बुलडाणा जिल्ह्यातील असलेलं ,,,चांडोल ,,,गाव.
या गावचा Vaibhav Deshmukh .
वैभव ने अतिशय स्ट्रगल करत स्वतःची कविता जोपासली.
माझी त्याची ओळख औरंगाबाद ला असताना झाली.
मी ATD करत असताना वाघ च्या वाड्यात रूम भाड्याने राहायचो.
मी ,शिंगणे ,साखरे,सुरेश वाघ असे रूममेट होतो. बाजूच्याच रूम मध्ये वैभव देशमुख राहायचा. तो पेंटर च काम करायचं. आम्ही चित्रा वाले असल्याने पेंटर सी आमचं चांगलं जमायचं.
अनेक त्याच्या कविता तोंडी पाठ असलेल्या आम्ही ऐकायचो,,,त्यासोबत अनेक प्रसिद्ध गीत ही त्यांच्या मुखातून ऐकायला भेटायची.
दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे ,,,असे मंत्रमुग्ध करणारी गाणी असो वा त्याच्या स्वतःच्या कविता.
वेळ कसा जायचा समजत नसे.
बऱ्याच वेळा आम्ही त्याला म्हणायचो ,,,तुमच्या एवढ्या साऱ्या कविता आहे ना मग ,,,,,पेंटर तुम्ही कविता संग्रह काढा राव.
स्वतःच्या कविता बरोबर ते इतरांच्या ही कविता सादर करत.
काही शब्द मला आठवतात,,,
कदाचित मीच वेडा असेल
भूगोलाच्या पुस्तकातील धडा असेल
ती मात्र कविता,,,,,ती मात्र कविता
भाषेच्या पुस्तकातील.
अश्या अनेक कविता ते सादर करत.
मग मी पुण्याला गेलो,,,,मग कधीतरी औरंगाबाद ला आलो तर भेट व्हायची. मग त्यांनी पार्टनर मध्ये पेंटिंग शॉप ही टाकलं होतं.
पुढे काळ सरकत गेला ,,,स्ट्रगल ही चालूच होत.
माझं ही स्ट्रगल चालू होत आज ही चालूच आहे. हळूहळू संपर्क कमी झाले ,,, फेसबुक वर कधी कधी बोलणं होत असे.
त्याच्या कवितासंग्रह साठी मुखपृष्ठ म्हणून चित्र हवं होतं,,,माझ्याकडून फोटो पाठवे पर्यंत उशीर झाला होता.
बाणगंगा कडून त्याचा "तृष्णाकाठ" प्रकाशित झाला होता.
पुढे त्या संग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले ,,,,अनेकांनी त्याची पुस्तकं संग्रहित केले.
मी खूप शोध घेऊन ही मला मिळाले नाही.
हळूहळू त्याचा ग्राफ उंचावत गेला ,,,त्याला वेगवेगळ्या काव्यसम्मेलनातून बोलावणं येत असे.
त्याच्या लेखणीतून कागदावर उतरलेले शब्द ,,,गीतरुपी मालिका आणि चित्रपटातून लोकांच्या श्रवणात आली.
त्याने लिहिलेल्या गीत असलेल्या चित्रपटास राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार ही मिळाले.
सध्या त्याची नाळ,,,,,नाळ या चित्रपटाला जोडलेली गेली आहे. नागराज मंजुळे च्या नाळ या चित्रपटातील सध्या गाजत असलेली गीतं त्याचा लेखणीतून आली आहेत.
सध्या गाजत असलेल्या गीतांपैकी "हे दरवयतं" हे गीत वैभव च्या लेखणीतून आलंय.
सध्या हा चित्रपट आणि गीतं धुमाकूळ घालत आहे.
त्यातील जाऊ दे न व हे गीत त्यातील संगीतकारांनी लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे.
वैभव देशमुख तू तो बुलडाणा जिल्हे की शान है,,,
आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.
जिओ मेरे दोस्त
सुनिल बांबल
चित्रकार