवाणी

कॉलेज च्या आठवणी ०१/०६/२०१६ सुनिल बांबल


रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अस आपण सर्वच म्हणतो. मी आतापर्यंत बऱ्याच वेळा रक्तदान केले आहे,रक्तदान केल्यानंतर एक वेगळेच समाधान मिळते. खरतर रक्तदान या सारख कुठलेच दान नाही ,,,,पण आपण रक्तदान कुणाला करतोय ते म्हह्त्वाचे. मला वाटते आपण रक्तदान करताना गरजू रुग्णालाच करावे. रक्तपेढी ला रक्तदान करते वेळी पेक्षा हजार पट आनंद मिळतो तो गरजू रुग्णाला रक्त देताना.
यशवंत ला असताना हेगडेवार रुग्णालय च्या रक्तपेढी ने रक्तदान शिबीर आयोजित केल होत मी हि रक्तदान करण्यास गेलो ,,,त्यांनी रक्तगट तपासणी केली सोबत च इतर हि तपासण्या केल्या,,,वजन ,हिमोग्लोबिन वैगेरे वैगेरे.
नंतर ते म्हणाले तुम्ही रक्तदान करू नका ,,,
ते म्हणाले ,,,,तुमच्या शरीरात १ % रक्त कमी आहे,,,
हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी आहे….
हे ऐकून मला थोड हसायला आल त्या वेळी… न राहवून मी म्हणालो,,माझ्या शरीराकडे बघून तर नका म्हणू अस .
ते म्हणाले तस काही नसत ,,,प्रमाण कमी जास्त कुणाच्या हि शरीराचे असू शकते…
मग माझ रक्त वाढायला काय करू ,,,किमान पुढच्या वेळी तरी मी रक्तदान करू शकेल ,,,त्यांनी काळ्या काळ्या गोळ्या दिल्या.
सोबत एक सल्ला …. . रोज मुठभर कच्चे शेंगदाणे आणि गुळाचा खडा खा.
रक्त वाढेल .मी त्या वेळी रक्तदान इच्छा असूनही नाही करू शकलो .
त्यानंतर मात्र मी आज पर्यंत सहा वेळा रक्तदान केलय.५ वेळा रक्तदान शिबिरात तर एका वेळा गरजू रुग्णास.
अभिनव ला इंटर ला असताना दिवाळी नंतर २८ दिवस कॉलेज ला गेलो नव्हतो मी ,,,कदाचित त्यावेळी माझ कॉलेज संपल्यात जमा झाल होत.अभिनव ला इंटर ला असताना दिवाळी नंतर २८ दिवस कॉलेज ला गेलो नव्हतो मी ,,,कदाचित त्यावेळी माझ कॉलेज संपल्यात जमा झाल होत.
strict Bed Rest चे प्रमाणपत्र ने वाचवल ,,,हा सविस्तर किस्सा कधीतरी .
२८ दिवसानंतर पहिलाच कॉलेज चा दिवस ,,,,त्यात शिक्षक माझ्यावर रागावलेले.
अमोल सांभार नावाचा मित्र आला त्याने वर्गात सांगितल ,,,कुणी O + रक्तगट असेल तर रुबी हॉस्पिटल ला नगर चा रुग्ण आहे . अपघात चा रुग्ण आहे मोठ्या प्रमाणात रक्त लग्न आहे कुणी इच्छुक असेल तर सांगा,,, मी शिल्पा मडम कडे लेखी अर्ज करून रक्तदान करायला गेलो ,,,तेथे रक्त तपासले व नंतर रक्त घेतले . तो रूग्ण नंतर वाचला कि नाही माहित नाही … दुसऱ्या दिवशी मात्र माझ्यावर तावरे सर नि फियरींग केली.
पण मला त्या रुग्णा ला रक्त दिल्याच समाधान होत .

कॉलेज च्या आठवणी / सुनिल बांबल ३०/०५/२०१६


अडव्हांस चे पेपर चालू होते ,,,,प्रिंट चा पहिला दिवस होता तो . 
मी ,सिद्धार्थ ,प्रणव आणि ऋषी ,,,,,आम्ही चहा नाश्त्याला बाहेर आलो. वर्तमानपत्र बघत असताना ,,,करम सिनेमा ,,,inox ला लागला होता ,,,,आणि मोर्निग चे ५० रुपयेच तिकीट होते ,,,लगेच सर्वांनी प्लान केला आणि काय ,,,,सकाळी ९ ते १२ करम. 
दुसर्या दिवशी कानडे सर झाले न आमच्यावर गरम. 
त्यांना कळले कि आम्ही काल कुठेतरी गेलो होतो ,,,,आम्ही कशीतरी २ दिवसात प्रिंट करून सबमिट केली . 
कांनडे सर मला रागावले ,,,त्यावेळी मी सहज म्हणून गेलो होतो .
कोण विकत घेत हो सर प्रिंट ला ?
जाउद्या ना ,
सर म्हणाले ,,,"अरे किमान प्रिंट च्या मास्तर समोर तरी नको म्हणू ".
नकळत माझ्या शब्दांनी त्याचं मन दुखावलं असाव .
दुखावलं असेलच तर खरच सॉरी सर,,,माझा तसा हेतू नव्हता.
कानडे सर सर्वांचे आवडते होते ,,,कधी कुणाला हि दुखावत नसत ,,,,,,नेहमी हसत बोलत
माझी बरेच वर्ष झाली भेट नाही … पण कॉलेज चे दिवस आठवले तर कानडे सर हमखास आठवतात च . .