http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, February 4, 2016

ए.टी.डी. धारक आणि परिस्थिती ?????



     मी बहुतेक वेळा बाहेर गावी फिरत असतो आणि ज्या गावी गेलो कि मग हमखास निसर्गचित्र अथवा गावातील ठिकाणे रंगवितो  हे करत असताना बर्याच वेळा आमच्या क्षेत्रातील मुल भेटतात ,,,सांगतात मी हे केल ते केल ,ए.टी.डी.केल . आणि आता काय करता तर दुसरेच उत्तर असतात. याला कारणही तसाच आहे ,,,ए.टी.डी.करून नोकर्याच नाही ,,,
ज्यांना मिळाल्या त्या एक तर नशिबाने नाहीतर लग्गा आणि पैश्याने. ,
ज्यांच्या कडे या दोन्ही गोष्टी नाहीत त्यांचे या शिक्षणाने हालच केले .

मी हि ए.टी.डी.धारक आहे ,
माझ्याकडे हि वरील गोष्टी नव्हत्या ,,,कदाचित तोरवणे सर नि जी डी आर्ट करायचा सल्ला नसता दिला तर माझे हि असाच झाल असत.
कारण ,मी पास झाल्यापासून खूपच कमी वेळा शासनाच्या जागा निघाल्या . २००२ कि २००४ दरम्यान जिल्हा परिषद च्या ४ जागा बुलडाणा  जिल्ह्या मध्ये काढल्या होत्या आणि त्या ४ जगासाठी ३०० पेक्षा हि अधिक अर्ज आले असतील , ४ जागा मधील २ महिला राखीव होत्या
रयत च्या निघाल्या होत्या त्या हि नाव ,गाव विचारून कळवू सांगायचे,,
मध्ये शासनाने अशकालीन जागा भरल्या होत्या त्यातही शाळा समित्यानीच शाळा करून कलाशिक्षकांना भरले ,,,ते अंश काळासाठीच .
आज हि ते भांडत आहेत ,
या अंश काळानंतर मात्र शासनाने कलाशिक्षक भरले नाहीत .

माझ्या गावाजवळ एकलारा नावाच गाव आहे ,,,या गावात ए.टी.डी.धारक ७ ते ८ सापडतील ,,,,त्यांना नोकर्या नाहीत असे अनेक गाव आहेत ,,,जेथे हा आकडा कमी जास्त प्रमाणात आहे. काहींनी पैसे भरले ,,,त्यांच्याच पैश्याच व्याज हि त्यांना पगार म्हणून मिळत नाही.
मी मागील महिन्यात जवाहर नवोदय विद्यालय, वाशीम. येथे  चित्रकला कार्यशाळा साठी गेलो होतो . दुपारी २ तास कार्यशाळा असायची.
उरलेला वेळ मग मी वाशीम शहरातील रस्ते , जुने घर रंगविण्यात वेळ घालायचो. असाच एक चित्र करत असताना एक मुलगा येउन थांबला. त्याला काहीतरी बोलायचं होत. थोडा वेळ थांबून तो म्हणाला सर मी हि ए.टी.डी., जी डी आर्ट आणि डीप .ए.एड  केल आहे. पण जॉब नाही.
मग काय करतो विचारले असता म्हणाला ,,,सर मेस चालवतो.
परिस्थिती खूप बेताची ,,,तरीही शिकलो . घरचे नाही म्हणायचे ,,,पण एकले नाही .
सुरवातीला पेपरला कुठ जाहिरात आहे का बघायचो ,,,, इंग्रजी शाळावाले तर २ नाही तर ३ हजारात खूप राबवून घेतात ,,,आता सर्व सोडले आणि खानावळ चालवतो मी आणि मित्र.
त्याला मी चित्र कलेत जगण्यासाठी अनेक मार्ग सांगितले ,,,पण तो पूर्ण हताश झालेला दिसला.
त्याला चित्रकलेची आवड असुनहि ,,चित्रकला नकोशी झाली होती.
अश्या खूप मुलाच्या स्टोरी आहेत .त्याचे कडे बघून मला कसतरी झाल ,,,पण काय करणार .

             पूर्वी जिल्ह्यातून एखादाच कला महाविद्यालय असायचे ,,,शिक्षक हि चांगले असायचे ,,,विद्यार्थी हि भरपूर असत. शिक्षक चांगले लक्ष देत त्यांच्या कडून करून घेत.
आता मात्र  गावो गावी झालेले चित्रकलेची कॉलेज नव्हे दुकान च ती .सुसज्ज इमारत , अनुभवी शिक्षक ,,,हे फक्त जाहिराती पुरते ,,,
कागदोपत्री भरगच्च असणारे विद्यार्थी ,,,परीक्षेला मात्र बोटावर मोजण्या इतकेच असतात . आणि तरीही अश्या कॉलेज कडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करतात .
 
शासन कुठल्याही पक्ष्याचे आले तरी त्याचे चित्रकला क्षेत्राकडे दुर्लक्ष च आहे,
ए.टी.डी.धारक कला शिक्षक शासन भरत नसेल तर असे ए.टी.डी.धारकांचे उत्पादन थांबवावे. गावोगावी झालेले कला महाविद्यालये जेथे विद्यार्थी सख्या नाही असे कॉलेज बंद करावे. त्यामुळे  ए.टी.डी.धारक ,,,सुशिक्षित बेकार होतील.

गरीब घरच्या मुलांनी ए.टी.डी.करण्या अगोदर खूप विचार विनिमय करून मग च त्यासाठी पाऊल उचला. हि सद्य परिस्थिती आहे. अगोदर जे लागले ,,नोकरी करत असतील त्यांची मत वेगळी असेल ही. हे माझ व्ययक्तिक मत आहे ,,,,पण तरीही जपून पाऊल टाका.
मेहनत,जिद्द असेल तर त्या क्षेत्रा तील संबंधित काम करू शकाल ,,,पण कलाशिक्षक नोकरी विरळच .

सुनील बांबल ,चिखली.  ०५/०२/२०१६